Skip to main content

वेटिंग फॉर गोदो

लेखक भागो यांनी रविवार, 10/04/2022 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाऊ हा शिस्तीचा पक्का होता. सकाळी सहा वाजता उठणार म्हणजे उठणार. आजही तो बरोबर सहा वाजता उठला. सकाळी महत्वाचे काम म्हणजे बागेला पाणी द्यायचे. पाणी दिले नाही तर झाडे कोमेजून जाउन माना टाकायची, त्याच्याकडे आशेने बघत रहायची. त्याला मग त्यांची दया यायची. बंगल्याच्या आजूबाजूची ही आटोपशीर बाग छोट्या मालकांनी स्वतःच्या हातांनी लावलेली होती. त्याबागेत काय नव्हते? डबल मोगरा, अबोली, जाई जुई, निरनिराळ्या जातीचे गुलाब. आणि हो एकाच वेलीवर पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुले देणारी बोगनवेल! जशी फुलझाडे होती तशी रानटी झाडे पण होती. भाऊ एकदा रान साफ करायला गेला.

विजेची गोष्ट ६: विद्युतचुंबकीय क्षेत्राचे पणजोबा जेम्स क्लार्क मॅक्सवेल ( Beginning of Telecommunication)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 10/04/2022 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
टीप: प्रदीर्घ शीर्षकामुळे मिपाच्या नवीन लेखन ट्रॅकरची रुंदी प्रचंड वाढत असल्याने शीर्षकाची लांबी कमी करत आहोत. -मिपा व्यवस्थापन. अनेक दिवस चाललेल्या युद्धाचा आज अंत झाला होता . शत्रूराष्ट्राने केलेल्या हल्ल्याला विक्रमाच्या सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं . साऱ्या सीमांवर प्राणपणाने लढणाऱ्या विक्रमाच्या सैन्याने शत्रूच्या सैन्याला पुरतं घाबरून सोडल होतं.

पानकम आणि कोसांबरी

लेखक यश राज यांनी रविवार, 10/04/2022 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स. आज रामनवमी व त्याबद्दल आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा. रामनवमी निमीत्त आज मी दोन पाककृती मिपावर सादर करत आहे. पानकम व कोसांबरी. दक्षिण भारतामध्ये( प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र व तमिळनाडू) मध्ये भगवान राम यांना या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. भारतीय(हिंदू) पंचांगा प्रमाणे वर्षाचे ६ ऋतू मध्ये विभाजन होते व त्या त्या ऋतू मध्ये वातावरणातल्या बदलानुसार आहार विहार सुद्धा ठरलेला असतो व त्याप्रमाणे देवांचा नैवेद्य ही बनवला जातो. होळी गेल्यानंतर वातावरणात उकाडा सुरू होतो व त्याचबरोबर मानवी शरीरामध्ये सुद्धा उष्णता निर्माण व्हायला सुरुवात होते.

फ्रेंच राष्ट्रपतींचा राजप्रासाद

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 08/04/2022 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरिसमध्ये एलिझे पॅलेस (फ्रेंच भाषेतील नाव – Palais de l’Élysée) उभारला जाईपर्यंत तो परिसर गुरांना चरण्यासाठीचे माळरान म्हणूनच वापरला जात होता. 17व्या शतकात या जागेचा मूळ मालक अर्मांद-क्लाऊद मोलेत याने ही जागा हेंरी लुईस दे ला तूर द’आउव्हर्गन याला विकली. त्यानंतरची अनेक वर्षे या परिसराची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे जात राहिली. त्यामुळे त्या जागी 17व्या शतकात उभारलेल्या टाऊन हॉलच्या रचनेमध्येही सतत बदल होत राहिले. या राजवाड्याचे अगदी अलीकडचे नुतनीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर करण्यात आले होते. सोळाव्या लुईकडे या राजवाड्याची मालकी आल्यावर येथे विशेष राजदुतांच्या निवासाची सोय करण्यात आली होती.

कविता वसंत ऋतु

लेखक VRINDA MOGHE यांनी बुधवार, 06/04/2022 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
- *वसंत ऋतु* टपो-या कळीचे होई फुल, दरवळे सुंगध मोग-याचा, जाई, जुई, चाफा ही फुलतो, शिडकावा होई प्रसन्नतेचा !! अत्तराच्या कुप्या जणू का फुलांमधी लपल्या असती, सुगंध तयांचा वा-यासवे , वाहत राहे सभोवती !! पळस,पांगारे, निलमोहर, झुंबर पिवळे बहाव्याचे, लाल,निळ्या या रंगछटांनी सौंदर्य बहरते सृष्टीचे !! पक्षी झाडांवरी आनंदे, किलबिलती, विहरत जाती, कोकीळही मंजूळ स्वरांनी वसंतॠतुचे स्वागत करिती !! ग्रीष्माच्या दाहक झळांनी, धरती

पी रामराव.(एफ आर एस डी)(संपूर्ण)

लेखक भागो यांनी रविवार, 03/04/2022 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
पी रामराव.(एफ आर एस डी) जगप्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव. बाय अपॉइटमेंट ओन्ली. ही दरवाज्यावरील पाटी वाचून टरकून जायची मुळीच गरज नाही. ह्या क्षणी रामराव ऑफिसमध्ये टेबलावर पाय टाकून आपली नखे साफ करण्यात गुंतले होते. बेकार डिटेक्टिव दुसरे काय करणार? ‘ह्या क्षणी’ अस म्हणण्यातही काही अर्थ नव्हता. रामराव द ग्रेट गेले दोन अडीच तीन महिने दररोज नखे साफ करत होते. डोक्यात तुंबलेल्या बिलांचा विचार चालू होता. बँक बॅलंस अॅबसोल्युट मिनिमम लेवेलला आला होता. बँक आता फाईन लावणार अशी परिस्थिती झाली होती. दुष्काळात तेरावा महिना. दोन महिन्यांचे ऑफिसचे भाडे तुंबले होते.

मरीआई बारागाड्या यात्रा

लेखक बाजीगर यांनी रविवार, 03/04/2022 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
भुसावळात बारागाड्या ओढताना भीषण दुर्घटना; एक भाविकाचा मृत्यू, चौघे जखमी https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/one-devotee-was-l… मरीआईची यात्रा बारा गाड्या भाविक मेला मोडून बरगड्या भगताला झाल्या म्हणे गाड्या अनियंत्र अडाण्यांनो, यासाठीच इंजिन ब्रेक यंत्र ह्या जुनाट प्रथांमधे आहे का काही अर्थ? काही असो मरीआई ने केले नाव सार्थ !!

परदेशवारी -४ छायाचित्रण

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/04/2022 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशवारी -४ छायाचित्रण http://www.misalpav.com/node/49857/backlinks- परदेशवारी १ http://www.misalpav.com/node/49893/backlinks-परदेशवारी३ http://www.misalpav.com/node/49981/backlinks-परदेशवारी३ एकच झाड पण सहा ऋतूंचे सहा सोहळे....... mi 1

कळले मला न काही.

लेखक Deepak Pawar यांनी शनिवार, 02/04/2022 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
कळले मला न काही हा रुसवा कशास सजणी डोळ्यात दाटले का हे आता तुझ्या ग पाणी. कसला म्हणू अबोला तू गुमसुम कशास असशी सांगून टाक आता जे सलते मनात राणी. येता धुके असे हे बघ दाटून प्राक्तनाचे जवळी असून सारे ते अपुले असे न कोणी. ही रात चांदण्याची बघ भिजली दवात सारी या चांदण्या क्षणात कुणी गाते उदास गाणी.
काव्यरस