सुटकेस ४
सुटकेस ३
------------------------
ह्रदयाचे ठोके धडाधड पडत होते. डोक्यात घण वाजत होते. जीवन आणि मृत्यू मध्ये असल्यासारखे हे क्षण अगदीच पछाडून सोडत होते. गाडीला किक मारून मी शंकराचे एक प्रशस्त मंदिर आहे तिकडे निघालो. संकटकाळी आता तोच वाचवणार!
धूप, उदबत्त्या, फुले यांनी मंदिर अगदी दरवळून गेले होते. भाविक भक्तीत तल्लीन होऊन शंकराचे दर्शन घेत होते. आणि मी एका दगडी खांबाला टेकून उदासवाणा बसलो होतो.
एका उजळ चेहऱ्याच्या साधूने मला खायला प्रसाद दिला.
मिसळपाव