Skip to main content

अंतर !

लेखक फिझा यांनी मंगळवार, 30/08/2022 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
अंतर ! आज तो परत तेच म्हणाला, "तुझ्या आणि माझ्या विचारांमध्ये बरंच अंतर आहे " . . . . . . . " हो , कदाचित .... समजून घेणे , आणि सहन करणे , यामधे जितकं अंतर .....मोजून तितकंच !" डोळ्यांतल्या नीरओळीमध्ये मावेल ....एव्हढंच ती उत्तरली ! ..................नेहमीसारखंच ! ------------फिझा
काव्यरस

बाई मी फुकट घेतला आराम!

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 30/08/2022 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रायोजित मधूचंद्र (?!) https://www.esakal.com/manoranjan/nayanthara-vignesh-shivan-honeymoon-s… No pain No Spain मधूचंद्र, विघ्नेश व नयनतारा नेटफ्लिक्स करणार खर्च सारा ना काही खर्च ना काम घरचं ना घेतलं कर्ज मधूचंद्री ही नवी संस्कृती कि नवी विकृती टिव्हिवर ते दंपति दिसणार प्रायोजक नेटफ्लिक्स झाले सर्व थेट फिक्स झाले ऐकोनी पोट धस्स असा खर्च अडीच लाख भाडे हाॅटेल बील काढे आम्ही म्हणतो पाढे अबबब नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला दाम बाई मी फुकट घेतला आराम! बाई मी फुकट घेतला आराम !!

गेले ऐकायचे राहून

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 29/08/2022 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी फिरायला जातो ते महात्मा सोसायटीजवळ असलेल्या डीपी रोडपर्यंत. तिथे रस्त्यावर दामलेकाकांची एक मोफत व ओपन लायब्ररी आहे. लोक पुस्तके नेतात व आणतात. अनेकांनी पुस्तके भेटही दिली आहेत. काही जण उपक्रमासाठी स्वयंसेवक म्हणूनही मदत करतात. दामले काका जगन्मित्र व नर्मदा परिक्रमा केलेले. त्यामुळे ग्रंथालायचे नाव ही नर्मदे हर! मी थोडावेळ गप्पा मारायचो. माझे यंदा कर्तव्य आहे हे पुस्तक ही ग्रंथालयाला भेट दिले.मग गप्पांमधून त्यांना व तेथील स्वयंसेवकांना, माझ्या व्यत्किमत्वाचा परिचय होत गेला. शिरिष नावाचे एक गृहस्थ माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकायचे.पण त्यांच्या बोलण्यात मला अस्वस्थता जाणवायची.

सजलेल्या दख्खनच्या राणीतून प्रवास (भाग-२)

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 29/08/2022 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
दिवा जंक्शन ओलांडत असताना पनवेलकडून WAP-4 इंजिनासोबत एक समर स्पेशल बाहेर होम सिग्नलला थांबलेली होती. पुढच्या सहाच मिनिटांत राणी कल्याण ओलांडत होती. कल्याणमधून बाहेर पडून कर्जतच्या मार्गाला लागत असतानाच आधी तिकडून आलेली लोकल पलिकडच्या मार्गावरून कल्याणमध्ये आली आणि दीड मिनिटानीच तिच्या मागोमाग पुण्याहून तपकिरी रंगाच्या कल्याणच्या WCAM-2 बरोबर आलेली डेक्कन एक्स्प्रेस शेजारून क्रॉस झाली. या मोठ्या वळणावर पुढच्या सगळ्या डब्यांच्या दारात उभं राहून तसंच खिडक्यांमधून कॅमेरे, मोबाईल बाहेर काढून फोटो आणि व्हिडिओ करणारे Railfans दिसत होते. माझ्या डब्यातही पुढच्या बाजूला Railfans चा एक गट बसलेला दिसला.

कला - चित्रकला प्रदर्शने

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 29/08/2022 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आजूबाजूस बरेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्याची माहिती, समाजमाध्यमे वृत्तपत्रे याद्वारे आपणापर्यंत येत असते. काही कारणांमुळे कधी कधी ही माहिती आपणा पर्यंत पोहोचत नाही, किंवा काही उशिरा पोहोचते, नंतर हळहळ वाटते की आधी कळले असते तर उपस्थित राहून याचा आस्वाद घेऊ शकलो असतो की ! अशीच चर्चा कांजूस सरांच्या या धाग्यावर झाली होती. म्हणून अशा कार्यक्रमांची माहिती मिपा वर पोस्ट करून देण्याचे या धाग्याचे प्रयोजन आहे. सुरुवात चित्रकला प्रदर्शनाच्या माहितीने करत आहे.

