हमसे तो छूटी महफ़िलें…
काव्य, शास्त्र, विनोदाने दरवळणार्या मैफिलीत
हुरळून आपण सामिल होतो.
संवादासाठी, मैत्रीसाठी आसुसलेले आपण
चार दोस्तांच्या सहवासात हरखून जातो.
मैफिलीतल्या अनवट कविता,
एखादी नेमकी दाद,
तिथली व्यासंगी चर्चा,
आणि मनसोक्त गप्पा.
अशा हव्याहव्याशा वातावरणात
आपणच नकोसे आहोत,
हे अवचितच झालेले दंशभान….
शरीरात एखादे विष पसरत जावे
तसा पसरत जाणारा तुटकपणा.
आपल्याच हाताने तोडून सर्व पाश
खुलाशाचाही न करता अट्टहास,
पुन्हा एकदा मौन प्रवास.
एकट्याचा….
कधीही न परइज्राएल कडून जरासे हेही शिकुन घेऊ
भारतीय शूर वीरांना मानाची वंदना.
देशाची साथ द्या, शूर व्हा, काळजी घ्या आणि आनंदी रहा !!
जय हिंद !!
कोलकता किंवा हलदिया इथे कुणी मिपाकर आहेत का?
नमस्कार
सध्या माझा मोठा मुलगा, कामानिमित्ताने हलदियाला आहे.
त्याला कोलकाता शहर बघायची इच्छा आहे.
अशा कठीण समयी मिपाकरांशिवाय कोण मदतीला येणार?
कोलकाता येथे कुणी मिपाकर असतील तर फारच उत्तम.
आपलाच,
मुवि
ता.क. ===) खरे तर हा प्रश्न, प्रश्नोत्तरे ह्या सदरात टाकायचा होता....पण आम्ही त्या साठी अपात्र ठरलो.
ट्युमर - शतशब्द कथा
"सगळी तयारी झाली आहे डॉक्टर, हे सिटीचे रिपोर्ट्स आणि त्यानुसार पेशंटच्या डोक्यावर मार्क पण केला आहे" डॉक्टर विनय ख्यातनाम सर्जन डॉक्टर डिसुझाना सांगत होते .
स्ट्रेचरवरती झोपवलेल्या पेशंटच्या आजूबाजूला वेगवेगळी मशिन्स ठेवलेली होती त्यातून येणारे बिप्स वातावरणात अजून थोडा ताण निर्माण करत होते.
"हम्म, ट्युमर क्रिटिकल ठिकाणी आहे, जराशी चूक पेशंटला कायमचा अधू करू शकते! अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे, लेट्स स्टार्ट" रिपोर्ट्स पुन्हा एकदा पाहात डिसुझा म्हणाले.
डोंगरप्रेम
मावळतीला लालीच्या साक्षीनं ती दोघच डोंगर उतरत होती, दिवसभराचा शीणवटा दोघांनाही जाणवत होता.
डोंगराची उतरण दोघांनाही एकमेकांचा स्पर्श करण भाग पाडत होती. अखेरच्या टप्प्यावर डोंगरानं त्यांना अजून जवळ येण भाग पाडलच. शेवटच्या पायरीवरून ती जवळजवळ उडी मारून डोंगरापासून विलग होत म्हणाली
ती : ए झाला यार ट्रेक पूर्ण!
तो : हम्म!
ती : काय झालंय म्हसोबा?
तो : काहीं नाही.
ती : तू कुठे जाणार आहेस आता.
तो : तळेगाव. मित्राकडे.
ती : का बसायचा प्लॅन आहे का. ह्या ह्या ह्या!
तो : काहीही हा तू पण!
ती : नाही, तुच्यासोबत बसणार नसशील तर माझ्या सोबत बस.
अर्थव्यवस्थेच्या दिशेचा अंदाज
शेअर मार्केट्मध्ये पैसा कमवायचा असेल तर केव्हा आणि कुठे या दोन प्रश्नांमध्ये सगळी ग्यानबाची मेख असते. मग कॉमनसेन्स वापरून असेही म्हणता येते की अर्थव्यवस्थेला जेव्हा गती मिळते तेव्हा शेअरमार्केट तापायला सुरुवात होते.
सामान्य गुंतवणुकदार "अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीसाठी" वेगवेगळ्या आर्थिक विश्लेषणांच्या गदारोळात गोंधळुन जातो. या विश्लेषणांवर अनेकदा आकडे फुगवल्याचे आरोप केले जातात. साहजिकच सामान्य गुंतवणुकदार निर्णय घेताना वस्तुनिष्ठ आणि सारासार विचार करू शकत नाही.
शिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात – २ (उत्तरार्ध)
आधीचा धागा: शिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात – १ (पुर्वार्ध)
पुर्वसुत्रः
......ड्रायव्हरनं रिक्षा थांबवली. त्याच्या हातावर २०रू टिकवले. घड्याळात पाहिलं तर ११ वाजत आले होते. माझ्या पीजी होस्टेलपासून इथं पोहोचायला तीन तास लागले होते.
भाषा
जिंकण्याची, हारण्याची सारखी भाषा कशाला?
तारण्याची, मारण्याची सारखी भाषा कशाला?
देव अथवा देश दोन्हीं कल्पना या माणसांच्या
व्यर्थ त्यांनी भारण्याची सारखी भाषा कशाला?
माणसांनी घेत जावी काळजी; पण - माणसांची
देवळे उद्धारण्याची सारखी भाषा कशाला?
रोज थोड्या मिळकतीने जुळवतो मी दोन टोके
कर नवे आकारण्याची सारखी भाषा कशाला?
मानतो मी एक बिंदू-मात्र आहे या जगी पण -
सूक्ष्मता स्वीकारण्याची सारखी भाषा कशाला?
- कुमार जावडेकर
स्पर्धेबाहेरची श श क गतानुगतिक
सरदार लुटीची पाहणी करीत होता. त्याच्याबरोबर त्याचा मुलगाही होता.
आत खणणाऱ्या सैनिकाला सांगितले.
"इथे खोदु नका, तो बडा पत्थर उचला पायखान्यात लावायला"
सैनिकाने शेंदूर लावलेला दगड उखणून काढला.
पुढच्या देवळात मौल्यवान वस्तूंची पोती भरण्याचे काम चालले होते.
" मिळेल ते सगळे भर पण बूतला हात लावू नका "
गोंधळलेल्या पोराने विचारले "अब्बाहुजूर तो बुत पायखान्यात आणि हा ?"
" तेल पोतलेला दगड पायखान्यात चांगला बसतो, पाणी ओतले कि सगळे वाहून जाते"
"तो बुत सोन्याची खाण आहे. बात सगळीकडे फैलेल कि खान इतका ताकतवर, बाकी सगळी देवळे फोडली पण इथे त्याचे काही चालले नाही.
मिसळपाव