रँडम चॅट - लघुकथा
'पुढील स्थानक दादर' .लोकलमधल्या घोषणेमुळे मंदार भानावर आला. त्याच्यासाठीचा हा रोजचा प्रवास. समोरच्या माणसांना ढकलत तो दरवाज्यापाशी आला. नेहमीप्रमाणे त्याच्याच वयाचा एक मुलगा दरवाज्यापाशी आला होता. हाही दादरलाच उतरायचा. मंदारला बघून त्याने ओळखीचे हसू दिले. तशी काही फारशी ओळख नव्हती पण रोज पाहून चेहरे ओळखीचे झाले होते. अनोळखी असूनही
ओळखीचा होता तो! मंदार मात्र दरवाजातून बाहेर डोकावत होता. आज कोण जाणे काहीतरी बिनसले होते. उगाचच उदासीपणाचे मळभ दाटून आले होते. एवढ्यात दादर आले देखील.
मंदार गर्दीबरोबर उतरू लागला. प्लॅटफॉर्मवर पाय ठेवताना मागून त्याला कुणाचा तरी धक्का लागला आणि तो तिथेच पडला.
मिसळपाव
