Skip to main content

उतरत्या संध्याकाळी....

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 15/11/2021 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
उतरत्या संध्याकाळी खिडकीत बसू नये. हरवल्या नजरेला काही काही दिसू नये. चुलीपाशी दुधावर साय दाटे आठवांची, धुरकट कंदिलाची काच तेव्हा पुसू नये. उतरत्या संध्याकाळी नको ओवी गुणगुणू, उतू उतू जाईल गं काळजाचा मेघ जणू. सरेलही सांज बघ, नको भिजवूस वाणी. हूरहूर अंतरीची नको बघायला कुणी. उतरत्या संध्याकाळी वळ थोड्या फूलवाती. जपताना धागा धागा धर थोडी राख हाती. मिटुनिया डोळे हळू लाव दिवा अंगणात, इडा पिडा टळो सारी समईच्या प्रकाशात..

पारगाव भातोडी- १

लेखक Bhakti यांनी रविवार, 14/11/2021 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
पारगाव भातोडी गुगल करता करता , मराठा युद्ध जेथे झाले त्याची रोचक माहिती वाचली.प्रवास मोठा नव्हता ,तेव्हा जवळच्याच पण ऐतिहासिक पानाला कधी भेट देईन याचा मागोवा घेत होते.घरीच बनवलेल्या मिसळ पावचा भरपेट न्याहरी करून निघाले. रस्त्याने नव्याने चाललेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रचंड लगबग होती.हळूहळू ती लगबग मागे टाकत टाकत मिलिटरी एरिया त्याच्या ऐसपैस भव्य इमारती आणि काही रणगाडे नजरेस पडत होत्या.पुढे तो भाग संपताच दुतर्फा हिरवीगार कांद्याची शेत नांदताना दिसली.आणि मोकळी हवा केसांशी खेळू लागली.मास्क अलगदच पर्समधे शिरला.आता रस्तावरची वर्दळही नाहीशी झाली.लवकरच पारगाव भातोडी वेस आली.टिपिकल गावची घर पण कम

रिअॅलिटी’ शो

लेखक भागो यांनी रविवार, 14/11/2021 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
‘रिअॅलिटी’ शो ‘Reality’ Shows "Be grateful that you only see the outward man. Be grateful that you never see the passions, the hatreds, the jealousies, the malice, the sicknesses... Be grateful you rarely see the frightening truth in people." -----Alfred Bester in The Demolished Man तात्याचं लग्न होऊन चांगली सहा सात वर्षे झाली आहेत. त्याची बायको सुशी. दोघांचा संसार मजेत चालला आहे. बायकोन खूपच आग्रह केला.पण तात्या बधला नाही. ‘अवास्तव धमाल’ हा नवीन चॅनेल धामधुमीत सुरु झाला होता, उद्घाटनाला बड्या बड्या धेंडांनी आवर्जून हजेरी लावली होती. कोण नव्हते आले? सी.एम तर होतेच होते.

खंत

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 13/11/2021 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
बोलणं होतंय, कळणं नाही. पाहणं होतंय, रमणं नाही. ऐकणं होतंय, समजणं नाही. धावणं होतंय, थांबणं नाही. भेटणं होतंय, मिसळणं नाही. फिरणं होतंय, शोधणं नाही. आठवणं होतंय, विसरणं नाही. वाचणं होतंय, उमगणं नाही.

किनखापी आभाळाने

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 13/11/2021 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
किनखापी आभाळाने लपविले निळे नक्षत्र मृगजळात बुडून गेले काळाचे घटिकापात्र थोपवल्या आवेगांच्या डोहात दफनली रात्र रिक्तता नसे ज्या ठावी ते फुटले अक्षयपात्र जागवूनी पिशाच्च शमतो का कधी अघोरी मंत्र ?
काव्यरस

वाईन - भाग २

लेखक श्रीगणेशा यांनी शुक्रवार, 12/11/2021 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
(मागच्या वेळी श्री ने मोठ्या शिताफीने वाइनचा प्रसंग वेळ मारून नेला होता. वाईन - भाग १ पण सौ काही हार माननाऱ्यातील नव्हती. पाहुयात पुढे काय घडलं ते...) सौ: मग काय विचार केला आहे तुम्ही? श्री: (गोंधळून) कशाचा विचार? आणि तू असं अचानक कोड्यात काय बोलते आहेस आज? सौ: वाटलंच. माझं मन काही तुम्ही जाणू शकत नाही. आज १६ वर्षे संसार एकटीने चालवला. पहिल्यांदा काहीतरी मागितलं तर तुम्ही चेष्टेवारी नेला विषय. श्री: (डोक्यात प्रकाश पडून) मी तुझी चेष्टा का करेल? आणि तेही वाईन वरून? उलट तूच माझी चेष्टा केली की काय असं मला वाटतंय.