Skip to main content

.....कार्यकर्ता.....

लेखक Patil 00 यांनी सोमवार, 25/06/2018 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
गरीबांचा बुलंद आवाज..... साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा......... नाद नाय करायचा वाघाचा... येऊन येऊन येणार कोण??" घोषणांनी सत्तुचा आवाज पार बसला होता. दिवसभर पायाला भिंगरी. एका दिवसाला पाच- सहा गावं. मतदान जवळ आलेलं. गावागावात बूथ. मतदार याद्या. पोलिंग एजेंट. स्लिपा वाटायच्या. मतदानाच्या आदल्या दिवशी जेवणावळी. इतर गोष्टी. सगळी कामं सत्तूला करावी लागायची. साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास. भरोशाचा कार्यकर्ता.... पक्षाचं काम करताना सत्तूचं कामावरलं लक्ष उडालं. पण त्याला वाटायचं साहेबांचा आशीर्वाद आहे. साहेब आहेत तोपर्यंत काहीच कमी नाही..... मतमोजणी झाली. साहेब निवडून आले. गुलालाची उधळण.

पॉझीटीव्ह

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 25/06/2018 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
( सत्तर शब्दांची लघुतम कथा लिहिण्याचा प्रयोग. ) पॉझीटीव्ह ...... त्याने चादर डोक्यावर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. तेवढ्यात मेसेजची रिंग वाजली. बघणे भागच होते. त्याने मोठ्या कष्टाने पांघरूण बाजूला केले. स्क्रीनवर तिचा मेसेज चमकत होता, ‘पॉझीटीव्ह’. ‘Abort.’ याने इकडून मेसेज पाठवला. रडण्याची स्मायली तिकडून. ‘Don’t cry. Me too positive.’ ‘What?’ ‘Just got the reports. HIV positive.’ त्याने सरळ फोन बंद केला. त्याला याक्षणी काहीच, कुणीच नको होते. चादर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. - शिवकन्या

हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग १

लेखक बरखा यांनी सोमवार, 25/06/2018 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी सुरुवातीपासून सांगायचे झाले, तर नवरा कामानिमित्त फिनलँड येथे गेला आणि मग आमचे, म्हणजे माझे आणि मुलाचे तिकडे जाण्याचे ठरले. तयारी सुरु झाली. नवर्‍याची कंपनी जरी सगळ करणार होती तरी एवढा लांबचा प्रवास एकटीने करण्याचे धाडस मलाच करायचे होते. आता तुम्ही म्हणाल त्यात एवढ काय? पण माझ्या बाबतीत खरी गंमत ही की माझा आणि ईंग्रजी भाषेचा शाळेत असल्यापासून छत्तीसचा आकडा आहे तो अजूनही आहे. त्यात पुण्याच्या डेक्कन परिसराहून अधिक लांब कुठेच एकटी फिरले न्हवते. त्यामुळे माझ्या समोर पहिला प्रश्न होता तो एकटीने प्रवास करण्याचा आणि व्हिसा ऑफिस मधे समोरच्या माणसा बरोबर मी काय आणि कसे बोलणार याचा.

वाळवीची पावसाळी रात्र.

लेखक गवि यांनी सोमवार, 25/06/2018 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ पुष्कळ झाली तसे वाळवीने आपले थकलेले दोन्ही डोळे तळव्यांनी दाबले. कार्यालयातले सर्व सहकामी कधीच निघून गेले होते. वाळवीने तिच्या मांडीमाथ्याच्या पडद्याकडे एक शेवटची नजर टाकली. काही नवीन ईडाक वरिष्ठांकडून आलेली नव्हती. क्षेत्रीय कार्यालये आणि केंद्रीय कार्यालय यांच्यातल्या संपर्कांबाबत वाळवीचं काम नेहमीच मरणरेषेवर चालत असे. उदेका किंचित जरी जास्त झाला तरी साप्ताहिक पुनरावलोकनात त्याचा उल्लेख होत असे. तिच्या कुंजी परिणाम क्षेत्रात हा उदेका मुख्य होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. स्थानिकेने आमटीपथ ते श्रीस्थानकापर्यंत जाताना मांडीमाथाथैली भिजली असती.

साखळी Break the chain

लेखक aanandinee यांनी सोमवार, 25/06/2018 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी माझा मूड अगदी छान होता. काही विशेष कारण होतं असं नाही पण कधी कधी उगीचच छान वाटत असतं ना, तसा. आणि मग अचानक कुणाशीतरी बोलताना त्यांनी काहीतरी शेरा मारला, दुखावणारा, अगदीच अनावश्यक, झालं .... माझ्या छान मूडच्या फुग्याची सारी हवा गेली. त्यानंतर कामानिमित्त (professionally) मी ज्या कोणाला भेटले त्यांच्याबरोबर मी वेळ मारून नेली. पण घरी आल्यावर मात्र माझ्या मुलाच्या लहानश्या चुकीवर मी उखडले. इतर दिवशी कदाचित त्या लहानश्या गोष्टीवरून मी एवढी ओरडले नसते. मग त्या दिवशी का ओरडले? मी स्वतःशी विचार केला, माझी सबब तयार होती, “मी रागावले कारण दुसर्या कोणीतरी आधीच मला चिडवून ठेवलं होतं.

