Skip to main content

मिसळपाव साइटवर लेखनात audio file देणे.

लेखक कंजूस यांनी सोमवार, 25/05/2020 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर mp3 ओडिओ फाइल देणे. ओडिओ फाईल्स या .wave / .wav / .mp3 / .aac / .ogg असू शकतात. पण काहीच वर्शन अपलोड होतात.
फाईल प्रथम कुठल्यातरी sharing साइटवर टाकून ( अपलोड करून) तिथून लिंक मिळवावी लागते. ती इथे द्यायची. लिंक मिळवण्यासाठी तीन साईट्स ट्राई केल्या आहेत.
A )गूगल ड्राइव
गूगल ड्राइववर पूर्वी ओडिओ प्लेअरचा कोड मिळत असे. आता दिसत नाही.
https://drive.google.com/drive/my-drive
हे उघडून sign in करणे जीमेल आइडीने.
- upload file
- share करणे. लिंक मिळेल.

लॉकडाऊन सुरु आहे. - भाग २ - इंजिनिअरींग ऍडमिशन

लेखक श्रीकांतहरणे यांनी रविवार, 24/05/2020 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
ऍडमिशन हॉलमदे, इकडे तिकडे पाहत, कोणी भेटते का एखादा तरी ओळखीचा दोस्त, माया शोध चालू होता. कस दिसण बे कोणी? हा त तिसरा राऊंड होता. सगळ्यांन, बारावीमदे केलेल्या मेहनतची चांगली बक्षीस घेऊन, आधीच दोन राऊंड खल्लास केले होते. आता उरल सुरलं, काई हाय का आपल्या नशिबात? का ते पण नाय? याचाच उत्तर शोधले, मी लई आस लावून, माया नंबरची वाट पाहत उभा होतो. अचानक एक लंबु , बारक, सावळस, थोड ओळखीच पोट्ट, त्याच्या बाबांबरोबर उभ दिसल.

थांब ना

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 24/05/2020 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
थांब ना जरा... अरे आज शेवटचं भेटतो म्हटलास ना? मग निदान आता घाई तरी नको करूस. संबंध शरीराला भूल दिल्यासारखं होतंय मला. माझ्यातल्या जीवंतपणाला जीवनाचं रुप तुझ्या सोबत मिळालं. सातशे... तब्बल सातशे कोटी लोकसंख्या आहे जगाची. तरी मग तुलाच कशी‌ रे माझ्या मनाची किल्ली गवसली? तू असलास की विस्मरणात गेलेले सगळे आनंदाचे क्षण मनात पुन्हा पिंगा घालू लागत. तुझ्या खांद्यावर रडत रडत दु:ख हलकं करायचे त्याचंही मला सुखच लागायचं. माझा श्वास आज मला सोडून जातोय तर हृदयाची तडफड होणार नाही का रे..? आणि माझं सगळं त्राण आजच का संपलंय?

शब्दखेळ : विरंगुळा

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 24/05/2020 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द्प्रेमींसाठी विरंगुळा खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा. 1 ऐच्छिक : 2 अपूर्णता : 3 विष्णूचे स्थान : 4 वाचा : 5भिन्नता : 6काळी तुळस : 7 सावत्र : 8धन्वंतरी : 9कायदेशीर : 10 आश्चर्य : 11गरूड : 12 समृद्धी : 13 सीता : 14 ऐश्वर्य : 15 निष्फळता : 17 शत्रू : 18 चारा : 19 संन्यासी : 20 ओसाड : 21 कुबेर : २२. चतुर्वर्णापैकी एक : 23. विष्णूभक्त : 24 निज 25 सूड उगवणे : 26 लग्नाची एक पद्धत : 27 अग्नी :

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सातवा) ३१.१०.२०१९ सिरा ते बंगलोर

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी रविवार, 24/05/2020 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सातवा) ३१.१०.२०१९ सिरा ते बंगलोर सायकलिंग सिराच्या सरकारी गेस्ट हाऊस मधून सकाळी साडेपाचला राईड सुरु झाली. सकाळची सायकलिंग अतिशय आल्हाददायक होती. पूर्व दिशा हळूहळू तांबूस रंगप्रभेने आरक्त होऊ लागली. आकाशांत ढगांचे बागडणे सुरू होते. आज अभिजित आणि दीपक सर्वात पुढे होते. ब्लुटूथ स्पीकरवर सकाळची आवडती गाणी लावून त्यांची रपेट सुरू होती. मागोमाग मी आणि लक्ष्मण मोबाईलवर पहाटेची भक्तीगीते लावून, भक्तिरसात न्हात राईड करत होतो. आमच्या मागे विकास, नामदेव आणि सोपान मार्गक्रमण करत होते. आता सुरू झाला प्रकाश कवडश्यांचा खेळ.

जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 23/05/2020 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत? --श्री मंगेश पाडगावकर मागेच लिहिलं होतं-- एक दिवस दवाखाना बंद ठेवला परंतु रस्त्यावरचे स्वच्छता कर्मचारी साधे पोलीससुद्धा काम करत आहेत पाहून स्वतःची लाज वाटली म्हणून आम्ही (मी आणि बायको) दवाखाना चालू केला. एक दिवसा आड बातमी येते अमुक डॉक्टर तमुक डॉक्टर दिवंगत झाले. त्यातून बायका जास्त तणाव घेतात. त्यामुळे बायको एक दिवसाआड डिप्रेशन मध्ये जाते. तिच्या (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद( घाटी) च्या) डॉक्टर मैत्रिणी अशाच बाबी जास्त बोलत राहतात तिथे सुरुवातीला रुग्ण कमी होते आणि मग एकदम भसकन रुग्ण वाढले त्यामुळे ते सर्व लोक टरकले आहेत.

कोरोनासोबत जगायचे आहे...!

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 23/05/2020 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाउन म्हणायलाच तेवढा राहिलाय. दैनंदिन रूटीन हळूहळू वळणावर येतंय. टीव्ही चॅनल्स चा धोशा आता कुणी फारसा मनावर घेत नाहीयेत. रेल्वे एष्ट्या सुरु झाल्या आणि आतापर्यंत लॉकडाऊन असलेल्या कोरोनाला पाय फुटू लागलेत. आतापर्यंत बंद डब्यात असलेल्या लहानलहान गावांतून कोरोना रूग्ण वाढू लागलेत. आमच्या गावातही ४-५ निघाले. आता तर सगळेच व्यवहार सुरु झालेत. सगळे म्हणतात, खबरदारी घ्या. लहानपणी एकदा एकांच्या घरी गेले होते. तिथे घराच्या चार भिंतींच्या आत, मध- घरात एक मोठे च्या मोठे नागाचे वारूळ होते. होय, घरात !!