Being Sentimental.
Being Sentimental.
मी आपला खुशाल सकाळचा चहा नाश्ता करण्यासाठी टपरीवर बसलो होतो. चहावाल्याने रेडिओवर हिंदी सिनेगीत लावलं होतं. मूड एकदम मस्त जमला होता. पण तुम्ही तुमच्या धूनमध्ये आनंदात आहात हे लोकांना आवडत नाही, देव सुद्धा त्यांच्या मदतीला धावतो.
कसं ते पहा.
मी चहाचे घुटके घेत होतो तर “सैय्या बेईमान...” हे गाणं वाजत होतं. तर आलाच तो. चुरगळलेला झब्बा पायजमा, डोळे तारवटलेले. झोप झाली नसणार. माझ्याच शेजारी येऊन बसला. जब गीदड़ की मौत आती है तो वह शहर की ओर भागता है
हे कुणी तरी चुकून लिहीलं असणार. कारण इथे पळायची गरज नव्हती. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने मोबाईल काढला.
मिसळपाव
चार वर्षा आधी (2020), इम्रान खानच्या एका विधानाने ट्विटरवर वादळ उठले होते. तो म्हणाला होता, “जेव्हा भारतीय क्रिकेट संघ खेळायला आला होता, तेव्हा नाणेफेक करताना मला त्यांच्या कर्णधाराची कीव यायची. त्याला पराभवाची भीती वाटायची.”
साहजिकच तो खूप ट्रोल झाला पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपण बहुतेक वेळा पाकिस्तानला जिंकताना पाहिले. 2004 पूर्वी भारत पाकिस्तानमध्ये एक सिरीजच काय एक कसोटी सामनाही जिंकू शकला नव्हता. गावस्कर आणि अझरुद्दीनचा संघही अपयशी ठरला. भारतानेही त्यांना सहजासहजी जिंकू दिले नाही. वीसपैकी पंधरा टेस्ट ड्रॉ झाल्या.
अर्थपूर्ण जगण्याचा सराव म्हणजे ईकिगाई
पश्चिमेकडील जीवनशैली आकर्षित करतांच भारताच्या पूर्वेला एक राखेतून भक्कम उभा राहिलेला देश जपान.लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी जपानमधील ब्ल्यू झोनमधील उदा.ओकिनावा दीर्घायुषी व्यक्ती असणारे सेंटोंरियन्स यांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आह