Skip to main content

खेळीया शब्दांचा

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 05/08/2023 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
कसे स्मरतात शब्द त्यांना नित्य कवीता बांधती त्याच वाटा, त्याच लाटा, तोच चंद्रमा अन् त्याच चांदराती शिशिर तोच ,वसंत तोच,तेच क्षितिज, भुवरी टेकले उगवती अन् मावळती तीच,अंबरात तेच रंग पेरले गुंजारव तोच, तोच मधुप, तीच राधा बावरी तोच कृष्ण सावळा, तरी नित्य वेगळे कवन यावरी ‐------------------------------------------------ भरतीचा रौद्र रूप,परतीचा अंतरंग दावतो कर्कटांनी रेखाटलेला किनारा नित्य नवा भासतो कधी पूर्ण चंद्र,कधी चंद्रकोर कधी लखलखत्या चांदण्या घन तमीचा शुक्र तारा, प्रेरणा कवन बाधंण्या इवल्याशा पावलांनी कृष्ण दुडूदुडू धावतो क्रदंनी सावळ्याच्या सुर बांसूरीचा घावतो शिशिर तोच,तोच वसंत

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -४

लेखक भागो यांनी शुक्रवार, 04/08/2023 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -५ “राघव, तुझा घसा कोरडा पडलेला दिसतोय. तू थोडं थंड डायहायड्रोजन मोनाक्साइड पी. बरं वाटेल. मग आपण सावकाश बोलू.” डॉक्टर शास्त्री बोलले. डायहायड्रोजन मोनाक्साइड? आता हा कोण जादुगार? मला डायहायड्रोजन मोनाक्साइड प्यायला देणारा? निश्चितच हे आपल्याला हे पेय पाजूून आपले प्रेत बनवून, कॉॉफिनमध्ये टाकून देशाबाहेर घेऊन जातील. “वेट ए मिनिट. तुम्ही जादूचे प्रयोग बघायला जाता का? नका जात जाऊ. गेलात तर संमोहनाच्या प्रयोगाला स्वयंसेवक म्हणून तरी पुढे जाऊ नका.

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -४

लेखक भागो यांनी शुक्रवार, 04/08/2023 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -५ “राघव, तुझा घसा कोरडा पडलेला दिसतोय. तू थोडं थंड डायहायड्रोजन मोनाक्साइड पी. बरं वाटेल. मग आपण सावकाश बोलू.” डॉक्टर शास्त्री बोलले. डायहायड्रोजन मोनाक्साइड? आता हा कोण जादुगार? मला डायहायड्रोजन मोनाक्साइड प्यायला देणारा? निश्चितच हे आपल्याला हे पेय पाजूून आपले प्रेत बनवून, कॉॉफिनमध्ये टाकून देशाबाहेर घेऊन जातील. “वेट ए मिनिट. तुम्ही जादूचे प्रयोग बघायला जाता का? नका जात जाऊ. गेलात तर संमोहनाच्या प्रयोगाला स्वयंसेवक म्हणून तरी पुढे जाऊ नका.

अमेरिका १- उडतं वडाप

लेखक निमी यांनी शुक्रवार, 04/08/2023 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मी आणि माझे हे नुकतेच आमच्या मुलीकडे अमेरिकेला (प्रथमच) कॅलिफोर्निया येथे गेलो होतो. त्यावेळी प्रवासादरम्यान काही लेख लिहिले.. त्यातील हा पहिला भाग. .... ज्यांनी विमान प्रवास केलेला नसतो त्यांना त्याचं खूप अप्रूप असतं, ज्यांनी थोडाफारच केलेला असतो त्यांना कणभर अहंकारही असू शकतो, पण माझ्यासारखे... ज्यांनी 'मण'भर आणि 'मन'भर प्रवास रेल्वे, टमटम, हातगाडी, एस्. टी, बस, रिक्षा, लोकल्स्, ट्रेन, टू व्हीलर,फोर व्हिलर आणि स्वतःची 11 नंबरची पायी गाडी असा केलाय, ते मान्य करतील की विमान प्रवास तसा फारसा सुखाचा नसतो.