बीट आणि नारळाची कोसांबरी

लेखक Bhakti यांनी रविवार, 28/08/2022 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीची तयारी सुरू झाली,म्हणजे इट क्लीन :) मागे इथेच कोसांबरीची रेसिपी कोसांबरी वाचली होती.साधी सोपी आवडली होती. भिजवलेल्या मुगाच्या डाळीचा वापर यात होतो.मी बीट आणि ओल्या नारळाचा वापर केलाय. प्रोटीन आणि आयर्न यांचा चांगला मेळ यात मिळतो. साहित्य- एक किसलेले बीट,काकडी,सफरचंद एक वाटी किसलेले ओले नारळ एक वाटी भिजवलेली मुगडाळ एका लिंबाचा रस चवीनुसार चिरलेली मिरची,मीठ,चाट मसाला,साखरदाणे

मराठी संगीतकार ॠषिराज : माहिती पाहिजे

लेखक चौथा कोनाडा यांनी शनिवार, 27/08/2022 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
१९७८ - ८० चा सुमार असावा, बन्याबापू या सिनेमाची गाणी खुप गाजत होती. मी कशाला आरशांत पाहू गं, हे गर्द निळे मेघ, ले लो भाई चिवडा ले लो, प्रीतीचं झुळझुळ पाणी ही गाणी आकाशवाणी आणि गल्लीबोळातही गाजत होती. उषा मंगेशकर बरोबर हिंदीतील अमीतकुमार, शैलेद्र सिंग यांचा ही प्रेक्षकांना खुप पसंत पडला. ऑर्केस्ट्रा, गणेशोत्सवातील मेळ्यामेळ्यात, कॉलेज मधील स्नेहसंमेलनात ही सादर होणार हे ठरलेले होते.

खरकट्या मिसळीची गोष्ट

लेखक मीउमेश यांनी शनिवार, 27/08/2022 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ म्हणजे माझा जीव की प्राण !! प्रवासात चांगली आणि प्रसिद्ध मिसळ कुठे मिळते या शोधात मी असतो. कित्येक वेळा तर मिसळ खाण्यासाठी फार दूरवरचा प्रवास मी केला आहे. मी मुळचा ठाणेकर असल्यामुळे मामलेदार मिसळ ही आमच्यासाठी पंढरी आणि आम्ही मिसळपंढरीचे वारकरी. सध्या मुंबई पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मिसळीचा सुळसुळाट झालेला आहे. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिकच्या काळया मसाल्याची मिसळ, कुठे चीज मिसळ, सर कुठे तंदुरी मिसळ, कुठे मडक्यातली मिसळ, तर कुठे अजून काही..

कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न नेण्याच्या लायकीचा माणूस !

लेखक रामदास यांनी शनिवार, 27/08/2022 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
बायोलॉजीत जसे स्पेसिज-फायलम-सब फायलम असं वर्गीकरण असतं तसेच सेवानिवृत्त काकांचे फायलम असतात.त्यापैकी सहज आढळणारा म्हणजे - फायलम पासबुकीया ! या फायलममधले काका विविध देशी-विदेशी -सहकारी नागरी बँकांची पासबुकं सक्काळपासून अपडेट करण्यासाठी फिरत असतात. म्हणजे त्यांच्या खात्यात पैशाचा पूर आलाय वगैरे असं काहीच नसतं. दोन चार लाभांश-एखादा अ‍ॅन्युइटी प्लॅन - मासिक व्याज इतकंच काय ते जमा होत असतं पण त्यानिमित्ताने 'मेरीआवाज सुनो'हा कार्यक्रम त्यांना करता येतो. या पासबुकीयांच्या छळवादाला कंटाळून बँकानी पासबुकं छापायचं मशिन लावल्याची अशीही एक अफवा आर्थिक जगतात आहे.

एक किस्सा

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 26/08/2022 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक किस्सा असाच एकदा चर्चेत विषय निघाला तर मी सहज बोलून गेलो चर्चेत अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून वापरात आहे. अहो खवळले ना एक जण! कुठल्यातरी कॉलेजात शिकवायचे ते. हाच तो हाच तो संघी बौद्धिक कावा वगैरे बोलायला लागले. आणि भारतीय लोकांना वाईट खोड आहे की जे काही जगात आहे ते भारतीय लोकांनीच शोधले - ते तडतडलेच! मी म्हणालो माझा आणि संघाचा काही संबंध नाही. ते जरा थंड झाल्यावर त्यांच्या एका ज्युनियर डाव्याने विचारले की असे कसे बोलू शकता तुम्ही? अकाऊंटींग हे ईटालियन आहे. आणि त्यांनी ही पद्धती शोधून काढली. आणि याचे पुरावे आहेत.