दुपारची झोप
सणवाराला सकाळपासून चालेली जेवणाची लगबग पोटात कावळे जमा करतं…मिनिटामिनटाला आवंढे गिळणं चालू होतं…पण अजूनही तुम्ही भूकेच्या तटावर उभे राहत निमूटपणे सहनशक्तीशीं निकराची लढाई करत असता….कधी एकदा नैवदयाचं ताट देवापुढं ठेवलं जातयं, आणि तुम्ही जेवताय असं होऊन जातं…जीभेचं तातकळणं सुरु व्हायला लागतं…पण अजून अवकाश असतो… जेवणाच्या तयारीची लगबग सुरु होते एकदाची… तुम्ही स्वयंपाकघराच्या बाहेर उभे राहत नुसताच कानोसा घेत असता…. जसाजसा एकएक जिन्नस एकमेकांत घुसळत जातो, आगीचा धग अजून एकात एक मसाल्यांच्या चाललेल्या सरमिसळीला आपला-आपला रंग चढवत चाललेला असतो…आपल लक्ष कुठं दुसरीकडे लागतचं नसतं….
मिसळपाव
अमिताभच्या अग्निपथ बद्दल खूप काही ऐकून होतो. पिक्चर कल्ट वगैरे आहे म्हणून. त्यामुळे अखेर नेटफ्लिक्सवर पाहण्याची हिंमत केली. हा चित्रपट कल्ट आहे हे कोणी ठरवलं देव जाणे पण तो रिलीज झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप का झाला असेल हे सांगणं मात्र काही अवघड नाही.
अत्यंत कमजोर कथा जिला अमिताभने फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर तारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.