कडं २
तपकिरी रंगाचं बांड कुत्रं ते. इवल्याशा झुडपाच्या सावलीत अंग चोरून बसले होते. दुपारचं लाही लाही करणारं ऊन. रानवटीचे खुरटे झोंबरे काटे. वारा सुटला तरी तापलेल्या झळया लाग्याव्यात. वाळलेली कुसळं आणि सुदूर पसरलेल्या येड्या बाभळी. चढउतार असलेला खडकाळ प्रदेश. पहावे तिकडे मृगजळेच दिसावी. लखोबाची वाडी अशी भरदुपारी शांत निवांत सुस्तावून जायची. भरगच्च जेवलेल्या ढेरपोट्या म्हाताऱ्यासारखी.
बांड्या कुत्र्याचा डोळा लागणारंच होता की भरधाव वेगानं एक गाडी त्याच्या पुढून निघून गेली. कुत्रं थोडं भांबावलं. आणि आयतीच नामी संधी शोधत गाडीच्या मागे तुटून पडलं. जोरजोरात भुंकत गाडीच्या मागे धाव धाव धावलं. मग थकलं.
मिसळपाव
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले.
रत्नाकर मतकरींचे लेखन जरी चतुरस्त्र असले तरी मला सर्वात जास्त आवडल्या त्या त्यांच्या गूढकथा. काय एकाहून सरस गूढकथा लिहिल्यात त्यांनी. धारपांच्या भयकथा लेखनात प्रामुख्याने अतिंद्रिय शक्ती, सुपरनॅचरल पॉवर्स असंत.