Skip to main content

पाणी-च-पाणी

लेखक बी.डी.वायळ यांनी मंगळवार, 03/09/2019 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
असा कसा हा पाऊस | पडला बेधुंद होऊन, कित्येकांचे संसार , गेले पाण्यात वाहून | शंभर वर्षाचा त्याने, म्हणे रेकॉर्ड मोडला | जणु फाटले आकाश, असा पाऊस पडला | सरला श्रावण मास, भाद्रपद सुरु झाला | तरी ही पावसाचा, जोर कमी नाही झाला | किल-बिलती पाखरे, कशी झाली ओलीचिंब | परी कधी नाही केली, त्यांनी कुठे बोंबाबोंब | मिळेना खेळायला, मैदाने झाली ओली | कंटाळुन गेली ती, शाळेतील मूल-मुली | पडला पाऊस बेभान, पिके पाण्यात बुडाली | शेतकरी बांधवाची, झोप रात्रीची उडाली | चारतात गाई दूर, त्या रानमाळावर | येती पावसाच्या सरी, घेती आपल्या अंगावरी | रानातील पशु-पक्षी, कापतात थर थर | थंडी पावसात नाही , त्यांना उब
काव्यरस