मामा ओ मामा
॥मामा ओ मामा ॥
शाळेतअसतानाची गोष्ट.
त्या अष्टकोनी दगडाच्या चकतीला महेश जिवापाड जपतोय. बॅगेत व्यस्थित गुंडाळून ठेवली आहे.तरीही तो ती पुन्हा पुन्हा तपासतो. खंदकात उतरण्यापूर्वी बॅग नीट बंद केली आहे. खंदकात पाणी आमच्या कमरेपर्यंत आलंय. माझा पाय कशात तरी अडकला. खाली पडणार तेवढ्यात महेश मला सावरतो. मी उभा रहातो.पण या गडबडीत महेशच्या खांद्यावरून सॅक निसटते. पाण्यात पडते. कशामुले काय माहीत . सॅक न तरंगता. थेट पाण्यात तळाला जाते.मागील दुवा ध्रांगध्रा - १८ http://misalpav.com/node/49824 महेश सॅक शोधायला खाली वाकतो. तो पाण्यात आडवा झालाय.त्याच्या पाठोपाठ मी ही.
" माझ्यावर विश्वास ठेव" महेश माझ्याकडे पहात बोलतो. " हो खात्री बाळग.... आपण मित्र आहोत. " महेशला खांद्यावर हात ठेवत मी दिलासा देतो. तो काय बोलणार आहे हे मला माहीत नाही. " तुला खोटं वाटेल पण मी खरं सांगतोय. विश्वास ठेव."आपण आलो त्या दिवसापासून मी झोपू शकलेलो नाही. त्या दिवशी तुला सोडलं आणि घरी गेलो. हातपाय धुवून झोपायला गेलो. थकलो तर होतोच. जरा डोळा लागला असेल माझा. हा मघाशी फोटोत दिसला ना तो स्वप्नात आला. रागारागाने पहात होता. दरडावून काहीतरी बोलत होता. विचारत होता. मला भाषा समजत नव्हती. पण मी खडबडून जागा झालो. खूप घाबरलो होतो. दरदरून घाम फुटला होता अंगाला.
काय? काय सांगायचंय तुला? आपण त्या ट्रीपवरून आल्यापासून मी झोपू शकलेलो नाही. डोळे मिटले की त्याचा चेहेरा डोळ्यासमोर येतो. रात्री सुद्धा मी त्यूबलाईट पूर्ण चालू करून ठेवतो रूम मधे अंधार झाला की त्याचा चेहरा दिसतो" हे सांगताना महेशच्या चेहेर्यावरची भिती लपत नाही.मागील दुवा ध्रांगध्रा - १६ http://misalpav.com/node/49814 " काय म्हणतोस ! कसला चेहेरा?" खरंतर महेशनं हे मला विचारलं असतं तर मी पण हेच सांगितलं असतं.