मास्तरांच्या छडीसारखे कठोर दिवस !!...
मे संपून जून सुरु झाला की
निळ्या निळ्या आभाळात काळे काळे ढग यायचे
शाळा सुरु झाली की मास्तरांच्या छडीसारखे दिवस टोकदार नि कठोर व्हायचे
खरे म्हणजे दिवस कसे छान होते
गाभुळलेल्या चिंचेसारखे
आंबट चिंबट चवदार होते
शाळा सुरु झाली की सारेच बेचव व्हायचे
अभ्यास म्हटला म्हणजे बाबा….
काव्यरस
मिसळपाव