Skip to main content

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - Chocolate Cha Bangla | Marathi Rhymes & Balgeet ए० आय० ने बनवलेले दुसरे पूर्ण मराठी गाणे

लेखक स्वरुपसुमित यांनी रविवार, 06/07/2025 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद जुना धागा संपादक मंडळाने क्रुपया उडवावा,त्यातले दुवे बदलले गेले आहे मित्रानो दुसरे पूर्ण गाणे mfa व्हर्जन ज्यात फक्त लहान मुलांसाठी व्हिडिओ ची लिंक,ह्यात तुम्हे कॉमेंट करू शकत नाही https://youtube.com/shorts/mOcvDaEZBoE?feature=share साधी लिंक https://youtube.com/shorts/1nhbGOBGvOM?feature=share आता काही दिवस विश्रांती पुढचा ये रे येरे पावसा वर करायचा विचार आहे पण काही अनिमेशन सुचत नाही ए० आय० मध्ये काही गोष्टी जमल्या नाही खारिचे शेपुट मुले साफ सफाई जम

आषाढी एकादश

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 05/07/2025 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादश, भक्त कासावीस, विठ्ठलाची आस, दर्शनाची || उचंबले मन, हरपले भान, लागलेच ध्यान, पांडुरंग || वैजयंती सुगंध तुटे भाव बंध, वैष्णव ते धुंद, नाचण्यात || टाळ मृदुंग धून, विठ्ठला चे गुण, भजन आतून, कीर्तनात || नाचे वारकरी, तुळशी हार करी, भवतारु पारकरी, कृपावंता || कसा भक्तीरंग, बाजीगर दंग, पाहता अभंग, लेखणीत ||

माझे माहेर पंढरी - स्वैर चिंतन ३

लेखक माहितगार यांनी शनिवार, 05/07/2025 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. सकाळी जरा उशिराच जाग आली. कार्डिओचे काही व्यायाम प्रकार जमत नसल्याने घराच्या खिडक्या बंद करून, यूट्यूबवरची गाणी लावून मी स्लो मोशन नृत्य अधूनमधून करून बघतो. पंढरीच्या वारीच्या निमित्ताने आज घरी मंडळींनी अभंग लावलेले. त्यावर जरासा ताल धरला. या तालावर उडी मारणे मला जमत नाही, याकडे आमच्या मंडळींनी लक्ष वेधले.

मामाच्या गावाला जाऊ या ए० आय० ने बनवलेले पहिले पूर्ण मराठी गाणे

लेखक स्वरुपसुमित यांनी शुक्रवार, 04/07/2025 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद - हे गाणे बनव्हायला सुरुवात मी केली पण त्याच्या ३ दिवस आधी तरी हेच गाणे ससे वापरून बनवले होते पण वीडेओ नव्हता शॉर्ट होते मी पूर्ण ३+ मिनिटाचा वीडेयो बनवला आहे ५ -५ सेकंदाचे व्हिडियो बनवणे आणि जोडणे खूप जिकिरीचे काम होते ,शेवटी शेवटी आधीचीच फुटेज थोडी वापरली (लहानपणी ऍनिमेशन गाणी बघतांना बर्याच वेळा एकाच क्लिप रिपीट का दाखवतात हे आज कळाले ) पण ना नफा तोटा वर बनवत असल्याने चूकभूल देणे घेणे कृपया हे गाणे सगळीकडे शेयर करा २००० views आरामात होतील ,मग पुढचे गाणे ,तसेच तुम्हाला अजून एखादे बालगीत बनवून पाहिजे असेल तर कंमेंट किंवा व्यनि करावा

खडपाकोळी

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 03/07/2025 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी राखू कशी, अंगावरली ? राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!! कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील. सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो. पावसाची संततधार आणी चिखल,पक्षीदर्शन दुर्लभ झालेआहे.तरीही सवयीनुसार चालताना नजर भिरभिरत असते.

पाऊसः ३

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 02/07/2025 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस: १ पाऊसः २ ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जूनमध्ये येणारा पाऊस मे च्या मध्यातच सुरु झाला. भाजून काढणार्‍या एप्रिलनंतर मे मात्र सुखद गारवा देऊन गेला. सह्याद्रीच्या विकट शिखरांवरती पाऊसकाळाची चाहूल दाटून आली, नभमंडळावर गडद मेघांची सैन्ये आक्रमू लागली. क्षितिजाच्या कडांवरुन सावळ्या ढगाण्चे घोडदळ आकाशाला व्यापून टाकू लागले.

स्वार्थी फुलांचा परमार्थ

लेखक Bhakti यांनी बुधवार, 02/07/2025 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" कादंबरी ऐकतेय, स्वार्थ हाच एक परामार्थ आहे,हे त्यातलेच वाक्य आहे.यात पुढे निसर्गातील इतर सजीवांचा स्वार्थीपणा सांगताना म्हटलंय...म्हणजे आशय असा होता की, ही फुलं इतक्या मोहक रंगात उमलतात,सुगंधात दरवळतात ती काय माणसाला आनंद व्हावा म्हणून नव्हे.तर त्यांचं प्रजननाचे चक्र अविरत चालू रहावे म्हणूनच! पण लक्षात आलं.या सुंदर फुलांनी नकळत एक समाधानाचे चक्र माणसासाठी आपसूकच सुरु केलंय.सकाळच्या शांत पाखरांच्या गुंजारवात,कधी दवांनी भिजलेली,पावसाच्या थेंबात न्हालेली गुलाबी पाकळ्यांची अदा,जांभळ्या गोकर्णाचा मऊसर रंग‌ हाती का उमटत नाही?असा बाळबोध मनाला प्रश्न पडलेला.पारिजात फु

पार

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 02/07/2025 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
जनुकांचा जिना सोसे प्रसवाच्या कळा श्रवणाच्या पार उभा अनाहत निळा प्रतिबिंब जाऊ पाहे बिंबाच्याही पार उडोनिया पारा उरे काच आरपार पिंपळाच्या पारापाशी खोरणात दिवा लावण्यास कोण येते घोर लागे जीवा नक्षत्रांच्या पार जाई मिथकांचा पैस सृजनाच्या कल्लोळात सावरून बैस शब्दांच्याही पार ओळ कवितेची गेली लुटुपुटू राजा खेळे तरी भातुकली

काल पाकिट रिकामे केले..

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 02/07/2025 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
काल पाकिट रिकामे केले.. पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता. कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला.. गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली. एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते. एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला.. आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही. एक चुरगळलेला पासपोर्ट साईज फोटो सापडला..

ए० आय० पेक्षा भयानक तंत्रज्ञान येत आहे...

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 01/07/2025 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
 माझ्या या पोस्ट्मध्ये (https://www.misalpav.com/node/52703) २०२२४ मध्ये एका संघोट्याशी झालेल्या भांडणाची हकीकत लिहीली होती. चीनबद्दल मी जेव्हा ही भूमिका घेतली तेव्हा ब्लूमबर्गने आयोजित केलेल्या एका परिसंवादात केलेल्या भाषणाचा त्याला आधार होता. हा चीनचा प्रतिनिधी मोठ्या अभिमानाने सांगत होता की आमची पॉलिसी डॉक्युमेण्ट वाचा. आमच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीचा दर ८०-८५% टक्के आहे.