Skip to main content

डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग २

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 10/02/2011 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं..

तुझे गीत ओठी, तुझे हात हाती

लेखक महेश-मया यांनी गुरुवार, 10/02/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे गीत ओठी, तुझे हात हाती (चित्रपट मामला पोरींचा, गायक सुरेश वाडकर) कोणाकडे जर हे गाणे असेल तर त्याचि लिंक द्या, अथवा हे गाणे कोठे भेटेल ते सांगावे, आपला उपक्रुत महेश

कातरवेळ (शब्दचित्र )

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 10/02/2011 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेळ : कातरवेळ





आपल्या प्रतिसादांमुळे आणि गणपा भाऊंच्या सहाय्याने चित्रकवितेचा प्रवास मस्त सुरु झाला, आता जरा ब्रेक घेतो खुपच जास्त झाली चित्रे म्हणुन. एका महिन्यात एक नविन कविता लिहिण्याची बोंब असताना ३-३ चित्रे सलग बनवने म्हणजे जास्त झाले, आणि काम पण पाहिले पाहिजे ना, नाहितर घरीच कॅनव्हास घेवून बसायला लागयचे, हा नविन प्रकार हाताळताना मजा आली मात्र.

प्रवास...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 10/02/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दमलोय आता.. खूप लांबपर्यंत आल्याची जाणीव होतेय... माहिती आहे कि अजून काहीच प्रवास झलेला नाही... पण ह्या क्षणी खूप दमलोय. स्वतःला झोकून दिलेलं होतं ह्या गर्दीच्या प्रवाहात, कधी मी चाललो तर कधी ह्या गर्दीने मला चालवलं. आता थांबावसं वाटतंय. लांबपर्यंत कधी आलो कळलंच नाही मला. काल हातातून रेती सुटते तसा सुटत गेला आयुष्यातून. जबाबदारीचे ओझे खांद्यावर वागून दमलोय आता. हे ओझ खरच मला उचलायचा होतं का मीच ते उचललं हे सुद्धा समजत नाही.

१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?

लेखक टारझन यांनी गुरुवार, 10/02/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , अ‍ॅज यु वॉल णो .. चवदा फेप्रुवारी येऊन घातलेली आहे ... बरेचशे तुंबलेले बोळे मोठ्या मोठ्या अपेक्षा मनात ठेउन ह्या दिवसाची गेल्या पंधरा फेप्रुवारी पासुन वाट बघत आहेत... काहींच्या गाड्या सुटल्या तर काहींना गाडया भेटल्या .. काही भेटलेल्या गाडीतुन उतरले आणि पुन्हा नव्या गाडी मागे धावत आहेत ... काही मात्र अजुनही त्या गाडीला लटकुन आहेत .. तर अशा सगळ्यांच्या भावनांचा विचार करुन एक जनहितार्थ धागा काढावा अशी हाक मला अंतर्मनातुन आली . आणि हा धागा काढल्या गेला. आपण सगळे तर जाणतात, मिपावर कशाची मदत मिळत नाही ? गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचं काय करायचं ?

फक्त मिसळपावमुळे

लेखक अनिल आपटे यांनी गुरुवार, 10/02/2011 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त मिसळपावमुळे आम्हाला लिहायला उत्साह येतो आम्हाला नवीन माहिती मिळते आम्ही निसर्गाची विविध रूपे पाहतो एकमेकांच्या आनंदात सहभागी होतो फक्त मिसळपावमुळेच अनिल आपटे