Skip to main content

पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - २: कराड ते निपाणी

लेखक प्रशांत यांनी मंगळवार, 26/03/2019 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - १ पुणे ते कराड दिनांक १५ डिसेंबर शनिवार संध्याकाळी साधारण सात वाजता हॉटेल पंकज कराडला पोहोचलो. सायकली नीट लॉक करून रूम मध्ये पोहोचलो, तोच गुरुजींचा आदेश आला "पोरांनो आधी स्ट्रेचिंग करूया नंतर अंघोळ करून जेवायला जाऊ" तेवढ्यात सिद्धू पाटलांचा फोन आला "मी कराड पासुन पाच किलोमीटर अंतरावर आहे, ऍसिडिटीचा त्रास होत असल्यामुळे BRM (ब्रह्म) क्विट करण्याचा निर्णय घेतोय. मी येतो तोवर माझ्यासाठी रूम बुक करा" आम्ही सिद्धूची वाट पाहत असताना शैलेशला घरून फोन आला.

काॅफी ही निमित्तमात्र..

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 26/03/2019 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
मग पुढे असं होतं की .. शब्दांमधलं अंतर वाढत जातं. डोळ्यामधलं पाणी सुकत जातं. ओठावरचं हसू निवत जातं... स्पर्श होतात विसरायला.. आणि भांडणं लागतात आठवायला.. नातं लागतं विरायला.. असं होऊ नये म्हणून भेटायचं.. काॅफी ही निमित्तमात्र..
काव्यरस

पेंटर-कथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 25/03/2019 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
पेंटर “टेस्ट पॉझिटिव्ह आहे. पोराला स्वाईन फ्लू झाला आहे.’’ डॉक्टर शांतपणे म्हणाले, “फक्त आताशी सुरुवात आहे. बरं केलं, लवकर आणलंत.’’ नवर्याला आवडणार नाही, त्याला राग येईल हे माहिती असूनही शकुंतला पटकन् म्हणाली, “हे नकोच म्हणत होते; पण मलाच राहवलं नाही. म्हणून आणलं तरी.’’ रघूने आपल्या काळ्या-सावळ्याशा, साध्या बायकोकडे रागाने पाहिलंच. त्याला कामाची खोटी होते म्हणून दवाखान्यात यायचंच नव्हतं. बायकोने एकटीनेच पोराला आणलं असतं तर काय झालं असतं, असा विचार त्याच्या डोक्यात होता. पण स्वाईन फ्लू म्हटल्यावर त्यालाही धक्का बसला. रघू एक पेंटर होता. आताही तो त्याच कपड्यात होता.

केसरी - चित्रपट परीक्षण/रिव्यू - स्पॉईलर अलर्ट

लेखक bhagwatblog यांनी सोमवार, 25/03/2019 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
“युद्धस्य कथा रम्या” असे म्हटले जाते. कारण युद्धात देशभक्ती, पराक्रम, त्याग, राजकारण, प्रखर संवाद, आरपारची लढाई, होत्याम्य, आणि बलिदान यांची भरपूर रेलचेल असते. बऱ्याच वेळेस आपल्याला कथा आपल्याला माहीत असते पण आपण चित्रपट बघतो कारण खरे कौशल कथेची मांडणी करण्यात असते आणि प्रेक्षक त्याकडे विशेष लक्ष देतात. केसरी हा चित्रपट ऐतिहासिक अश्या “सारगढीची लढाई” वर आधारित आहे. ही लढाई १२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या 36व्या शीख रेजिमेंटच्या २१ जवान आणि १०००० अफगाणी पठाण यांच्यात झाली होती. जगातील आता पर्यंतच्या पहिल्या पाच सर्वोच्च लढाईत या लढाईची गणना होते.

