Skip to main content

श्रीकृष्ण

लेखक शरद यांनी सोमवार, 05/08/2019 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीकृष्ण (महाभारतातील व्यक्तिचित्रे ) काही वर्षांपूर्वी " महाभारतातील व्यक्तिचित्रे " या लेखमालिकेत भीष्म, द्रौपदी, पार्थ, इ. पांच पात्रांचा; महाभारतात म. व्यासांनी त्यांच्याबद्दल काय लिहले याचा परिचय करून दिला होता. एका विषयावर किती लेख लिहावयाचे व असे लेख किती लांबवावयाचे याबद्दल मीच साशंक असतो त्यामुळे वाचकांचा आग्रह होता तरी थांबलो. पण हेही खरे की श्रीकृष्णाबद्दल लिहले नाही तर "महाभारताबद्दलच " लिहावयाचे राहिले असे म्हणावे लागेल ! कृष्ण व कर्ण समोर ठेवून तर महाभारत लिहले. श्रीकृष्णाविषयी म.

हे असे का असावं?

लेखक तमराज किल्विष यांनी सोमवार, 05/08/2019 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं. जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले. बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही.

श्रावण आला गं सखे

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 04/08/2019 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण आला गं सखे ---------------------------- श्रावण आला गं सखे माहेराची सय आली हाती जरी किती कामं त्या साऱ्याला लय आली परसात एक आड अंगणात किती झाडं त्या झोक्यांची याद आली प्रेमळ गं भाऊराया वहिनी करिते माया भेटायची इच्छा झाली देवासमान गं पिता देवासमान गं माता पानं गळायला आली आताच जायला हवं त्यांना पहायला हवं चिंता इथे भय घाली ------------------------ बिपीन

मितान्नीच्या राजवाड्याचा शोध ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 04/08/2019 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
मितान्नी साम्राज्य! कपोलकल्पित नव्हे तर पुरातत्वीय आधार असलेला इतिहास. काही वैदीक देवतांची नावे आणि काही संस्कृतशब्द थेट मध्यपुर्वेत आणि तेही ईस्वीपुर्व १५०० ते ईस्वीपुर्व १४०० च्या काळात, आजपासून सुमारे साडेतीन हजार वर्षांपुर्वी. मितान्नीच्या सम्राटांनी तो फारसा जतन नाही केला पण त्यांचा पत्रव्यवहार इजिप्त सहीत आजूबाजूच्या प्रतिस्पर्धी राजवटीतून सापडलेला. क्ले टेब्लेट म्हणजे मातीच्या पाटीवरील तेथील तत्कालीन भाषेतील क्युनीफोर्म लिपी स्वरुपात. हे राजे दुचाकी रथ म्हणजे आपण टांगा म्हणतो त्या प्रकाराचा युद्धोपयोगात प्रवीण असावेत.

स्ट्रेंजर थिंग्ज

लेखक nishapari यांनी रविवार, 04/08/2019 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
स्ट्रेंजर थिंग्ज - लेखक आशुतोष जरंडीकर स्ट्रेंजर थिंग्ज या मालिकेबद्दल लिहावं असं खूप दिवस वाटत होतं पण त्याला न्याय देणं आपल्या लेखणीला झेपेल असं वाटत नव्हतं . आशुतोष जरंडीकर हे या प्रकारचं उत्तम समीक्षण लिहिणारे समीक्षक आहेत .. त्यांचा स्ट्रेंजर थिंग्जचं रसग्रहण करणारा हा सुरेख लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे ... त्यांची परवानगी घेऊन इथे शेअर करत आहे . विज्ञान-फॅन्टसी यांचा सुरेख मिलाफ... लेखक - आशुतोष निरंजन जरंडीकर ... मैत्री आणि प्रेम हा समान गाभा असलेल्या हॅरी पॉटरने एक दशक गाजवलं होतं. पॉटर सोबत एक पिढी मोठी झाली होती.

मी अजिबात घाबरत नाही.....!

