Skip to main content

"!!.....मधुचंद्र......!!"

लेखक जेनी... यांनी मंगळवार, 28/02/2012 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दाविना ओठातले .......... झंकार भावनांचे ........ एका नववधूच्या मनातले ......... संसाराची नुकतीच सुरुवात करण्याआधी आयुष्यभर साथ देण्याची ..सगळ काही वाटून घेण्याची , सुखात असो वा दुखःत ..कधीही एकट न सोडण्याची ..समजून घेण्याची अन समजून राहण्याची , अश्या बर्याच काही इच्छा नववधूच्या मनात असतात . त्याच संसाराच्या पहिल्याच पायरीवर तिच्यासाठी महत्वाचा असतो तो त्याचा सुखद सहवास .. त्याचा अंतरमनाला जोडणारा स्पर्श , खूप काही मनात येवून जातं .जुन्या आठवणीना उजाळा देवून जातं . क्षणात मन पलीकडे ..क्षणात अलीकडे येवून जातं ..थोडी चलबिचल ...थोडीशी हुरहूर ..थोडी उत्सुकता .. थोडस काहूर ..सगळच व्यस्त

अरविंद केजरीवालांनी पुन्हा एकदा दुगाण्या झाडल्या..!

लेखक कॉमन मॅन यांनी मंगळवार, 28/02/2012 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
वंदे मातरम् ! तथाकथित टीम अण्णाचे सदस्य श्री अरविंद केजरीवाल यांनी कालच पुन्हा एकदा देशाच्या सार्वभौम संसदेवर चिखलफेक करून दुगाण्या झाडल्या आहेत. 'आपली संसद हेच या देशाकरता सर्वात मोठे संकट आहे, तिथे सगळे बलात्कारी आहेत' वगैरे वगैरे मुक्ताफळे केजरीवालांनी उधळली आहेत.

निःशब्द

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी मंगळवार, 28/02/2012 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे म्हणावे तुझेच केवळ असे काही एक माझे निव्वळ कुणी म्हणाले तिथेच बनती जुळती तुटती रेशीमगाठी मी न पाहिले हात तयाचे तुझ्या किनारी सापडले घर आयुष्याच्या अंक पटावर दिले घेतले हिशेब झाले समर्पणाच्या वाटेवरचे आज पडावे पहिले पाउल उलगडताना ह्रदयाची धून सूर कापरा कातर कातर शब्दांची वीण उसवीत जाती शब्दांवाचून डोळ्यांचे तळ तुझे म्हणावे तुझेच केवळ असे काही एक माझे निव्वळ
काव्यरस

तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 28/02/2012 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन खालील कथन प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ‘विज्ञान आणि चमत्कार’ या ग्रंथातील संदर्भ टीप क्रमांक 2 वरून उद्धृत केले आहे. येथे ‘चमत्कारां’ना ‘तथाकथित’ हे विशेषण लावण्याचे कारण ‘चमत्कार’ नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, हे आहे.

मावळतीचा सूर्य

लेखक रेशा यांनी सोमवार, 27/02/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...