Skip to main content

कोंबडी म्हणाली कोंबड्याला

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 30/12/2011 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
'पहाटे ओरड पाहिजे तेवढे-' कोंबडी म्हणाली कोंबड्याला, 'ऐकावी लागणार दिवसभर नंतर पक् पक् माझी तुला !' मांजर निघाले घाईघाईत शिकार उंदराची करायला - आडवा आला माणूस नेमका परतावे लागले मांजराला ! मुंगळयाने पाहिली गुळाची ढेप निघाला तुरुतुरु खायला - मधेच एक माशी शिंकली माणसाच्या पायाखाली आला ! एक खेकडा सकाळी उठला पूर्वेकडून पश्चिमेला निघाला - संध्याकाळ होईपर्यंत उत्तरेला नेमका पोहोचला !

आता मतदार जागृती अभियान. अण्णा, देअर यू आर..!

लेखक कॉमन मॅन यांनी शुक्रवार, 30/12/2011 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसातल्या घटना - १) दर दोन महिन्यांनी मोठमोठ्या गर्जना करून टीम अण्णांनी भारतीय घटनेला आणि आपल्या सार्वभौम अशा संसदेला सो कॉल्ड जन-आंदोलनांच्या धारेवर धरणे, २) टीम अण्णांकडून (आणि काही वेळेला खुद्द अण्णांकडूनही) झालेल्या बेताल वक्तव्यांमुळे, ३) जनलोकपालबाबत 'माय वे ऑर हाय वे..' अशा हुकुमशाही अडेलतट्टू आणि इगोइस्टिक भूमिकेमुळे, ४) सर्वच पक्षात भ्रष्टाचार बोकाळला असताना केवळ काँग्रेस पक्षाबाबतच 'अँटी करप्शन ऐवजी अँटी काँग्रेस' असा छुपा अजेंडा घेऊन आगपाखड केल्यामुळे, (आजतागायत लोकपालसंदर्भात भाजपने केवळ 'कुंपणावरची' अशी अत्यंत सोयिस्कर भूमिका घेतल्याचे आमचे मत आहे.

सोनेरी (पिकली) पाने २०११

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 30/12/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
पिकल्या पानांनी गळून पडणे हा निसर्गाचा नियम आहे. यातली काही पाने सोनेरीच नव्हे तर ती बावनकशी सोन्याचीच असतात असे म्हणता येईल. अशा अनमोल पानांचा २०११ मध्ये नुसता खच पडला. निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी सर्वोच्च स्थान संपादन केले किंवा सर्वोच्च पातळी गाठली अशा इतक्या व्यक्ती एका वर्षात जगाला सोडून गेल्याचे यापूर्वी कधी झाले नसेल. पूर्वी पंचावन्न वर्षे पूर्ण होताच सरकारी नोकरीमधून सेवानिवृत्त केले जात असे. त्याची मुदत आता वाढवून ५८ ते ६० वर्षांपर्यंत झाली आहे. पूर्वी सत्तरीला पोचेपर्यंत बहुतेक लोकांची क्रियाशक्ती क्षीण झालेली असे.

मराठी माणुस उधोग धंदयात खरच मागे आहे का?

लेखक निश यांनी शुक्रवार, 30/12/2011 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणुस उधोग धंदयात खरच मागे आहे का? प्रत्येक वेळी गैर मराठी माणसाशी तुलना करताना अस म्हटल जात की, मराठी माणुस उधोग धंदयात मागे आहे. तो सतत अपयशी ठरतो हे कीतपत खर आहे? मग त्या अपयशी पणाची कारण काय आहेत?

अन्ना हझारे आनि सच का सामना

लेखक मनिमौ यांनी शुक्रवार, 30/12/2011 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
सच का सामन सध्या वरिल कर्यक्रम पून्ह सूरु झाला आहे. आसेच पाहताना वरिल अत्त्यचार बघायला मिलाले.एक अन्ना हझारे यान्च्या मूले अजुन किती लोका आप्लि झूलि भर्नार देव जाने.सुत्रा सन्चालकाचा आवेश बघुन असेच वातले की ......... असे फालतु कर्यक्रम कधि बन्द होनार मनिमौ

संसदेतला गोंधळ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 30/12/2011 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
कालची रात्र संसदेतला गोंधळ बघण्यात गेला. बिल टर्कावुन कागद संसदेत उधळले गेले. अंण्णा खरे ठरले. व लोकशाहिचा रात्री १२ वाजता खुन झाला अश्या तिखट प्रतिक्रिया विचारवंत व राजकिय नेते यांच्या कडुन ऐकण्यात आल्या.... शेवटी लोकपाल विधेयक राज्यसभेत लटकले. 187 दुरुस्ती प्रस्ताव. विरोधकांचा ठाम पवित्रा. सहकारी पक्षांचा विरोध. सभागृहातील अल्पमत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. अभूतपूर्व परिस्थितीत अधिवेशनाचे सूप वाजले. लोकपाल विधेयकावर मतदान होऊ शकले नाही. लोकसभेत पारित झालेल्या लोकपाल विधेयकावर गुरुवारी राज्यसभेत सुमारे 13 तास चर्चा चालली.

बासूंदी गोड गोड

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 30/12/2011 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
बासूंदी गोड गोड तो: तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ|| ती: तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ|| तो: दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||१|| ती: माझ्या दिलाच्या मिठाईचा तू आहे एक हलवाई मीच तूझी कधी बर्फी झाले, कधी झाले रसमलाई बासुंदीची धार चोखण्या तू आता तोंड उघड तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल ||२||

(प्रेमी)युगुलगीत: तुझी माझी प्रित जमली

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 30/12/2011 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी प्रित जमली तो: दे हातात तुझा मला हात सजणे हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // ती: दे हातात तुझा मला हात साजणा हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // ती: लपून छपून प्रेम ते केले कधी कुणा नाही कळले आता वाट नको पाहू वेळ लग्नाची झाली हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // तो: कानी तुझ्या ग डूल डुले पायी पैंजण रुणझूण बोले गाली लाली येण्याची वेळ जुळूनी आली हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // ती: तू या शेताचा रे राजा येथेच आण तू बँडबाजा तुझ्या राणीची वरात मला स्वप्नात दिसली हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // तो: घरा