Skip to main content

युगलगीत: गार गार वारा अंगाला झोंबला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 26/11/2011 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत: गार गार वारा अंगाला झोंबला
तो: गार गार वारा अंगाला झोंबला तुझी साथ हाय माझ्या उबार्‍याला ती: नका जावू पुढं थांबा की थोडं आसं शोभत नाय तुम्हाला तो: आगं तू येडी का खुळी काय बोलतीया अवेळी आगं काय म्हनू मी तुला? ती: काल रातीला एकटीच व्हते घरात नव्हतं कुनी तुमी यावं आसं वाटलं पन आला नाय तुमी आज आला तर थांबा थोडं गुलुगुलु बोलू गोड गोड गुलाबी थंडीचा मोसम ह्यो आला तो: आंगाश्शी..गार गार वारा अंगाला झोंबला तुझी साथ हाय माझ्या उबार्‍याला तो: देव देव कराया नवस बोलाया आईबाप गेलं तुझं पंढरीला तु अन मी मी अ
काव्यरस

आमच्या या कल्पनेबद्दल काय वाटते?

लेखक अंबाजोगाईकर यांनी शुक्रवार, 25/11/2011 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही काही मित्र मिळुन एक मराठी मोबईल मॅगझिन सुरु करन्याच्या विचारात आहोत. पण आम्ही थोडे साशंक आहोत याला प्रतिसाद कसा मिळेल. म्हणुन आम्ही मिपा करांना याविषयी काय वाटते हे जाणुन घेणार आहोत. तर मग आपल्याला आमच्या या कल्पनेबद्दल काय वाटते? आपल्या मताची आणि सुचनांची आम्ही वाट पाहत आहोत. लवकर रिप्लाय द्या. आम्हाला या आधि मोबईल कंटेंट डाउनलोअडींग साइट्स् चा अनुभव आहे. कामापुरती PHP, CSS, xHTML येते. तर मग मिपा करांचा आणि मराठी ब्लॉगर लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय यावर आम्हि पुढिल कार्यक्रम ठरवू. वि.सु.

हिर्‍यांचे हार

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 25/11/2011 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्या कोवळ्या उन्हात लुसलुशीत गवतावर फिरत असताना अचानक पायाशी एका गवतहीन भागात एक सुबक जाळे दिसले. shoot निरखुन पाहता लक्षात आले की सूक्ष्म दवबिंदुंनी जाळ्याचे धागे पूर्णतः आच्छादले गेले आहेत. प्रत्येक थेंब सुबक गोलाकार पैलु न पाडलेल्या पण उपजतच गोलाकार असलेया हिर्‍यासारखा आणि जाळ्याचा प्रत्येक धागा हिर्‍याच्या हाराच्या एकेका पदरासारखा. जसजसा प्रकाश त्या जाळ्यावर खेळु लागला.

खेकड्यांची कलाकुसर

लेखक जागु यांनी शुक्रवार, 25/11/2011 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही समुद्रकिनार्‍यावर गेलो की ओहोटी असेल तर किनार्‍याच्या ओलसर वाळून हमखाच खेकड्यांची बिळे दिसतात. मला ही बिळे पहायला नेहमीच आवडतात कारण त्या बिळांच्या बाजूला सुंदर नक्षीकाम तयार झालेले असते. हे खेकडे अगदे छोटे असतात. मधूनच ते तुरु तुरु किनार्‍यावर चालतानाही दिसतात.

थापाच मारणारा -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 25/11/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
संसार हा सुखाचा दोघात चाललेला पत्नी मुकी मनाचा संवाद साधलेला त्या कुंपणावरी का ठेवू असा भरोसा शेतास खाउनीया ज्यानेच घात केला का सापळ्यात आला उपदेशतो सभेला नादात तोच नेता मोहात लालचेला थापाच मारणारा अजुनी सभेत दिसता निवडून तोच येता मतदार भारलेला भजनात आळवीता भावात देव आहे बाजार का न सहता तो भाव वाढलेला