Skip to main content

अ‍ॅपल पुडींग

लेखक स्नेहश्री यांनी शनिवार, 26/02/2011 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज विकेंड.. त्याची तयारी मात्र काल पासुन सुरु केलीय. आज आमच्याकडे मुंज मुलाला केळवण आहे. त्याला आवडेल अस पुडींग आणि अजुन एक डेझर्ट्चा प्लान आहे. एक पुडींग रेडी आहे.. आणि डेझर्ट् रेडी होत आहे. तर आज पुडींग ची रेसिपी देते. साहित्यः ४/५ सफरचंद ३/४ चमचे साधी साखर (सफरचंदाच्या गोडी नुसार) १०/१२ मारी बिस्कीटाचा चुरा व्हिप्ड क्रीम २ चमचे पिठीसाखर व्हॅनिला इसेंस स्ट्रॉबेरी क्रश सजावटीसाठी:- चेरी, द्राक्ष, जेम्सच्या गोळ्या, चॉकलेट सॉस. कृती: १. सफरचंदाची साले काढुन ती किसुन घ्यावीत २.

वि दा सावरकर

लेखक अवलिया यांनी शनिवार, 26/02/2011 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
विनायक दामोदर सावरकर. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी होण्यासाठी ज्या अनेकांचे योगदान लाभले त्यातील एक अग्रणी नाव. या नावाचा उल्लेख केल्याखेरीज भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची कथा पूर्ण सांगितली जाणार नाही. राजकारण, विज्ञान, साहित्य, समाजकारण, धर्म इत्यादी जवळपास सर्वच क्षेत्रात सावरकरांनी आपल्या विचारांचा ठसा उमटवला आहे यात शंका नाही. दूरदृष्टी असलेला द्रष्टा नेता हे बिरुद ज्या थोड्या लोकांना शोभुन दिसते अशांपैकी एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर.

हुकुमशहांना विनोदाचं वावडं का असतं?

लेखक चिंतातुर जंतू यांनी शनिवार, 26/02/2011 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा गटाच्या (उदा: मराठी संकेतस्थळांचे संपादक! सं.मं: ;-) ह. घ्या. बरंका!) विषयी पसरणारे विनोद हे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात असणाऱ्या रागाचं द्योतक असतीलच असं नाही. उदा: बेल्जिअन लोक मूर्ख असतात असं दाखवणारे पुष्कळ फ्रेंच विनोद लोकप्रिय असूनही बेल्जिअन लोकांविषयी फ्रेंचांना विशेष राग आहे असं दिसत नाही. आपल्याकडेही ‘संता-बंता’सारखे विनोद शीख लोकांना मूर्ख दाखवतात, पण शिखांविषयी फार राग जनमानसात आढळत नाही. उलट एखाद्या व्यक्ती/गटाविषयी असणाऱ्या द्वेषाचं रुपांतर विनोदांमध्ये होईलच असंही नाही.

आंतरजालावरील लघुरूपे - मदत करा.

लेखक नीलकांत यांनी शनिवार, 26/02/2011 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाववरील नवीन सदस्यांसाठी उपयोगास येतील अशी मदत पाने सध्या मी बनवतोय. याच वेळी नवीन सदस्यांना जुणे सदस्यं जे लघुरूपे वापरतात त्याची एका जागी माहिती दिली तर योग्यं होईल अशी कल्पना आली. मात्र माझ्याजवळ अशी यादी तयार नाही. मला येथे तुम्हाला माहिती असेल ती मराठी आंतरजालावर वापरली जाणारी मराठी लघुरूपे द्यावीत ही विनंती. माझे योगदान :- प्रकाटाआ - प्रतिसाद काढून टाकला आहे. पुलेशु - पुढील लेखनासाठी शुभेच्छा कलोअ - कळावे लोभ असावा. मग तुम्ही काय सुचवताय? :) - नीलकांत

उजाडलेच नाही आज...

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 25/02/2011 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
उजाडलेच नाही आज दिवस होते झोपून रात्री ने सोडले नाही हात तिच्या गोड कुशीतून मी राहिलो पाहत वाट होते तिला भेटायचे दिवस कुठे उजाडे कधी त्यास कळायचे जेंव्हा होते प्रेम होतात दिवस छोटे विरह भेदते मनाला सरता न रात्र सरते शोधू लागलो वाटा अंधारातच तिच्या ओढी कुठे होते ठाऊक वाट ही थेट स्वप्नात तिच्या पोहोचते उजाडलेच नाही आज दिवस होते झोपून रात्री ने सोडले नाही हात तिच्या गोड कुशीतून

समुद्र किनारा आणि मी..

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 25/02/2011 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी समुद्र किनार्या वर उघड्या पायांनी चालतांना उडणाऱ्या पक्ष्यांचे आवाज ऐकतांना आणि डुलणार्या होडी पाहतांना तुझीच आठवण येते दूर नभात उजाड्तांना थंड लाटा भिजवतांना पायात शिंपले टोचतांना तुझीच आठवण येते किनाऱ्याची मिठी मारतांना लाटांचे फेस जवळ येतांना सुसाट वारा केस उडवतांना तुझीच आठवण येते एका हातात चपला धरूनी चालतो आहे मी काही शोधत खाली बघत पण खंर तर काहीच दिसत नाही मला आणिक काहीच ऐकू येत नाही सगळे जसे थांबले आहे ...आणि ... भासते अचानक मला... त्या लाटा आत्ता पाण्या च्या नाहीत त्या तुझ्या बरोबर जगलेल्या प्रत्येक क्षणाच्या आ

आमचेही क्रिकेट

लेखक हरिप्रिया_ यांनी शुक्रवार, 25/02/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटचे सुरु झालेले महासंग्राम आणि त्या निमित्ताने मिपाने दिलेल व्यासपीठ..त्या निमित्ताने माझ्याकडून हा प्रयत्न... आम्ही BE ला असतानाची ही गोष्ट. आमच्या D.Y.Patil College Of Engg,कोल्हापूरला २५ वर्ष पूर्ण झाली होती. त्या निमित्ताने कॉलेज मध्ये अनेक नवीन गोष्टी सुरु होत्या. २५ वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन वगैरे दणक्यात साजरा करून झाल होत.

"*जग साल्या जग"

लेखक जगप्रवासी यांनी शुक्रवार, 25/02/2011 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आयुष्य असच रेटत असताना अगदी थकायला होतं.

मामा च्या गावाला जाऊ या....

लेखक चिप्लुन्कर यांनी शुक्रवार, 25/02/2011 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
मामा च्या गावाला जाऊ या.... नमस्कार मंडळी , या मे महिन्यात मी व माझा मित्र दि. १० मे २०११ ते १५ मे २०११ या दरम्यान कोकणात संगमेश्वर नजीक लोवले या गावात " मामाच्या गावाला जाऊया " अश्या एका ट्रीप चे आयोजन करत आहोत. या ट्रीप मध्ये कोकणातील एका छोट्याश्या गावात घरच्या खेळीमेळीच्या वातावरणात राहायला तसेच मनसोक्त आंबे , फणस आणि इतर रानमेवा चाखायला मिळणार आहेत. तसेच घराजवळील रानात हुंदडायला आणि नदीतील डबक्यात डुंबायला मिळणार आहे. कोकणातील आढळणारे पक्षी , फुलपाखरे आणि साप यांच्याविषयी माहिती शिबीर तसेच जवळील काही पर्यटन स्थळे पाहणे असे आयोजन आम्ही करत आहोत.