पिल्ले ..!!
http://www.misalpav.com/node/20678
८ फेब. १२ ला कुत्रीने पिल्लांना जन्म दिला होता. आम्ही घरी नव्हतो. आल्यावर हे सर्व दिसले जाणवले.वैतागून गेलो. पण पिल्लांना नि पिल्लांच्या आईला बाहेर कसे काढणार . .?
मनात थोडा थोडा करुणेचा प्रकाश झिरपत होता .
आम्ही विचार करून तिला अंगणातच राहू देणे मंजूर केले .मग तिला रोज काहीना काही खायला पण देत होतोच. ती खातपण होती.
आम्ही दिसताच शेपूट हलवीत होती.
तिच्या आर्जवीपणाचा राग येत होता .
मग आम्ही आमच्याच मनाला गोंजारून समजावीत होतो
आजकाल उष्मा वाढला होता.
मिसळपाव
दिवसभराचे काम आटोपून शुक्रवारी संध्याकाळी नाशिकहुन आम्ही चौघे (मी - ह्र्षिकेश, माधव,अनिरुध्द आणि शुभा) निघालो.