Skip to main content

ध्रांगध्रा-३

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 02/01/2022 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
" ते झाड मागे टाकून अर्धा तास झाला पुढे आलो आपण तु म्हणतोस तसा रस्ता कुठे दिसलाय? आपण पुढे तर नाही ना आलो? नाही रे . झाड मागे गेलं हे खरं, पण तुला वाटतं तसं ते वळण झाड गेल्यावर लगेच येणार नव्हतं तर थोड्या वेळाने नंतर म्हणजे थोडे आणखी चालल्यावर. आम्ही इतकं बोलतोय तोच समोरून कोणीतरी येताना दिसतय. लेंगा शर्ट, डोक्यावर गांधी टोपी,हातात पिशवी. "कोण असेल रे?" हळू हळू तो माणूस आमच्या जवळ येतोय.
मागील दुवा ध्रांगध्रा-२ http://misalpav.com/node/49721 "रामराम दादा " तो जवळ आला तशी महेशने त्याला हाक मारली.

लक्ष्मणपूर, एक पडाव......२

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 01/01/2022 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/49710 लक्ष्मणपूर, एक पडाव मीच लिहीलेला लेख आणी त्यावर मान्यवरांचे प्रतीसाद शांतपणे वाचताना वाटले की मी आपल्या सर्वांच्या बरौबर गप्पाच मारतोय. सर्वाचे धन्यवाद. नोकरी मुळे सतत बदली नवे शहर नवे लोक तेव्हा कळाले की शहराचा इतिहास आणी भुगोल जाणून घेणे आवश्यक आसते. त्यामुळे शहराची प्रथम दर्शनी ओळख होते. शहरातील पारंपारिक खुणा (conventional signs ) जर लक्षात ठेवल्या तर त्या शहरा मधे सहज फिरता येते. सैन्यात "नकाशा वाचन (मँप रीडिंग) हा एक खुपच महत्वाचा विषय.

अस्तित्व - बालकथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 01/01/2022 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्व ---------------------------------------------------------------------------------------------------------------- लोहगडाच्या पायथ्याशी वसलेलं आमचं गाव . आमच्या छोट्याशा गावच्या छोट्याशा शाळेत एक पाहुणे आले होते. आबा . आम्हां मुलांना भेटायला. शिक्षणातून आयुष्य कसं घडवता येतं , यावर त्यांचं भाषण होतं . शिक्षणाच्या माध्यमातून ते समाजसेवा करत होते . पावसाचे दिवस.पण पाऊस काही नव्हता.त्यामुळे आम्ही शाळेच्या मैदानातच होतो . लाल मातीमध्ये बसलेलो. तर आमच्या मागे, हिरवा झालेला लोहगड धुक्याची तलम पांढरी ओढणी पांघरून बसलेला. राजा आणि इतर पोरांची बडबड चाललेली .

ध्रांगध्रा - २

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 01/01/2022 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
पण काय करणार. दोस्त पडला ना. कुणीतरी म्हंटलय की शाळेत स्वतःला लागली नसतानाही मित्राला सोबत म्हणून मुतारीपर्यंत येतो तो तुमचा खरा दोस्त. लोक ना कायच्या काय संबंध जोडतात...... मागील दुवा ध्रांगध्रा - १ http://misalpav.com/node/49708 पण ही व्याख्या एकदम पटते मनाला. त्याने सांगताना सांगितलय "वणी" ... पण ते ठिकाण त्याही पुढे म्हणजे थेट "धोडप" च्या पायथ्याला आणलंय.

गुजरात सहल २०२१_भाग २

लेखक गोरगावलेकर यांनी शुक्रवार, 31/12/2021 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ येथे वाचा विजय विलास पॅलेस पाहून मांडवीतून कच्छच्या रन साठी निघालो. थोडी भूक लागायला सुरुवात झाली होती पण जास्त वेळ वाया घालवायची इच्छा नव्हती. वाटेत दाबेली आणि तसेच काही पदार्थ एका गावातील छोट्याशा स्टॉलहून खरेदी केले. बाकी घरून आणलेलेही काही खाद्य पदार्थ होतेच. गाडीतच जेवण झाले. भुज पार करून पुढे निघालो. एका ठिकाणी आपण काल्पनिक कर्कवृत्त रेषा ओलांडून पुढे आलो.

अद्भुताचे निळे पाणी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 31/12/2021 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीच्या अंगणात अठ्ठेचाळीस स्तंभांचा स्वर-व्यंजनी महाल माझ्या माय कवितेचा नभापार पोचतसे त्याची बेलाग ही उंची रेलचेल महालात जे न देखे रवि त्याची महालात जाण्यासाठी जिना जपल्या शब्दांचा आणि उतरण्या साठी सोपान हा गहनाचा चुनेगच्ची सौधावर नवरस पुष्करणी पितो मन:पूत तेथे अद्भुताचे निळे पाणी परवलीची एकच खूण इथे चालतसे एका हृदयीचे दुज्या सोपवावे लागे पिसे

एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 4 (600 किमी) 19 डिसेंबर 2021

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 31/12/2021 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
तिघांनी तीन फोन वर गजर लावून ठेवले होते. 11 ला पोहोचून 12 वाजता साधारण आम्ही झोपलो. 2 वाजता गजराच्या आधीच जाग आली. आवरून, कपडे बदलून, परत सगळी तयारी करून निघालो. खाली पार्किंग मध्ये आलो तर आमच्या सोडून फक्त 3 अजून सायकल होत्या. बाकी सगळे जण आधीच गेले होते. आपल्याला उशीर झालाय की काय या जाणिवेने पोटात गोळा आला. त्यात फक्त 2 तासाच्या झोपेवर अजून 300 किमी अंतर कापायचं होतं. जाणवून जरा दडपण आलं. पण थोडाच वेळ. एकदा सायकलवर बसलो आणि सुसाट सुरू झालो. पुन्हा एकदा तो मोठा पूल पार करून अंकलेश्वर वरून हायवे ला वळलो. साधारण तासभर झाला असेल चालवून एक मोठा फ्लायओव्हर आला.

"८३" च्या निमित्ताने - ८३ च्या आठवणी

लेखक फारएन्ड यांनी शुक्रवार, 31/12/2021 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
"...इंग्लैंड मे चल रहे विश्वकप के अपने पहले मॅच मे भारत ने वेस्ट इंडिज को हरा दिया है..." १९८३ च्या जून मधल्या कोणत्यातरी दिवशी संध्याकाळच्या बातम्यांमधे ही बातमी रेडिओवर ऐकली. तोपर्यंत अशी एक काहीतरी टुर्नामेण्ट इंग्लंड मधे होत आहे, त्यातील सामने एका दिवसाचे असतात, त्यांची रेकॉर्ड कसोटी तर सोडाच, पण "फर्स्ट क्लास" मधेही धरली जात नाहीत, भारताने याआधीच्या टुर्नामेन्ट्स मधे फारसे काही केलेले नाही. फास्ट खेळणे वगैरे आपल्याला जमणारे नाही अशा विविध गोष्टी आमच्या गप्पांमधे ऐकल्या होत्या.