आंबट-गोड आठवणिंच्या चिंचा
उरण येथे असलेल्या माझ्या माहेरच्या वाडीत ४-५ मोठ मोठी चिंचेची झाड होती. प्रत्येक चिंच वेगवेगळ्या गुणांनी भरलेली. साधारण तीन प्रकार असायचे. एक अतिशय आंबट एक एकदम गोड तर एक जात आंबट गोड. चिंचेची झाडे दिसायलाही हिरवी गर्द खाली भरपूर सावली देणारी.
आमच्या वाडीत राबाच्या शेतावर (म्हणजे तांदुळाचे रोप करण्यापूर्वी पाला टाकून भाजून घ्यायचे शेत) एक उंच बांध होता त्यावर एक अशीच मोठी चिंच होती. ह्या चिंचाही मोठ्या आकोड्याच्या होत्या. अजूनही आठवणीने तोंडाला पाणी सुटत. पाऊस गेला जमीन सुकू लागली की ह्या चिंचेखालच्या बांधाची साफसफाई व्हायची. मग ह्या झाडाखाली गोणता अंथरून अभ्यासाला बसायला मला आवडायचं.
मिसळपाव