India Deserves Better - ३. शहरीकरण, अनधिकृत बांधकाम, समस्या आणि नियोजनाचा अभाव.
शहरीकरणाच्या समस्ये वर बोलण्या आधी यावेळेस मी आधी थोड्या फार नियोजनाबद्दल बोलतो त्या नंतर समस्या आणि उदासिनता यावर बोलेन.
शहरीकरणाची धोरणे यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय आर्थिक धोरण, क्षेत्रीय धोरण आणि शहराचे अंतर्गत व्यवस्थापन हे घटक महत्त्वाचे ठरतात. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे संहार आपण नुकतेच पाहिले आहेत, केरळ हे त्याचे ताजे उदाहरण, २०१५ मधील चेन्नई मधील पूर, पण या मधुन आपण काय शिकलो ? अनधिकृत मुद्याबद्दल मी नंतर बोलेणच पण घनत्व आणि अतिसंवेदनशिल भाग हे सुद्धा खुप जोखीम असलेले मुद्दे आहेतच.
शहरीकरणाला चांगली बाजूही आहे. देशाचा आर्थिकविकास हा शहरीकरणावरही अवलंबून असतो.
मिसळपाव