ना. धों. महानोर-एक सांगितिक श्रद्धांजली

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 04/08/2023 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांनी ना. धों. महानोरांबद्दल मिपावर सुंदर लेख लिहीला आहेच, पण तरीही राहवले नाही म्हणुन माझ्याकडुनही चार ओळी ======================================= ना. धों. महानोर गेल्याचे काल पेपरात वाचले. आणि सर्रकन मन भूतकाळात गेले. मी चौथी/पाचवीत असेन. नुकतेच रंगीत टि.व्ही. आले होते आणि त्यावर "चिंब पावसानं रान झालं आबादानी" गाणं लागलं होतं. सूर्/ताल वगैरे कळण्याचं वय नव्हतं तरीही ते धिन तांग तांग्,धिधिन तांग तांग डोक्यात बसलं. गाणं आवडुन गेलं. पुढे कित्येक दिवस तेच मनात घोळत होतं. मग रेडिओवर "मी काट्यातुन चालुन थकले" ऐकलं आणि तेही आवडलं.

'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 04/08/2023 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा १: पेर्णा २. ( काटा रुते कुणाला ) 'बाट्या' हव्यात मजला ऐकीत नाही कोणी मिळतील का पुण्यात ठावे कुणास नाही विसरू कशी आता मी इंदोरची ती बाटी पुणे-तेथ कायुणे भलतीच बात खोटी स्वगृही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे भार्या पुणेकरिण ती हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची बाट्या न खात जगणे मज शाप हाचि आहे हे भाग्य वंचना की काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त-पोट आहे.

ना.धों.महानोर

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 03/08/2023 14:46 या दिवशी प्रकाशित केले.

पद्मश्री ना.धों.महानोर. मराठी साहित्यातील मोठं नाव. कविता, कादंबरी, नाटक, कथा. असे सर्वच वाड्मय प्रकार त्यांनी हाताळले. शिकत असताना गांधारी कादंबरी अभ्यासाला होती. ना.धों.महानोरांची ही पहिली ओळख. मग रानातल्या कविता, अजिंठा हे दीर्घ काव्य अनेकदा वाचून काढले आहे. पुढे, पावसाळी कवितांनीही वेड लावलं. शेती-मातीच्या कविता त्यांच्या वाचनात आल्या. जैत रे जैत, सर्जा, विदूषक, दोघी या चित्रपटातली गाणी कायम ओठावर रेंगाळत राहीली. आमच्या महाविद्यालया पासून त्यांचं पळसखेडा हे गाव जवळच आहे. अजिंठा डोंगर रांगा आणि जंगल सर्व हिरवेगार वनराईचा परिसर.

वार्तालाप: जाणण्याचे विज्ञान

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 02/08/2023 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
जाणते लोक ते शहाणे. नेणते वेडे दैन्यवाणे. विज्ञान तेही जाणपणे. कळो आले. समर्थ म्हणतात सतत ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणारे लोक शहाणे असतात. जे लोक काहीही जाणण्याचा प्रयत्न करत नाही, अज्ञानी आणि आळशी असतात. त्यांना समर्थांनी नेणते म्हटले आहे. नेणते लोकांच्या नशिबी फक्त दुःख आणि दारिद्र्य येते. समर्थ पुढे म्हणतात विज्ञान हेही जाणण्यामुळे कळू लागते. जाणण्याचे विज्ञान म्हणजे काय हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते. समर्थानी श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसे सिद्ध करावे याचे मार्गदर्शन केले आहे.

१४ मे भाग-२

लेखक भागो यांनी मंगळवार, 01/08/2023 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुनश्च १४ मे सकाळी साडेसहा वाजता गजर वाजला आणि तो नेहमीप्रमाणे आज झोपला आणि काल सकाळी उठला. १४ मेला रात्री झोपला आणि १४ मेला सकाळी उठला! हा गजर बरा पडतो. बायको उठून गदा गदा हलवून जागं करणार त्यापेक्षा हा नाजूक किणकिण करणारा गजर परवडला. उठायचा अगदी कंटाळा आला होता. रोज रोज उठायचा कंटाळा करून कसं चालेल? रात्री केव्हातरी त्याला जाग आली होती. कसलं तरी स्वप्न पडत होतं. एकदम वीज कडाडल्याचा आवाज आला होता. त्यानेच झोपमोड झाली. शेजारीच बायको झोपली होती. घोरत होती. झोपेत देखील चेहऱ्यावर तिरसट रागीट नाराजीचे भाव होते. ही कसली स्वप्ने बघत असेल बरं? तीच ती. झाडू पोछा करणाऱ्या बाईला रागावत असेल.