Skip to main content

यंत्र (भाग ३)

लेखक गतीशील यांनी मंगळवार, 09/10/2018 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
यंत्र (भाग १) https://www.misalpav.com/node/43400 यंत्र (भाग २) https://www.misalpav.com/node/43408 परीक्षितने मागे वळून बघितले तर एक ३५शी च्या आसपासचा पण रगेल दिसणारा असा एक माणूस त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत होता.. "बोला सावंत, काय म्हणताय?" "कोण तुम्ही?" परीक्षितने उसने अवसान आणून विचारले.. "चला जरा..आमच्या साहेबांना बोलायचं तुमच्याशी" "कोण साहेब? अन कुठे चला? मी येत नाही.ज्याला बोलायचं त्याला इकडे ये म्हणावं" "चल लौकर.

हा सागरी किनारा

लेखक केदार गाड्गीळ यांनी मंगळवार, 09/10/2018 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
हा सागरी किनारा । रवि दूर लोटताना हीरा राजा ची ही जोड़ी । थोडा भार सोसताना पाणी अथांग मुक्त । पक्षी शोधी निवारा। वाहे खटयाळ् वारा। हा सागरी किनारा बघता सखे तुला मी। क्षण होती धूंद धूंद। मग मंद होइ वारा। हा सागरी किनारा। हा सागरी किनारा रवि जाई सांज होइ ।भासे चंद्र कोंदणात। अन एक शुक्रतारा। हा सागरी किनारा ऋतू सांजवेळी खुलला। मनि मोगराच फुलला । आकाशी नक्षत्र नजारा। हा सागरी किनारा मन बावरे असे हे स्वप्नात ही नजारे ही कोणति नशा रे हा कोणता किनारा मन शोधता किनारा व्हावे कधी मि तृप्त मिटता तुज़्या कवेत म्हणती जश्या लाटा त्या सागरी किनारया मृद्गन्ध मि तू थेंब दवबिन्दु पावसाचे धरणी करिसी च

यंत्र (भाग २)

लेखक गतीशील यांनी सोमवार, 08/10/2018 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
यंत्र (भाग १) https://www.misalpav.com/node/43400 परीक्षित त्या गल्लीत डोकावून बघत होता. अजय गल्लीच्या आत थोडा पुढे जाऊन थांबला. १०-१५ मिनिटानंतर ऍक्टिवावरून एक मुलगी आली आणि अजय जवळ जाऊन थांबली. ते दोघे थोडा वेळ बोलत होते आणि मग दोघांनी आपापल्या गाड्या सुरु केल्या. हे बघताच परीक्षितने आपली गाडी स्टार्ट केली आणि U टर्न घेऊन रस्त्याच्या पलीकडे थांबला व स्वतःच्या गाडीच्या आरश्यातून मागे नजर ठेऊन उभा राहिला. ते दोघे त्या गल्लीतुन एक मागोमाग एक असे बाहेर आले आणि अमनोरा मॉल च्या दिशेने जाऊ लागले.

भयकथा: त्या वळणावर..

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 08/10/2018 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
"भेटलास का तू धर्मेंद्र साहेबांना? झालं ना तुझं काम?", जितेंद्र मला फोनवर म्हणाला. "अरे, काम झालं. अगदी मनासारखं. हा क्लायंट मला मिळाला. कोरम साहेबांकडे माझ्याखातर शब्द टाकल्याबद्दल धन्यवाद. मी त्यांच्यासोबत चांगला बिझिनेस करून त्यांचे मन जिंकेल, चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट त्यांना देऊन तू त्यांना माझ्यासाठी दिलेला शब्द सार्थ करून दाखवेन!", मी म्हणालो. आता रात्रीचे आठ वाजून गेले होते. हे काम सहा वाजता आटोपणार होते पण होता होता या ना त्या कारणाने उशीर झाला. मी जितेंद्रच्या शहरात म्हणजे अलकापूरला आलेलो होतो.

माळढोक पर्वाचा अंत झाला

लेखक खिलजि यांनी सोमवार, 08/10/2018 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
माळढोक पर्वाचा अंत झाला आता हळूहळू माळरानही संपेल अशीच भूक वाढत राहिली तर उद्या फक्त माणूसच उरेल तो डौलदार असेल , रुबाबदार असेल तो कसा होता ?