कर्करोग आणि दुर्दैव !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 25/03/2019 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. या वैज्ञानिक लेखात हे दैव वगैरे कुठून आले हा प्रश्न लगेच मनात येईल. पण घाबरू नका ! कर्करोगासंबंधात ‘दुर्दैव’ हा शब्द दोन वैज्ञानिकांनीच उपस्थित केलेला आहे. सामान्य माणूस ज्याला दुर्दैव म्हणतो त्याचा वैज्ञानिक पातळीवरील अर्थही त्यांनी सांगितलेला आहे. तो तुमच्यापर्यंत पोचविण्यासाठीच मी हा लेख लिहीत आहे. तर या सगळ्या प्रकरणाची सुरवात २०१५मध्ये झाली.

चित्रपट परिचय - जलेबी

लेखक मराठी कथालेखक यांनी रविवार, 24/03/2019 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
२०१६ च्या ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालेले नसले तरी एका बंगाली चित्रपटाचा हा रिमेक आहे असे विकीपिडीयावर वाचल्याने उत्सुकतेपोटी डाउनलोड करुन मी हा चित्रपट बघितला. चित्रपटाचे शीर्षक जलेबी असले तरी ही गोड-गोड प्रेमकथा नाही. चित्रपटाच्या सुरवातीस नायिका आयेषा मुंबई-दिल्ली ट्रेनच्या प्रवासाला निघते. आधीच निराश आणि वेदनेने व्याकूळ असलेल्या आयेषाला एक समवयस्क अनोळखी स्त्री अनू या प्रवासात भेटते. अखंड बडबड करणार्‍या अनूला आयेषा सुरवातीला काहीशा अनिच्छेनेच उत्तर देत असते. पण हळूहळू आयेषाचा एक समांतर प्रवास सुरु होतो .. आठवणींचा आणि वेदनेचा.

एक गाणे अनेक कथा भाग १ :- चाहूँगा मैं तुझे हरदम

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 23/03/2019 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक गाणे अनेक कथा भाग १ :- चाहूँगा मैं तुझे हरदम एक विनंती :- कृपया अक्षरास हसू नये... वैधानिक इशारा :- हा धागा वाचकांनी आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा, परिणामांना धागाकर्ता किंवा मिपा व्यवस्थापन जबाबदार रहाणार नाही. मित्रांनो एक गाणे अनेक कथा या माझ्या लेख मालेतले पहिले पुष्प तुमच्या पुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

नास्तिकता दिवसांच्या शुभेच्छांच्या निमीत्ताने

लेखक माहितगार यांनी शनिवार, 23/03/2019 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
मुलतः अज्ञेय (अ‍ॅग्नॉस्टिक) राहून दर क्षणास विविध विचारधारांच्या दृश्टीकोणातून विचार करण्याचा अधिकार राखून ठेवणारा अशी स्वतःची लांबलचक व्याख्या करणारा असल्यामुळे आस्तिकांसोबतच नास्तिकांनासुद्धा (टिकेप्रमाणेच) मनापासून शुभेच्छाही देत असतो तशा या २३ मार्च २०१९ या जागतिक नास्तिकता दिवसाच्या नास्तिकांना हार्दीक शुभेच्छा. ( जे माझे लेखन प्रथमच वाचताहेत त्यांच्यासाठी मी सर्वधर्मीय आस्तिकता आणि नास्तिकता यांच्या चांगल्या बाजू आणि मर्यादा दोन्हीचीही या पुर्वी वेळोवेळी दखल घेऊन झालेली आहे.

आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 22/03/2019 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था इतर लेख आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती आकाशदर्शन कार्यक्रम करणाऱ्या संस्थांविषयी हा वेगळा धागा काढत आहे. १) खगोलमंडळ -Head office - शीव, साधना विद्यालय ,बुधवारी. नोंदणीकृत सहकारी संस्था. शाखा - मो ह विद्यालय ,ठाणे आणि टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली, होत्या. यांचे आकाशदर्शन कार्यक्रम वांगणी - पाटोळे बाईंच्या फार्मवर.