Skip to main content

नं पाठवलेलं पत्रं

लेखक Pradeep Phule यांनी रविवार, 09/09/2018 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्लीज, इकडे बघ ना..! मला तुझ्या हातांकडून वचन हवय, कि तू हे पत्रं फाडणार नाहीस. या पत्रातुन जणू मीच तुझ्याशी बोलत आहे. प्रत्यक्ष बोलायचं तर खूप आहे, पण त्यासाठी हवा एकांत, आणि तोहि मिळणे कठीण, म्हणून हा सारा खटाटोप. लिहायचं खूप आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा लिहायला बसतो, आणि मग शब्द ययाती मधल्या अल्के सारखे गट्टी फू करून बसतात. आणि मी सगळं काही विसरून जातो. मी तुला या शुल्लक पानासोबत एक छानस कार्ड ही देऊ शकलो असतो, पण असं केल्यामुळे मी तुला आणखी एकदा विनवणी करत आहे कि काय, असा तुझा गैरसमज झाला असता, आणि तू हे पत्र फाडून टाकल असतं.

पिया तू अब तो आजा.....

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 08/09/2018 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
पिया तू अब तो आजा..... रेडियोवर 'पिया तू अब तो आजा....' ची लकेर उठली की लालभडक फ्रिलच्या ड्रेस मधली हेलन डोळ्यासमोर येते.... आशाताईंचा आवाज जणूकाही हेलनसाठीच आहे असं वाटण्याइतपत हेलन आशाताईंच्या आवाजात विरघळते आणि आशाताई तिच्या नृत्यात! गाणं एकवेळ कोणीही सुरात म्हणू शकेल; पण आशाताई हे असं रसायन आहे की ज्यांनी श्वासाला देखील सूर-ताल-ह्रिदम दिला आहे. त्यांचं  ते 'आ.. आ... आआ....' आपण बाथरूममध्ये देखील करू शकणार नाही... मग इतर कोणासमोर तर प्रश्नच येत नाही. लता मंगेशकर हे भारताला पडलेलं एक नाजूक स्वप्न आहे; आणि आशा भोसले म्हणजे भारताचं चिरतारुण्य आहे!

कार्यकर्ता

लेखक आकाश५०८९ यांनी शनिवार, 08/09/2018 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
कार्यकर्ता ’कार्यकर्ता काय म्हनला? दिलं का?’ धापा टाकत हॉटेलात दाखल झालेल्या रमेशने सुरेशला विचारलं. ’आरं मग! मला देत नाई व्हय. आपली वटच तशी हाय.’ सुरेश म्हणाला आणि ’ ए! चा आनी दोन मिर्ची दी रे’ अशी हॉटेलवाल्या पोराला ऑर्डरही सोडली. ’कसं जमतं हो तुम्हाला?’ ’ह्ये बग, तुला पटणार न्हाई, परत्येकाला काय ना काय तरी खाज असतीच. कुनाला सवताला बरं म्हून घ्यायची खाज, तर कुनाला दुसर्‍याला नाव ठिवायची खाज. आत्ता हाच कार्यकर्ता बग. ह्येला अडलं नडलं त्येला पैसं देयाची लई खाज. प्रवचनं ठोकायची खाज. हितं तत्वज्ञानं ऐकायची होस कुनाला हाय? पन गावतात ना पैसं. आपण खाजवत र्‍हायचं.

मी कळीला फुले वेचताना पाहिले

लेखक आकाश५०८९ यांनी शनिवार, 08/09/2018 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनास पुन्हा जगताना पाहिले मी कळीला फुले वेचताना पाहिले सोडून फांद्या फुलेही झेपावली त्यांनी तुला फुले वेचताना पाहिले झाले बंद कुपीत दरवळणे जेव्हा मी अत्तरास गंध वेचताना पाहिले आकाश विखुरण्याचे दु:ख विसरलो जेव्हा तिला मी मला वेचताना पाहिले आकाश......