यलो ऑकर ची स्वप्ने

लेखक हर_हुन्नरी यांनी सोमवार, 08/10/2018 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
यलो ऑकर ची स्वप्ने : पानगळ सुरु झालीय नोव्हेंबर मधली सेकंदागणिक कोसळतायत हजारो स्वप्नं गवताच्या अगणित हिरव्या छटांमध्ये रानावनांत , जंगलात शहरातल्या पार्कात पडीक घरांच्या अवतीभवती धांदल नुसती अविरत एकेक पान पाहावं अगदी जवळून , गाढ , सुगंधी झोपेतल्या खुशबूदार स्वप्नासारखं पहिल्या धारेच्या प्रशियन ब्लू चे शिंतोडे सूर्याने जाळून टाकलेले कच्चे खाऊन टाकलेले रंग व्हर्मीलॉन रेड पासून बर्न्ट सिएना पर्यंत च्या सर्व रंगश्रुती अलगद ऐकाव्यात पान गळून पडताना किणकिणतात या श्रुती ...काही तुटक जिवंततेच्या हिरव्या खुणा छोट्या मोठ्या , नुकत्याच मेलेल्य

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग २

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 08/10/2018 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
(१९०१ व १९०४ चे पुरस्कार) १. या लेखनाची सुरवात आपल्याला अर्थातच १९०१च्या सलामीच्या पुरस्काराने करायची आहे. विजेता संशोधक : Emil A v Behring देश : जर्मनी संशोधकाचा पेशा : सूक्ष्मजीवशास्त्र संशोधन विषय : घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy). आता आपण घटसर्प हा आजार समजावून घेऊ. हा एका जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. वैद्यकात त्याची नोंद इ.स. पूर्व ५ व्या शतकापासून आढळते.

यंत्र (भाग १)

लेखक गतीशील यांनी सोमवार, 08/10/2018 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
"पऱ्या, यार सिर्फ लास्ट answer दिखा दे, पास हो जाऊंगा भाई " ... परीक्षित हसला व त्याने आपली उत्तर पत्रिका मागे बसलेल्या अजयला दिसेल अशी ठेवली. परीक्षित सावंत, BE Mechanical Engineer ..वडिलांचा ऊर अगदी भरून आला होता जेव्हा परीक्षित चा फायनल इयरचा निकाल लागला तेव्हा. कारण साहेबाना एका प्रथितयश अश्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये पुण्यातच R & D मध्ये कॅम्पस selection मधून नोकरी सुद्धा लागली होती. परीक्षित तसा लहानपणापासूनच हुशार होता. नुसता पुस्तकी कीडा न होता तो चौफेर लक्ष ठेऊन असे. चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय राजकारण, संगीत, खेळ सगळ्यांचंच त्याला थोडेफार ज्ञान होते.

एवढंच करा.

लेखक अंतरा आनंद यांनी शनिवार, 06/10/2018 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाकडे प्रतिभेची कुंडले असतील तर, तर ती उतरवूनच ठेवावी. कारण ती मागणारे इंद्र, रस्तोरस्ती उतरलेत. तुमची प्रतिकं असतील मारे प्रत्यक्षाहून उत्कट तुम्हीहून ती जाळा. कारण प्रत्यक्षांच्या उरावर, त्यांना थयाथया नाचवणारे, तुमच्या अंगणात आलेत.

फ्रेंड !

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 05/10/2018 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
परिस्थितीचे चटके माणसाला शहाणं करतात की नाही, माहीत नाही. पण जनावरं मात्र या अनुभवांतून खूप काही शिकतात. परिस्थितीशी जुळवून घेतात आणि त्यावर मातही करून स्वत:चे जगणे सोपे करून घेतात. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एका दिवशी हा नवखा देखणा, बोलक्या डोळ्यांचा कुत्रा अचानक कुठून तरी आमच्या गल्लीत आला. चुकून आला, की घरात नकोसा झाला म्हणून कुणी आणून सोडला, माहीत नाही. काही लोक हौस म्हणून कुत्रे पाळतात, मग कालांतराने त्यामुळे होणाऱ्या गैरसोयी जाणवू लागल्या की त्यांना बेवारस स्थितीत लांब कुठेतरी सोडून देतात. घराच्या सावलीची सवय झालेली ही कुत्री रस्त्यावर आली की बावरतात. कावरीबावरी होतात.