भारत "IT" मध्ये प्रगत आहे म्हणजे नक्की काय आहे?
मित्रानो, मी एका सरकारी संधोधन आणि विकास प्रबोधानीत काम करतो..माझ्या कामा निमित्त गेल्या आठवड्यात एका अमेरिकन स्थित बेंगलोर मधील "software" विकसित करणाऱ्या कंपनी बरोबर संबंध आला ...आम्हाला त्यांच्या कडून एक "software" घ्यायचे होते जे अभियांत्रिकी शी निगडीत होते.परंतु त्यांनी हजार सबबी सांगून (अमेरिकन कायद्याचा हवाला देत... व "end use certificate" वर सही करणे आवश्यक आहे जे अर्थातच शक्य नव्हते ...) आमची ऑफर नाकारली.
ह्या घटने वरून असा प्रश्न पडतो कि आपण रोज वाचतो कि भारतीय "IT" कंपन्यांनी इतकी प्रगती केली वगैरे वगैरे..
मिसळपाव