Skip to main content

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 05/12/2021 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

विजेची गोष्ट ५: टेस्ला - विजेचा सुपुत्र आणि आधुनिक जगाचा इलेक्ट्रिक चालक (War of Currents ends with Tesla's Electric Genius) 

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 05/12/2021 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
जगाचं खरंच वागणं वेगळं आणि केवळ ज्ञात्याला कळणारं, ज्ञात्यालाच जगातल्या साऱ्या सिद्धी वश होणार, इतर मात्र नुसतंच झटापटीत वेळ आणि श्रम घालवणार आणि अपयश आल्यावर याच जगाला नावं ठेवत निराश होऊन, निसर्गाला दूषणं देत या जगासमोर सपशेल शरणागती घेऊन काहीशा पराभूत भावनेनेच जगाचा निरोप घेणार सिकंदरासारख. या जगाचं चरित्र मात्र ज्याला कळलं, स्वरूप कळलं तो तरला, साऱ्या जगालाही तारून घेऊन गेला. या निसर्गाची कुठलीच बाब निरुपयोगी नाही, प्रत्येक क्षण हा सुमुहूर्त, प्रत्येक जागा हि मोक्याची जागा, वस्तूचा प्रत्येक कण न कण हा मोलाचा.

‘विक्रांत’

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 04/12/2021 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज नौदल दिन. 50 वर्षांपूर्वी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात म्हणजेच बांगलादेश मुक्तिसंग्रामात 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने गाजवलेल्या पराक्रमाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 4 डिसेंबरला भारतात नौदल दिन साजरा केला जातो. त्या युद्धात पराक्रम गाजवलेल्या आणि सेवानिवृत्तीनंतर संग्रहालय म्हणून नावारुपाला आलेल्या, अल्पावधीतच मुंबईतील एक आकर्षण ठरलेल्या, पण आता इतिहासजमा झालेल्या ‘विक्रांत’वरील त्याच संग्रहालयाविषयी... ‘विक्रांत’ने गाजवलेल्या पराक्रमाची भावी पिढीला ओळख व्हावी या हेतूने त्यावर नौदलाने एक तात्पुरते पण आकर्षक संग्रहालय उभारले होते.

Trekkers' group माहीती हवी

लेखक Nishantbhau यांनी शनिवार, 04/12/2021 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी Trekking चा एखादा व्हॉट्स अप ग्रुप असेल तर लिंक कोणी शेअर करू शकेल का. मी पुण्यात राहतो. पुण्याच्या आसपास ट्रेकिंग ला जाणाऱ्या हौशी लोकांबरोबर ट्रेक करायचे आहेत.

मोकळ्या करा पखाली

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 03/12/2021 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
परिणती असो वा नियती पानगळीत पाने गळती पण, झाड उन्मळून पडता हा दोष कुणाच्या माथी? बहरून सळसळणारे झाड आपुल्या ताली जमिनीवर पडते तेव्हा ना त्याला उरतो वाली कोमेजून करपून जातील कोवळी फुले त्यावरची वेळीच छाटणी करवून रूजवात करा फुटव्यांची वादळ नवे येण्यापूर्वी मोकळ्या करा पखाली रूजणाऱ्या अंकुरांना घ्या मायेच्या हाताखाली - संदीप चांदणे (मंगळवार, ११/०५/२०२१)
काव्यरस

पुण्यावरून अदृष्य कॅमेरा मँन सह....... -कसरत

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 03/12/2021 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यावरून अदृष्य कॅमेरा मँन सह....... सकाळचे पावणे आठ वाजतायत, सहा वाजल्यापासून वाट बघतोय, आता कुठे थोड थोड दिसू लागलय. मिलटरीतली सगळे कापडे ,ब्लँकेट कामाला येत आहेत. घरी सामसूम आहे, बाहेर गाड्यांचे हाँर्न वाजतायत पण दिसत नाहीत. एकदम "भौक्क", केल्या सारख्या पुढे अचानक दिसतायत. सोसायटीतले चौकीदार कोपऱ्या कोपर्‍यावर शेकोट्या पेटवून कधी एकदा दिवसपाळी वाला येतोय वाट बघतायत. भटकी कुत्री शेकोटी जवळ येवू घुसायचा प्रयत्न करतायत पणचौकीदार त्यानां हाकलतायत,, बिच्चारी पुन्हा आपली पाय पोटात घेत इमारतीच्या आडोशाला मुटकूळे करून पडतायतं .

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 02/12/2021 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना २६ ऑक्टोबरचा दिवस! अतिशय थकवणा-या प्रवासानंतर मस्त झोप झाली. अलार्म ऑफ केला असूनही लवकर जाग आली. पूर्ण उजाडलेलं नसताना खोलीच्या बाहेर आलो. अहा हा! समोर एका दृष्टीक्षेपामध्ये अक्षरश: हजारो झाडं आणि घनदाट हिरवा रंग! सत्गडवरून एका दृष्टीक्षेपामध्ये किमान तीन हजार देवदार झाडं सहज दिसत आहेत! आत्ता कुठे जाणीव होते आहे की आम्ही मध्यरात्री कुठे आलो आहोत. आणि ही जाणीवही होते आहे की, आम्ही किती नशीबवान आहोत. ह्या सगळ्या परिसराची व दृश्यांचा आनंद घेताना जाम हुडहुडी भरत होती.