Skip to main content

अस्टेरॉइड २०१२DA१४

लेखक भागो यांनी मंगळवार, 19/07/2022 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
bbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbb millions of sleepless people staring in helpless terror at the incandescent sky; and then, low and growing, came the murmur of the flood. And thus it was with millions of men that night – a flight no whither, with limbs heavy with heat and breath fierce and scant, and the flood like a wall swift and white behind. And then death. —H. G. Wells, “The Star” फेब्रुअरी २०१३ जगातील खगोलशास्त्रज्ञ उत्सुकतेने अस्टेरॉइड २०१२DA१४ची वाट पाहत होते. अस्टेरॉइड २९१२DA१४चा शोध एका वर्षापूर्वी एका स्पॅनिश दंतशल्याने(!) लावला होता.

अलक

लेखक मालविका यांनी सोमवार, 18/07/2022 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
अलक 1 "करावं तसं भरावं", या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेलं वाक्य. सहजच बसस्टॉपवर पुस्तकं विकणार्या मुलाकडून चार पुस्तकं घेतली. माझ्या घरी मी एकटाच. कामवाल्या मावशीच्या मुलांना देऊन टाकली. दोन दिवसांनी त्याच्याकडून फुगे घेतले,ऑफिसमधल्या मैत्रिणीला दिले. अशीच ओळख वाढत राहिली. काही विशेष करत नव्हतो मी. दोन दिवस ताप आला. कामवाल्या मावशी कपडे भांडीच काय दोन वेळचं जेवण पण करून गेल्या. ऑफिसलातली मैत्रिण येऊन डाॅक्टरकडे घेऊन गेली. आणि तोच बसस्टॉपवरचा मुलगा, घर शोधत आला. आज तो फुलं विकत होता. चौकशी करून जाताना चार फुलं टेबलावर ठेऊन गेला.

विस्मृतीत गेलेले पदार्थ १ - छिबा ढोकली

लेखक यश राज यांनी सोमवार, 18/07/2022 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स .. आपण सर्व जाणतोच की भारतीय खाद्यसंस्कृती ही विविधतने नटलेली व प्रचंड मोठी आहे. प्रत्येक राज्यात, प्रान्तात, जिल्ह्यात एवढेच काय प्रत्येक गावा गावात खाण्या पिण्याचे असंख्य व वेगळे वेगळे प्रकार पहायला मिळतात. जे पिढी दर पिढी पुढे सुपुर्द केले जातात पण काळाच्या ओघात त्यातले काही पदार्थ नामशेष होत जातात. मला स्वत:ला या सर्व पारंपारीक व विस्मृतीत जात असलेल्या रेसिपिज चे खुप म्हणजे खुप अप्रुप आहे व हे सर्व पदार्थ टिकले पाहीजे आणि त्याच बरोबर आजच्या पिढीला या पदार्थांची ओळख व्हावी असे मला मनापासुन वाटते.

रताळ्याच्या तिखट पुरी

लेखक Bhakti यांनी रविवार, 17/07/2022 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
एकादशीला हक्काने घरात आलेले कार्बोहाड्रेट म्हणजे साबुदाणा ,बटाटा आणि रताळी !त्यात रताळीला एकादशीलाच जास्त आणंल जाते.बाकी इतर वेळी तसे दुर्लक्षितचअसतात.रताळी –दाणे किस,रताळ्याची खीर झाली.आता दोन दिवसांनी लेकीसाठी तिखट पुऱ्या करायचं ठरवलं.गुळाच्या पाण्यात गोड पुऱ्याही होतात,पण तिला गोड जास्त आवडतं नाही. साहित्य- ४ उकडलेली रताळी १ मोठी वाटी कणिक पीठ १ छोटी वाटी रवा आलं ,मिरची ,लसून,जिरे यांची एकत्रित पेस्ट ४ चमचे तीळ १ चमचा तिखट १ चमचा हळद १ चमचा धणेपूड चिरलेली कोथिंबीर चवी पुरते मीठ तळण्यासाठी ३ मोठी वाटी तेल कृती: तर मग कुकरमध्ये उकडलेल्या रताळ्याची साल

त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी (भाग-३)

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 17/07/2022 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
सोलापुरात चालक आणि गार्ड बदलले गेले आणि सव्वानऊला शताब्दी पुढच्या प्रवासाला निघाली. कोरोना साथीच्या भितीमुळे सर्वांचाच प्रवास कमी झाला होता. त्यामुळे सोलापूरहून गुलबर्गा, हैदराबादला जाणारी गर्दी आज दिसत नव्हती. आमच्या डब्यात बऱ्यापैकी गर्दी होती म्हणायची, पण पुढचा डबा तर पूर्ण मोकळाच होता. नाश्त्यानंतर तर बऱ्याच जणांनी मास्क उतरवलेच होते. दरम्यान, सोलापुरातून सुटत असतानाच होटगीकडून आलेली BOXN वाघिण्यांची मालगाडी शेजारच्या मार्गावर येऊन उभी राहिली होती. आतापर्यंत दुहेरीकरणाचं काम कुलालीपर्यंत पूर्ण झालेलं होतं.

किल्ला ( चित्रपट - २०१५ )

लेखक चक्कर_बंडा यांनी शनिवार, 16/07/2022 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट तब्बल सात-आठ वर्षे जुना आहे, हे लिहून ही आता बरीच वर्षे झालीत. मला या चित्रपटात काय दिसलं ते मांडायचा छोटासा प्रयत्न !