तो बोलला खरे

लेखक आकाश५०८९ यांनी शनिवार, 08/09/2018 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मलाही पटले नव्हते, तो बोलला खरे सुळीवर त्याला दिले, तो बोलला खरे गणले नाही त्यांनी उगाच मूर्खात त्याला त्यांच्या सोयीचे नव्हते, तो बोलला खरे पिऊन अमृतासही बोलणे लटके त्यांचे प्राशिले मदिरेस त्याने, तो बोलला खरे घाबरला उगाच जन्मभरी ’आकाश’ तो त्यालाही कळले नव्हते, तो बोलला खरे ---आकाश

थांबला नसतास तू

लेखक आकाश५०८९ यांनी शनिवार, 08/09/2018 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
जशी थांबले मी तसा थांबला नसतास तू तुला घाई मरणाची, थांबला नसतास तू माझे ओथंबणे तुला कधी दिसलेच नाही ठेवून कोरडी मला का असा भिजलास तू पाहिले असतेस डोकावूनी जर या अंतरी असा परक्याप्रमाणे, वागला नसतास तू तुला शोधणे थांबवले आकाश शेवटी बदललास अवघा, हरवला नव्हतास तू आकाश........

ओ "स्त्री" रक्षा करना..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 08/09/2018 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
. टिपिकल पुरुषी अहंकारातुन स्त्री वर होणारे अत्याचार दर्शविणार्या निघालेल्या चित्रपटांची सूची भरमसाठ निघेल. पण हीच पार्श्वभूमी वापरुन एक हॉरर कॉमेडीशैलीतला चित्रपट बनवणे हे एखाद्याच्या डोक्यात येणे हीच मुळात एक दाद देण्यासारखी गोष्ट आहे. परवाच सौसमवेत "स्त्री" पाहीला. प्रेक्षकांना गृहीत धरुन बनवलेल्या चित्रपटांच्या पठडीतुन स्त्री चित्रपट वेगळा ठरतो. संपूर्ण कथा चार दिवसात घडते. चंदेरी नामक गाव आहे तिथे दरवर्षी चार दिवस ग्रामदेवतेची जत्रा भरत असते पण त्याच चार दिवसात रात्री अपरात्री एकट्याने फिरणार्या पुरुषांना एक हडळ केवळ त्यांचे कपडे मागे ठेवुन पळवुन नेत असते.

तुम्हाला असं कधी होते का ? भाग - २ .....

लेखक Prakashputra यांनी शनिवार, 08/09/2018 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग इथे वाचा : तुम्हाला असं कधी होते का ? भाग - १ मला एकदा झोपेत स्वप्न पडले (जागेपणी पण पडतात, पण त्याबद्दल नंतर कधीतरी ) आणि मला पक्के कळत होते की मी स्वप्नात आहे. मला 'Lucid Dreams' का काय ते पडतात, म्हणजे मला बऱ्याच वेळा मी स्वप्नात आहे हे स्वप्न बघत असताना समजत असते. तर या स्वप्नात मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो आणि त्याच्या नेहमीच्या घराऐवजी तो एका मोठया बंगल्यात रहात होता, एवढा मोठा बंगला कि गाडी आत आणि बाहेर जाण्यासाठी वेगळे रस्ते होते.

तुम्ही अस कधी केलय का हो

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 07/09/2018 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही अस कधी केलेय का हो? तुम्ही अस कधी केले आहे का हो तुमच्या आई बाबाना घेऊन तुमचा पहीला पगार सेलीब्रेट करायला छानश्या हॉटेल मध्ये गेलाय. आता पर्यन्त कधी तरी घरातला गॅस सम्पलेला असताना नाइलाज म्हणुन तुम्ही हॉटेल मध्ये जाणारे. दोन राइसप्लेट चार जणात मागवणारे तुमचे कुटुम्ब थोडेसे बावचळलेल असते. तुमचा पहीला पगार खिशात खुळखुळत असतो. आई हळूच म्हणते मला इडली मागव. बाबा डाळ भात सांगतात बहीण व्हेनीला आइसक्रीम सांगते. हे सगळ पदार्थांचे दर बघून केलेली फरमाइश असते. इतके दिवस मन मारून ठेवायाची सवय असते. अचानक अशी बरी सुटेल ती. मग तुम्ही सर्व सूत्र आपल्या हाती घेता आईला तिच्या आवडीची बिरयानी मागवता.

वॉल्डन...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/09/2018 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, थोड्याच दिवसात मी या पुस्तकाच्या काही प्रती तयार करणार आहे. कारण हे पुस्तक कोणी प्रकाशक छापेल असे मला वाटत नाही. कोणाला पाहिजे असेल तर अगोदर कळवले तर मी तेवढ्याच प्रती छापून घेईन. पुस्तक अ‍ॅमेझॉन कडून येईल. पुण्यातील मित्रांना प्रत्यक्ष भेटून व सही करून दिले जाईल. (पाहिजे असल्यास :-) ) कमी प्रती असल्यामुळे जरा महाग पडणार आहे पण त्याला नाईलाज आहे...