Skip to main content

श्री दीपलक्ष्मी ( आंतरराष्ट्रीय्)ऑगस्ट २०११

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 08/08/2011 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच शिकागो येथे भरणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १५ अधिवेशनानिमित्त काढलेला श्री दीपलक्ष्मी आंतरराष्ट्रीय ( ऑगस्ट २०११) चा अंक हातात आला. आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो अथ तो इती वाचून काढला. अंक वाचताना एक समाधान मिळाले त्याचबरोबर थोडा अपेक्षा भंगदेखील झाला. अंक आंतररष्ट्रीय आहे ही एक उत्सुकता होतीच . भारताबाहेरील मराठी लोक काय लिहीत असतील या बद्दल कुतुहल होते. नाना पाटेकर , गिरीश कुबेर , अनंत सामंत सुप्रीया विनोद( सुप्रीया मतकरी) यांच्या लेखांची रेलचेल होती. अंकातील लेख सुंदर आहेच.

झणझणीत पिठले...

लेखक निवेदिता-ताई यांनी सोमवार, 08/08/2011 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- बेसन पिठ एक वाटी, हि. मिरच्या पाच-सहा, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य, मिठ.कांदा एक बारीक चिरुन, जिरे - लसुण पाच सहा पाकळ्या- खोबरे एक छोटा तुकडा.थोडे लाल तिखट. कॄती - जिरे - लसुण पाच सहा पाकळ्या- खोबरे एक छोटा तुकडा व मिरची हे सर्व मिक्सरमधुन वाटून घ्यावे. खमंग फोडणी करावी.त्यावर वरील वाटण परतुन घ्यावे, कांदा परतावा, आता त्यात दोन वाट्या पाणी घालावे, चवीनुसार मिठ घालावे, कोथिंबीर बारीक चिरुन घालावी.

नैवेद्य १) मोदक

लेखक जागु यांनी सोमवार, 08/08/2011 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम वंदनिय गणपती म्हणुन गणपतीच्या मोदकाने सुरुवात करत आहे. तसे आमच्याकडे नागपंचमी ह्या पहिल्या श्रावणातल्या सणालाच नागोबाच्या नैवेद्यासाठी मोदक करण्याची प्रथा आहे. साहित्य तांदळाचे पिठ मिठ १ ओला नारळ खरवडून गुळ खसखस चारोळी/काजु/आक्रोड/मनुका वेलची/केसर तुप पाककृती तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या. गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला. थोडा वेळ परतुन गॅस बंद करा. आता १ ते दिड ग्लास पाणी घेउन त्यात मिठ टाकुन गरम करण्यासाठी ठेवा.

सरकार जिंकले जनता हारली

लेखक आशु जोग यांनी रविवार, 07/08/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
मनमोहन सरकारने काही महिन्यांपूर्वी लोकपाल विधेयक बनविण्याचे मान्य केले त्या समितीमधे सरकारमधील काही मंत्री आणि काही इतर व्यक्ती समाविष्ट होत्या या सार्‍या खटाटोपाचा गाभा हा होता की पंतप्रधानांसकट सर्व उच्चपदावरील व्यक्ती कायद्याच्या कक्षेत याव्यात विधेयकाचा मसूदा ठरविण्यासाठीच्या बैठकांना सुरुवात झाली, बैठकींचे व्हिडीओचित्रण व्हावे ते जनतेला पाहता यावे अशीही काही सदस्यांची इच्छा होती. पण ही मागणी अजिबात मान्य झाली, पारदर्शकतेला सुरुवातीलाच नकार देण्यात आला नंतरच्या काळातही सरकारची विधेयक आणण्याची इच्छा कुठे दिसेना अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांच्या बदनामीची मोहीम सरकारमधीलच काही लोक रा

अंधार

लेखक अभिजीत राजवाडे यांनी रविवार, 07/08/2011 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांच्या सुंदर वाटेवर ,मी धडपडतो आहे, समईची येते याद, अंधार वाढतो आहे. मोत्यांना मानेवरच्या, शेवटी पाहिले होते, शुभ्रधवल तो मोती, नयनात दाटतो आहे. तुटलेल्या त्या नात्यांना मी किड लावली होती, इतुकी की माझ्या मी, मनात सडतो आहे. माहित नाही मजला गाडलो किती मी आहे घावात क्षणाच्या येथे, मी अजुन सापडतो आहे.

चांदणपक्षी

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 07/08/2011 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक होतो जागा चांदणपक्षी झेलीत विस्फारल्या नजरा भुभुक्षी विरलेले होते घाव सारे. थिजलेले होते डाव कोरे. घन तिमीर दाटे काय कोसळत्या जलधारांचा प्रकोप पाखरांचा होता आक्रंदत दिवस रात तो कोण होता कैसा चाखेन म्हणे मुक्त ऐसा मोकाट होतो वारा गात्री पिसासुन घे भरारी जळ काय झाकोळले कर्दमात पारवे बुडाले क्षितीजाच्या पलीकडले एक झाड जळाले. ते स्वप्न कोणी माळले वक्षी जेंजारूनी भाळले भात्यांच्या नशीबी शेवटी रीकामेच प्राक्तन आले. घे एक भरारी काय आभाळाला फुटती पाय कोण कोण मागे पडती ते सारे बैल आणि गाय सरीसृप सारेच होते राजे आपापल्या बिळात वणवा पेटवी रान तोडून तंद्री बेभान प्राशूनी रक्त सारे सुरे तेजाळ
काव्यरस

लेखक व समिक्षकांतील परस्पर नातेसंबंध

लेखक प्रदीप यांनी रविवार, 07/08/2011 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन येथून प्रकाशित होणार्‍या 'फायनॅन्शियल टाईम्स' च्या ह्या शनिवारच्या अंकात फ्रान्सिस व्हीन ह्या लेखक- समीक्षकाचा, लेखक व समीक्षक ह्यांच्यातील नातेसंबंधाविषयावर एक सुंदर लेख आला आहे. अलिकडेच तेथील हायकोर्टाने सेरा थॉर्न्टन ह्या लेखिकेस, तिच्यावर केलेल्या एकाच टीकात्मक लेखावरून, ६५,००० पाँडाची नुकसान भरपाई बहाल केली. सदर टीकात्मक लेख डॉ. थॉर्न्टन ह्यांच्या 'Sevena Days in the Art World' ह्या पुस्तकावर, लाईन बार्बर ह्यांनी लिहीला होता. हा कोर्टाचा निकाल, फ्रान्सिस व्हीन ह्यांच्या लेखाची प्रेरणा आहे.

मिक्स व्हेज फ्रित्ताता | Mix di verdure Frittata

लेखक पांथस्थ यांनी रविवार, 07/08/2011 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आज बर्‍याच (मोठ्या) कालावधीनंतर पाकृ टाकत आहे. लिहण्याची प्रेरणा - सहज, गणपा, धमाल शेठ :) आज आपल्या समोर पेश आहे इटालियन ऑम्लेट - मिक्स व्हेज फ्रीत्ताता - Mix di verdure Frittata. मस्त रविवार सकाळ असावी. एकदम निवांतपणा असावा. सावकाश पेपर वाचत वाचत फ्रित्ताता चा आनंद घ्यावा. मग एखादा कप कॉफीचा. थोडा वेळ टि.व्ही. पुढे. दुपारची झोप.