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 04/08/2019 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
अमावस्येची रात्र! ऑफिस मधून सगळे लवकर घरी गेले होते. माझे काम मात्र अजून पूर्ण व्हायचे होते. मी एकटाच फाईलवर रिमार्क लिहित बसलो होतो. घड्याळाच्या मोठा काट्याने १२ वर येत ९ वर असलेल्या छोट्या काट्याशी काटकोन केला. उशीर झाला होता. पण मला चिंता नव्हती. तसाही मी अंधश्रध्दाळू नाही. त्यामुळे, अमावास्येला घरी लवकर जाऊन झोपायचे असते, असे कोणी कितीही सांगितले तरी ते मी ऐकत नाही. शेवटी काम महत्त्वाचे! आणि त्यात मी खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा वगैरेला तर अजिबातच घाबरत नाही. त्यामुळे हातात मंतरलेला गंडा बांधणे वगैरे असले काही नखरे नसतात माझे. या उलट माझे घाबरट कलिग्ज्!

युगांतर - आरंभ अंताचा भाग 20

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 04/08/2019 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द झाडी आणि हवेतला पहाटेचा आल्हाददायक गारवा मनाला सुखावत होता. पंडू, कुंती आणि पंडूची द्वितीय पत्नी मद्रनरेशकन्या माद्री वनविहाराला आले होते. फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर उडत होती. भुंगे गुंजारव करत होते. तितक्यात एक सुंदर हरिण उंच वाढलेल्या गवतातून पळताना पंडूला दिसले. आहाहा! काय ते रुप! सुवर्ण कांती! पंडूने धनुष्य हातात घेतले आणि हरिणामागे धावत गेला. कुंती आणि माद्री वनातल्या फुलांना बघत पक्षांची किलबिल ऐकत कितीतरी वेळ पंडूची वाट पाहत होत्या. सुर्यदेवांचे दर्शन घेत सुर्यफुले पिवळ्या धमक रंगात शोभून दिसत होती. वाऱ्यावर झुलत होती. दुपार होत आली आणि पंडू परत आला.

आत्तोबा

लेखक लोकेश तमगीरे यांनी रविवार, 04/08/2019 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
७५ वर्षाचा माणूस म्हंटल्यावर साधारणतः आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र उभे राहते हो ? ... ज्याचे दोन्ही गुडघे झिजले आहेत आणि कंबर, पाठदुखी, मानदुखीमुळे जो दिवसाचा ८०% वेळ घरात आराम खुर्ची किंवा बिछान्यावर घालवत आहे. कधी बाहेर काम पडलंच तर लगेच ड्रायव्हरला घेऊन चार-चाकी गाडी मध्ये फिरणारा, स्वतःची सर्व वैयक्तिक कामे दुसऱ्यांच्या मदतीने करून घेणारा, डायबिटिज, हायपरटेन्शन, आर्थराइटिस इ. रोगाने ग्रस्त आणि म्हणून मरणाची सतत चिंता करणारा, किंवा रीटायरमेन्ट होऊन घरी आरामात आयुष्य काढणारा.. पण मी ज्यांना २ वर्षांपासून बघत आलो आहे ना त्यात वर वर्णिल्याप्रमाणे काहीच नाही.

निवेदन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/08/2019 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रो गेल्या काही धाग्याना मिळेलेला अत्यल्प प्रतिसाद बघता मी मी पा वर धागे गुंफणे थांबत आहे आता पयंत आपण प्रतिसादाच्या रूपानं माझ्यावर प्रेम केले त्या बद्दल धन्यवाद माझे लेखन वर गेलो असताना मी ३५०च्या वर धागे गुंफल्याचे मला आढळले -मला वाटते इतक्या संख्येने सातत्याने लिहिणारा मी एकमेव सदस्य असावा वास्तविक कारखानदारी फ्याक्टरी सारख्या रुक्ष वातावरणात वावरत असताना हि मी पा मुळे मी लिहायला शिकलो शृंगार काव्य लेख कथा असे अनेक प्रकार हाताळले मी पा माझे आवडते संकेत स्थळ आहे मी पा च्या वाटचालीस आमच्या शुभेछया ज्याकालीन चित्रे एक अधोविश्वातली तरल प्रेमकथा च अर्धवट लेखन झाले