Skip to main content

दोसतार - २२

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 22/06/2019 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी सकाळ समजून बराच लवकर जागा झालो होतो. आणि रात्री तीन वाजता अंघोळ केली होती. आता यापुढे झोपणे शक्यच नव्हते. गजर होईपर्यंत तरी काहीतरी करुया म्हणून इंग्रजीचे पुस्तक काढले. सरांनी सांगितलेला धडा वाचून तरी पाहूया. काही समजलंच तर चांगलंच आहे. आणि आईने विचारलं काय करतो आहेस तर सांगता येईल की अभ्यास करतोय म्हणून. ती निदान सहल तरी रद्द करणार नाही. ते ऐकून. पुस्तक उघडले आणि वाचू लागलो. "वन्स अपॉन अ टाईम.

नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 21/06/2019 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज! नाती म्हटलं की आपल्या मानत रक्ताची नाती उभी राहातात. पण ही रक्ताची नाती मुळात निर्माण होतात ती एका विश्वासाच्या नात्यामुळेच. पती-पत्नीचं नातंच मुळी केवळ प्रेम आणि विश्वास यावर उभं राहातं. अर्थात पुढे जाऊन त्यात प्रेम किती आणि विश्वास किती हे मोजणं अवघड जातं. अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. तर लग्नानंतर निर्माण झालेल्या अनेक नात्यांच्या गुंतागुंतीमुळे हे पती-पत्नीचं नातं सांभाळून घेतलं जातं किंवा टिकवलं जातं. सुरवातीच्या काळातले गुलाबी ढग संपता-संपता नवीन पाहुण्याची चाहूल असते.

बिरादरीची माणसं - मनोहर काका

लेखक लोकेश तमगीरे यांनी शुक्रवार, 21/06/2019 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
भामरागड पुलावरून पाणी असतांना गावातील लोकांना घरी आश्रय द्यायचा असो किंवा रणरणत्या उन्हात तेंदूपत्ता तोडतांना होरपळून गेलेल्यांची तहान शमवायची असो…… कुणाचे दुःख कमी करायचे असो की कुणाचा आनंद द्विगुणित करायचा असो…… जन्म दाखला, बँक अकाउंट, मनी विथड्रॉव्हल, किराणा, बाजार करणे.. इत्यादी लोकांच्या कुठल्याही कामासाठी आपली दुचाकी घेऊन नेहमीच तयारीत असणारी ही व्यक्ती. चांगल्या कामासाठी "नाही" हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो ….. हो अगदी बरोबर ओळखलं..."डॉ.

त्यांची लँग्वेज वेगळीय!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 21/06/2019 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
*इ.स.२०३० मधल्या इयत्ता दुसरीतल्या दोन मुलांचे फोनवरचं संभाषण!* चिन्मय: अरे अन्वय तुला माहिताय का? या मोठ्या लोक्सची लँग्वेज काही वेगळीच असते. अन्वय: म्हणजे? चिन्मय: अरे आपल्याला तो कम्पल्सरी सब्जेक्ट नै का? मराठी? त्यात आपण नंबर्स कसे प्रोनन्स करतो? म्हणजे २०‍१ ला आपण वीस आणि एक म्हणतो किंवा ४९ ला चाळीस नऊ म्हणतो ना? अन्वय: हो बरोबर! चिन्मय: अरे पण हे मोठे लोक्स तसं नै म्हणत.ते २०१ ला दोनशे एक म्हणतात.

माझे आजी आजोबा

लेखक chittmanthan.OOO यांनी गुरुवार, 20/06/2019 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आजी आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला नशीब लागत असे म्हणतात. आजकाल जनरेशन गॅप मुले प्रत्येक मुलाला आज्जी आजोबांचे प्रेम मिळतेच असे नाही. पण मी नशीबवान आहे कारण मला माझ्या आजी आजोबांची संगत मिळाली. मला आज्जी चे प्रेम ज्यास्त मिळाले आणि अजूनही मिळतेच आहे. आजोबांचा सहवास थोडा कमी मिळाला कारण मी सातवीत असताना ते गेले.त्यांना मी लाडाने आबाजी म्हणायचो. ते दहा वर्षे पार्किन्सन्स ने आजारी होते. शेवटचे दिवस तर इतके हाल झाले की काय बोलायला नको. मी आजी आजोबांच्या खोलीत झोपत असल्याने होणारे हाल बघितले होते. माझ्या आजीने त्यांची खूप सेवा केली .

मिरची तूफान

लेखक योगेश कुळकर्णी यांनी गुरुवार, 20/06/2019 05:09 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: ही सुद्धा एका युट्यूब चॅनल वर पाहीलेली आणि घरी नंतर ट्राय केलेली रेसीपी. थोडे बदल केले आहेत माझ्या सवयीनुसार पण हे ही सुप्पर झालं होतं. तर साहित्य - - ओंजळभर मिरच्या (नेहेमीच्या, फोडणीत तिखटपणाला ज्या वापरतो त्यत्या) - २ ते ३ चमचे बेसन (चण्याच्या डाळीचं पीठ) - चमचाभर धण्याची पूड - पाव चमचा हळद - अर्धा/पाऊण चमचा बडीशेप पूड - एका मोठ्या लिंबाचा रस (मूळ कृतीत आंबट दही वापरलेलं आहे) - मीठ - २-३ टेबलस्पून तेल, मोहोरी, चिमटीभर हिंग क्रमवार पाककृती: - मिरच्या धूवून, पुसून कोरड्या करायच्या आणि नंतर भरल्या वांग्यांना + आकारांत चिरा देतो तसं चिरून घ्यायचं; म्ह