लेखकमृगजळयांनी रविवार, 05/12/2010 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागील आठवड्यात बासुंदी करायचे ठरवले...कृती माहित नसल्याने तयार बासुंदी मिक्स
वापरले...पण म्हणावी तशी टेस्टी नाही झाली बासुंदी...जर कुणी मिपाकर खवा बासुंदीची कृती जाणत असेल तर ...कृपया मदत करावी...
लेखकप्रकाश१११यांनी रविवार, 05/12/2010 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षे झाली
मी इथे परदेशात येऊन बसलो आहे बाबा
देश सोडून येण इतकं सोपं असतं का बाबा ?--
आपल्या मातीचा वास
आपल्या घराचा सहवास गणपतीची आरास
हनुमानजयंतीला भल्या पाहटे उठून केलेली आरती
नि ते गुळखोबरे …..
लेखकगंगाधर मुटेयांनी रविवार, 05/12/2010 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मरण्यात अर्थ नाही.
संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही
जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही
आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही
ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे
आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही
ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे
जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही
हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही
गंगाधर मुटे
.....................................................
लेखकसरपंचयांनी शनिवार, 04/12/2010 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,
श्री दिपलक्ष्मी दिवाळी अंकाची आंतरजालावरील आवृत्ती मिसळपाववरून सर्वप्रथम उपलब्ध करून देताना मिसळपाव परिवाराला आनंद होतो आहे. या अंकाची मृद्रीत आवृत्ती मराठी साहित्य जगतात प्रसिध्दच आहे मात्र आता हा अंक सर्वत्र पोहोचायला सहज होईल.
खाली दिलेल्या दूव्यावर टिचकी मारून हा अंक उतरवून (डाऊनलोड) घेता येईल.
लेखकमृगजळयांनी शनिवार, 04/12/2010 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
तशी मिसळ पाव म्हणजे लहानपणा पासूनच माझा जीव कि प्राण...एन्जिनिएरिग नंतर पुण्यात आलो नोकरी साठी. मग काय "काटा-किर्र" , "नेवाळे मिसळ " यांच्या कडे जाने सुरु झाले...
लेखकइंटरनेटस्नेहीयांनी शनिवार, 04/12/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमसाकर मित्रांनो/मैत्रीणींनो..
बरेच दिवस म्हणजे खरंतर मिपाचा सदस्य झालो, तेव्हापासुन हा विषय मनात घोळत होता; आज म्हणलं लिहुन टाकु..
साधारणपणे वय वर्षे १४-१६ पासुन आपल्या मनात किशोरसुलभ भावना यायला सुरवात होते, म्हणजे ते साहित्यीक वगैरे जे शब्द वापरतात ना, मोरपंखी इ. तश्या. पण आपण नक्की ठरवु शकत नाही की आपल्याला नेमकं कोण आवडतंय ते.. म्हणजे त्या वेळेला सर्वच भिन्नलिंगी (आणि समवयस्क) लोकसंख्या आपल्याला आवडत असते अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दर १५ दिवसांनी आपण प्रेमात पडत असतो..
लेखकगवियांनी शनिवार, 04/12/2010 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस, गाडीचा नंबर चारसोबीस, थोबाडीत मारीन चूप बैस..
दिल्ले दान घेतले दान, पुढच्या जन्मी मुस्सलमान..
भेंडी गव्वार ललिता पव्वार..
ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका...
हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाही केस्..काय उप्पेग..?
हवालदाराचा पांडू पण हातात नाही दांडू..काय उप्पेग..?
दाद्या दाद्या खच्चून पाद्या..
एक दोन तीन चार XX हायस्कूलची पोरं हुश्शार्..चार पाच सहा सात XX हायस्कूलची कॉलर ताठ..नऊ दहा अकरा बारा XX हायस्कूलचा पहा दरारा..
रामाच्या दु.. कानात ऊ..
लेखकआपला अभिजितयांनी शनिवार, 04/12/2010 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, बघितलंत का, संजूबाबानं मान्यताला काय भेट दिलेय ती...? रोल्स रॉइस!'' चि. कुरकुरेंनी कधी नव्हे तो पेपर हातात घेतला होता आणि त्यावरून परममूज्यांना चाळवण्याची त्याला हुक्की आली होती.
""हो का? बरं!'' फार उत्सुकता दाखवणं श्री. कुरकुरेंना परवडण्यासारखं नव्हतं.
""अगं बाई, कुठला राईस? बरं झालं आठवलं. तांदूळ पार संपलेत! आणायला झालेत...अहो...''
""अगं आई, राईस नाही. रोल्स रॉइस! अडीच-तीन कोटींची गाडी आहे ती! त्यानं मान्यताला भेट दिली, तिच्या वाढदिवसानिमित्त!'' चि. कुरकुरे चिरकला.
""तिची मान्यता आहे ना एवढ्या खर्चाला? मग आपल्याला काय करायचंय?