[शशक' १९] - प्राक्तन
"या; काय हवंय ? "
"चहा?"
"नको"
"कॉफी?"
"नको मला तू पाहिजे"
"काय ?"
"हो आदेश आलाय"
"कोणाचा ?"
"आज संध्याकाळी तू या खुर्चीतच शेवटचा श्वास घेशील. "
त्याला घाम फुटला त्यांन मागं वळून घंटी वाजवली. समोर बघतो तर कुणीच नाही.
संध्याकाळपर्यंत गिऱ्हाईकांच्या वर्दळीत तो सगळं विसरला .
"ए चल, काय असेल ते काढ"
"अहो हे काय चाललंय? "
"कोण तुम्ही ?"
"ए चल बाहेर ये , भाईला प्रश्न विचारतो ? ".
"अरे अरे माझा शर्ट"
"भाई बसा भाई"
भाई खुर्चीत बसला. हातातल्या चाकू टेबलवर खुपसला.
मिसळपाव