Skip to main content

'मलईदार खाते (!?)' वाटप

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 14/07/2023 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cabine… दादांना अर्थखाते जर फायली दिल्या तर जसे चोराहाती तिजोरी किल्या ! घरी तो आला मित्र हाडवैरी सावरण्या जुनी आपली हेराफेरी पांढरा कपड्यात जा व लूट पोलीस मारती कडक सॅल्यूट पाहीला नाही जनमत दट्ट्या लोकशाही म्हणजे नाही थट्टा!! जीवाची मात्र होते काहीली ! कुठे ठेवल्या नाना ने फाईली? तोंडात अंजिर, ह

हिमालयाच्या कुशीत - चोप्ता- चन्द्रशिला ट्रेक

लेखक सावि यांनी शुक्रवार, 14/07/2023 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
"अबे चल ना बे, काही नाही होत... मस्त मजा करू" बस एवढ्याच खात्रीलायक आणि दमदार वाक्यानी राहुल नी मला पटवलं. तसं तर निखिल ने सुद्धा आधी विचारलं होतं की आपण ट्रेक ला जायचं का, पण पुण्यात राहून ट्रेक म्हणजे सह्याद्री आणि त्यातही सिंहगड ! पण या वेळी काहीतरी वेगळं शिजत होतं, ट्रेकिंग ला जायचं, ते पण हिमालयात ! तसं आमच्या पैकी ट्रेक करणे ही काही आवड किंवा छंद नाही कोणाचाच, पण "कुछ तुफानी करते है, और कुछ अलग करते है" याच तत्वावर हिमालय च्या कुशीत कुठेतरी जायचं ठरलं.

आंबोली

लेखक चक्कर_बंडा यांनी गुरुवार, 13/07/2023 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीतील पावसाळा हा सह्याद्रीला जणू काही स्वर्गाचंच रुपडं बहाल करतो.

एकटा जीव सदाशिव

लेखक निओ यांनी बुधवार, 12/07/2023 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
अनोळखी शहरात 'एकट्याने' वास्त्यव्य करणं पण कधी कधी सुखाचं असतं. अट एकच खिसा भरलेला हवा. खर्च केलाच पाहिजे असं बंधन नाही पण चिंता नसावी. मग मन मारायची गरज उरत नाही. मन मानेल तसं निश्चिन्तपणे भटकवता येतं. मनाचा व्यायाम हा वेगळा न झेपणारा गहन विषय, आतातरी नको. तर अनोळखी शहरात 'एकट्याने' आल्यावर life कसं शांत होतं. सुपरफ़ास्ट चालणारी गाडी एकदम पॅसेंजर होते. सुट्टीचा दिवस तर रेंगाळत रेंगाळत निघून जातो. धावपळीत अडकलेल्या जीवाला उसंत मिळते. वेळ कसा Invest करावा याचा Sense असलेल्या एखाद्याला तर पर्वणीच वाटावी. काय छंद जोपासायचे ते जोपासा. कोणाचाच अडथळा नाही.

कलंक

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 11/07/2023 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
कलंक स्वत: धरला घरचा पलंग म्हणे नागपूरचा तुम्ही कलंक धोका दिल्याने तुम्ही,त्यांनी केला हा चंग फिरवले मोहरे झालात दंग पार्टी फोडून केले हो नंग वाचवेल कोण तो तैमूरलंग? थांबवा आता बोलणे सवंग भेटा मग त्या ममतास वंग वाटला फटाका निघाला लवंग कसा तू सोडला भगवा संग नि झाला भणंग

फिटनेस सोपी गोष्ट आहे

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 11/07/2023 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
फिटनेस ५० आणि फिटनेस १०० कुटुंबासोबत व जवळच्यांसोबत फिटनेसचा आनंद घेण्याचा उपक्रम सर्वांना नमस्कार. सर्व जण पावसाळ्यात येणा-या परिस्थितीमध्ये सुरक्षित असतील अशी आशा करतो. फिट राहणं किती सोपं आणि जमण्यासारखं आहे, ह्याबद्दल माझे अनुभव शेअर करत आहे. अनेक वर्षांपासून सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग आणि योग असे वेगवेगळे व्यायाम करत गेल्यामुळे आणि त्याला जोडून जीवनशैलीमध्ये बदल केल्यामुळे फिटनेसची आवड होत गेली आणि त्यातल्या गोष्टी कळत गेल्या. व्यायामासाठी वेळ काढणं किंवा फिट राहणं हे जितकं समजलं जातं तितकं अजिबात अवघड नाही हे लक्षात आलं.

।। 'हिंग' पुराण - अध्याय पहिला ।।

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 10/07/2023 21:20 या दिवशी प्रकाशित केले.

मिसेस पोद्दार ने पेश कि बेसनगट्टे कि सब्जी
मिसेस मोंगा ने बनाई दाल मखनी
मिसेस चॅटर्जी कि बैंगन भाजी
मिसेस नायर का सांबार
मिसेस गुप्ता का राजमा
और मिसेस विरानी का उंधियू

वाह! सबको मिलते है दस में से दस...
अब चिट निकालके हि होगा मिसेस शेफ का फैसला...

इन दस नंबरीयोंने ऐसा क्या डाला कि स्वाद हुवा निराला?

आपली तुपली स्वप्नं..

लेखक आजी यांनी सोमवार, 10/07/2023 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. भली,बुरी. मलाही पडतात. पण कशी? कर्मदशा! मला नेहमी स्वप्नं पडतात ती बस,ट्रेन चुकल्याची,गणित, इंग्रजी ते नापास झाल्याची (हो.

लग्न झाले नी अंकल झालो

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 09/07/2023 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले. केस पांढरे झाले असले तरीही मी स्मार्ट दिसतो, किमान मला तरी असे वाटते. एक जुना किस्सा आठवला. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी मी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो. इमारतीतील एका छोट्या हॉलमध्ये माझ्यासोबत ६ स्टेनो त्यात ४ कन्या होत्या. दोन तर माझ्याच समवयस्क. दोघींचे लग्न झालेले होते. त्यातली एक अजूनही गुलाबाची कळी होती पण दुसरीचे गोबीच्या फुलात रूपांतरण झाले होते. सर्वच पुरूषांना बायकांचे बोलणे कान टवकारून ऐकण्यात एक आसुरी आनंद मिळतोच. दिवस मस्त जात होते.