Skip to main content

कसं जगायचं असतं ?

लेखक महाबळ यांनी रविवार, 20/11/2011 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
कसं जगायचं असतं ? ------------------------------------------------------------------------------------------------------------ कष्टातूनच फळ मिळवायचं असतं, त्यागातूनच बळ कमवायचं असतं, असंच जगायचं असतं. निरागस बालकासारखं स्वच्छंद आयुष्य अनुभवायचं असतं, आणि मग त्याच कोमल चेहेऱ्यावरील हास्य बनण्याचा प्रयत्न करीत राहायचं असतं, असंच जगायचं असतं.

'एका दिशेचा शोध' - पुस्तक परिचय

लेखक तिमा यांनी रविवार, 20/11/2011 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
'एका दिशेचा शोध' हे संदीप वासलेकर यांनी लिहिलेले नवीन पुस्तक आहे. लेखक हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एक विचारवंत आहेत. मुंबईत त्यांची ' स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप' नांवाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांशी त्यांचा सतत संवाद असतो. डोंबिवलीच्या एका छोट्या शाळेपासून सुरु झालेला त्यांचा जीवनप्रवास हा थक्क करणारा आहे. या पुस्तकात भारताच्या उज्वल भविष्यासाठी अनेक मुद्यांवर सांगोपांग चर्चा केलेली आहे. या जगातील आपल्या देशासारखी वा त्याहूनही वाईट स्थिती असलेल्या देशांनी, त्यातून बाहेर पडून आपली सर्वांगीण प्रगति कशी करुन घेतली याविषयीची माहिती अत्यंत उदबोधक आहे.

मिक्स पराठा ...

लेखक पियुशा यांनी रविवार, 20/11/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
मिक्स पराठा.
साहित्य : गव्हाच पीठ ४ वाट्या ,बेसन पीठ १/२ वाटी, उकडलेले बटाटे ४-५ , कोथिंबीर बारीक चिरलेली आवडीनुसार , १ छोटा चमचा जीरा पावडर , एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला , आल-लसूण पेस्ट १ चमचा , पुदिन्याची पान बारीक चिरून ( यात तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता ) आवडीनुसार .हिरवी मिरची पेस्ट एक चमचा ,२ मध्यम कांदे बारीक चिरून ,हळद, मीठ चवीनुसार (चाट मसाला ऑपशणल) , बटर / तूप कृती : गव्हाच पीठ , बेसन

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे -

लेखक विदेश यांनी रविवार, 20/11/2011 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल:- जीवनात ही घडी अशीच राहू दे) अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे पेट्रोलच्या टाकीवरी गंज वाढु दे ||धृ|| रंगविले गॅरेजात कितिक देखणे आवडले गाडीला खूप खर्चणे स्वप्नातही बंद ना कधीच वाटु दे |१| हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा वर्षातुन छंद बंद कधि न होऊ दे |२| ...पाहु दे असेच तिला आता गंजता राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता महागाईत पायपीट सार्थ होऊ दे |३|

आंब्याचे फळ

लेखक सदानंद ठाकूर यांनी रविवार, 20/11/2011 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच माझा एक म्युच्युअल फंडाचा ग्राहक ऑफिसमध्ये भेटयला आला होता, तुम्ही ती आंब्याची गोष्ट मागे सांगीतलीत म्हणून मी म्युच्युअल फंडात एसआपी सुरू केली व ती अजून चालू आहे व आता मला तिचा चांगलाच फायदा झाला आहे, धन्यवाद. मग मला ती मी त्याला सांगीतलेली गोष्ट आठवली. ७/८ वर्षापुर्वी तो ग्राहक माझ्याकडे गुंतवणूकीचा सल्ला मागायला आला होता, तेव्हा त्याने विचारले कि मला म्युच्युअल फंडात थोडी गुंतवणूक करावयाची आहे कसे काय करु ते सांगा तेव्हा मी त्याला प्रथमत: म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचे सगळे फायदे व तोटे सांगीतले व जर तुला यात गुंतवणूक करावयाची असेल तर मी तुला एक माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट सांगतो.

मी कागदावर सांडत गेलो

लेखक अविनाश खेडकर यांनी रविवार, 20/11/2011 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
कवित्व नाही माझा बाणा मी नच असे थोर कवी तो लिहिले ज्यांनी काव्यग्रंथ अन् समाज ज्यांना थोर मानतो कधी न केली कसली ईर्षा कुणी लिहिलेल्या काव्यत्वाची तुम्ही नभीचे सुर्य तळपते ना मज क्षमता काजव्याची आवडले जे जेंव्हा जेंव्हा शब्द सुमने उधळीत गेलो काळोखाच्या साम्राज्यावर मी शब्दाचा प्रकाश झालो मनात ऊठले वादळ तेंव्हा विचार माझे लिहिते झाले ना मात्रांशी सोयर माझे वृतांनी मज दूर लोटले अनुभवले जगण्यातून जे जे मनात सगळे मांडून घेतो कधी मनाला भरती येते अन् मी कागदावर सांडत जातो.

एक प्रेमकहाणी, अशीही !

लेखक चाफा यांनी शनिवार, 19/11/2011 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
स्मिताली, कालची तुझी भेट आठवली की अजुनही नजरेसमोर तो प्रसंग उभा रहातो. तुफानी पाउस.. आगदी एखाद्या गुन्हेगाराला पोलीसांनी झोडपुन काढावा तसा, आख्या शहराला झोडपत सुटलेला पाउस, त्यात कार्पोरेशनच्या कृपेमुळे तृप्त होऊन तुडुंब भरुन वहाणारी गटारं. मला आठवतयं तु माझ्या या उपमांमुळे खळाळुन हसली होतीस, पण मला दुसरी उपमा वेळेवर सुचलीच नाही त्याला मी काय करणार ? माझी जगाकडे पहाण्याची नजरच जरा उपहासपुर्ण आहे हे खरं. असो, त्या साठलेल्या गुढघाभर पाण्यात तु बंद पडलेली स्कुटी घेउन उभी, तुझा भांबावलेला चेहरा अजुनही मला आठवतोय.