Skip to main content

' ती '

लेखक दिलीपकुमार यांनी सोमवार, 02/08/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासोबत फिरताना बघ , मला किती छान वाटत॑. एवढ मोठ असुन सुदधा , जग किती लहान वाटत॑. फिरताना जेव्हा तुझा हात , माझ्या हातात येतो. या छोट्या भावविश्वाचा, मी मग राजा होतो. राजाकडे सर्व काही आहे, पण राणीची उणीव भासते. अन " ती " मात्र खुशाल , वेडावत तो॑ड भरुन हसते

चित्तथरारक सत्यकथा !!!

लेखक गौरीदिल्ली यांनी सोमवार, 02/08/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
कशी कुठून सुरुवात करावी काही कळत नाही. एक सत्यकथा मांडून सगळ्यांना सावध करायचा फक्त हाच हेतू... ठिकाण :- दिल्ली ... दुबई तारीख :- नक्की माहीत नाही . असेल जानेवारी महिना माझ्या मैत्रिणीच्या नात्यातली गोष्ट .. तिच्या नातातल्या एका भावाचे( नाव समीर देऊ) लग्न झाले जानेवारी मध्ये आणि नवविवाहितं जोडपे हनीमूनला गेले दुबईला. तिथे एका नामवंत हॉटेलात बुकिंग करून आजूबाजुची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यात काही दिवस भुर्रकन उडून गेले.

काही नमुने.. (लोकल गोष्टी )

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 02/08/2010 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही नमुने.. ================================ कोणती ही सेवा म्हटली की ती यशस्वीपणे दीर्घ काळ चालत राहावी यासाठी त्या सेवेवर सेवा शुल्क आकारणे, हे सेवा शुल्क सर्वां कडून भरले जाते ना? याची त्या सेवेचा कोणी गैरवापर करत नाहीन याची खबरदारी घ्यावीच लागते. आपली लोकल ही त्याला आफवाद नाही. मग त्यातूनच वेळच्या वेळी तिकीट, पास, काढणे ( पास कधी संपतो हे लक्षात ठेवणे ) तो तिकीट चेकरला दाखवणे या सारख्या गोष्टी लोकल प्रवाशांच्या जीवनाचा भाग बनून जातात.

माझी मैत्रिण - विभा

लेखक शुचि यांनी सोमवार, 02/08/2010 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
२ स्त्रियांमधे जितकी चांगली मैत्री होऊ शकते तितकी चांगली मैत्री माझ्यात आणि विभावरीत होती असं सेफली म्हणता येईल. टचवुड! याचं मुख्य कारण बहुसंख्य बायकांत आढळ्णारा कॅटीनेस, पेटीनेस, हेवा यांचा आमच्या दोघीतील ढळढळीत अभाव. विभा जितकी परखड आणि सरळ तोंडवर बोलणारी आहे तितकीच मी मेलो आणि पडेल आहे पण ती मनाने अतिशय चांगली आहे. तिला परखड बनायला कारणदेखील आहे. लहानपणी वडील अचानक वारल्यानंतर आईनी कष्ट करून मोठं केलय. पुढे विभानी कॉलेजपासून लहान्मोठ्या नोकर्‍या करून आईला हात्भार लावलाय. वडील नसल्यावर कसे लांडगे पदोपदी भेटतात ते तिलाच माहीत. लहान वयात स्वातन्त्र्य चाखलेले लोक लगेच ओळखू येतात.

झटपट ब्रेड पॅटीस...

लेखक गमत्या यांनी रविवार, 01/08/2010 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
झटपट ब्रेड पॅटीस... तसा मि मिपा चा नियमित वाचक आहे. पण वेळे आभावी व लेखानात धाडस नसल्याने लेख लिहायचा किंवा एखाद्या लेखाला प्रतीक्रिया देण्याचा कंटाळा करतो. पण माझे मिपा वर तेवढेच प्रेम आहे जेव्हढे तुम्हा सर्व अ‍ॅक्टीव सभासदांचे आहे. असो.... पाक कॄतीला सुरुवात करण्यापुर्वी थोडे ति बनवण्याची जी स्फुर्ती मिळाली त्यबद्द्ल थोडेसे लिहीण्याचे धाडस करतो..... येथे सातासमुद्रापार आल्यापसुन आपल्याकडील पदार्थांची खुप आठवण येते त्याला बहुतेक बरीच कारणे असावीत त्यातील ठळक जाणवनारी खालील १. एखाद्या गोष्टीच्या पासुन दुर गेल्याशीवाय त्याचे महत्व समजत नसते आणि दुसरे आणि महत्वाचे २.

मित्रार्थ

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 01/08/2010 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीदिनाशी मैत्री करा, मैत्रीशी मैत्र धरा! मित्रांच्या हृदयात घर करा, मैत्रीच्या शब्दार्थाला सर करा!
काव्यरस