मिरगाचो पाउस

लेखक Patil 00 यांनी सोमवार, 25/06/2018 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिरगाचो पाऊस -मालवणी कविता मिरगाचो पाऊस इलो चाग्लो वाजत गाजत। विजो कडाडले नी ढगांचो गडगडाटय झालो।।१।। तरी मिया म्हणतंय नायकाचो बाबलो गायब ख्य झालो। वाटच पावसाची बगी होतो तेंनीच माझो कोम्बो पळवलो।।२।। गावात कायव होयना माझ्या कोंबड्यार सगळ्याचो डोळो। फाटकी येव शिरा पडो मेल्यार बोलवोन हाडा लगेचच त्येका।।३।। येवदे त्येका चांगलेच गाळयोे घालतेय। सांगोती नी वडे घराकडे पोचोवक सांगतंय।।४।।

युगधंर

लेखक Patil 00 यांनी सोमवार, 25/06/2018 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
युगधंर-कविता- रास रंगे गोपिकांसवे गोपाळा कृष्ण कान्हा धन्य धन्य ती मथुरा पावा वाजवीतो कान्हा गाई चारीशी वनावनात संगे तुझ्या सुदामा गोपिकांसवे खेळखेळता तू युगधंर मी सुदामा दह्या दुधाचे हांडे रचवीशी तू एकक अडवूनी गोपिकांचे खोड्या तुझ्या अनेक तुझ्यासवे खुशीत साऱ्या सदैव मोहवी त्यांना युगधंर तू युगायुगांचा हवाहवासा असे त्यांना हाती घेऊन सुदर्शन धडा शिकवी गुन्हेगारास तरी शंभर आकडे मोजुन करशी सावध अन्यायास धावून येशी सहाय्याला परी हाकेस द्रौपदीच्या पुरवून वस्त्र द्रौपदीला फजिती उडवी दुर्योधनाच्या
काव्यरस

अजि म्या वाघ (male tiger) पाहीला!

लेखक रुस्तुम यांनी सोमवार, 25/06/2018 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
A tiger is a large-hearted gentleman with boundless courage and that when he is exterminated - as exterminated he will be unless public opinion rallies to his support - India will be the poorer by having lost the finest of her fauna. - Jim Corbett कॉर्बेटने म्हटल्याप्रमाणे तर निसर्गाची सर्वोत्कृष्ट निर्मिती बघण्याचा छंदच लागलाय सध्या. (माझे छंद ही चंचल आहेत, आधी ट्रेकिंगचा छंद होता, मग लॉन्ग ड्राईव्हचा आणि खादाडीचा मग पक्षी निरीक्षणाचा असे बरेच). व्याघ्र दर्शनाला जायचे म्हटलं की आनंद पोटात माझ्या माईना असं होतं. ह्या डोळ्यांची भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या व्याघ्र प्रकल्पांची भटकंती सुरु असते.

घर्षण – थांबवून ठेवणारा, नियंत्रण करणारा, अपघात टाळणारा वाहतूक पोलीस (Friction – The Traffic Police)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 24/06/2018 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्रियेला प्रतिक्रिया, ठोशाला ठोसा, जशास तसे हा तर जगाचा शिरस्ता. राज्यातील काही लोक दिलेले आदेश पाळण्यात अति घाई करणारे तर काही अजिबातच न बाधणारे, स्वतःचे हित असूनही विरोध करणारे, तक्रारी करणारे, अडचणी सांगणारे. बर गुप्तहेर खात्याकडून विचारणा करावी तर या लोकांचे शत्रू राष्ट्राशी काहीही संबंध नाहीत हे निश्चितच. मग तरीही काही लोक असे सतत का विरोध करतात याचे विक्रमला अप्रूप वाटे. पण त्यासंबंधी राज्यातल्या राजगुरूंनी फार सुंदर दृष्टांत दिला ते म्हणाले "राजा असं पहा.. जगात जंगली श्वापदे आहेत, नरभक्षक वाघ -सिंह आहेत, टवाळ लांडगे-कोल्हे आहेत, ताकदवान रेडे-गवे आहेत आणि नाजूक ससेही आहेत.

पन्नाशीत पन्नास किल्ले

लेखक Chandrashekhar marathe यांनी रविवार, 24/06/2018 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याची पन्नाशी ओलांडली तो पर्यंत मी महाराष्ट्रातल्या सगळ्याच जंगलात भ्रमंती केली होती आणि आता खुणावत होती ती आकाशाला आव्हान देणारी सह्याद्रीची शिखरं. स्वराज्याचा जरीपटका ज्यांनी कधी पडू दिला नाही, ज्यांची ओळख पुस्तकांतून फक्त एका ओळीतच होते अशा वीरांची खरी कहाणी जाणून घ्यायची ,त्यांना भेटायची ओढ आता लागली होती. आणि मनात एक योजना आकाराला येत होती. नाव होत “पन्नाशीत पन्नास किल्ले“. एका वर्षात आपण ५० किल्ले सहज करू असे धोपट गणित जमल्याने नवीन हुरूप आला . मग काय , तयारी ला लागलो. ५० किल्ल्यांची तारीखवार यादी करून भिंतीवर टांगली, ट्रेकिंग चे साहित्य जमवू लागलो आणि ठरल्याप्रमाणे सुरवात केली.