दिवाळी अंक २०१८ - आवाहन
नमस्कार मिपाकरहो!
सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत.
गेली दोन वर्षं आपण दिवाळी अंकामध्ये एक विशेष विभाग जोडतो. आत्तापर्यंत 'रहस्यकथा' (२०१६) आणि 'व्यक्तिचित्रं' (२०१७) हे विभाग झाले आहेत. सलग दोन वर्षं हे झाल्यामुळे यंदा बदल म्हणून दिवाळी अंक मूळ स्वरूपात, म्हणजे मुक्त, असावा असं योजलं आहे.
तर दिवाळी अंकाला काही विषय, थीम नाही. 'सकस आणि / किंवा रोचक लिखाण' हे दोनच मापदंड आहेत.
मिसळपाव