Skip to main content

रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 26/06/2020 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
हे भगवन्, ह्या एवढ्या सगळ्या शीट्सची नुसती नावं ऐकूनच माझे टाके आणि गात्रं ढिली व्हायला लागली आहेत...आता मी कसं करावं भगवन् ?? हे अर्जुना sss थांब.. असा भ्रमित होऊ नकोस..! आता तू तयार आहेस..

गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक २ काहूर

लेखक @tul यांनी शुक्रवार, 26/06/2020 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय, एकदा लिहिलं , खोडलं , पुन्हा लिहीलं, पुन्हा खोडलं पण प्रिय तर आपल्याला ज्या व्यक्ती आवडतात त्यांना लिहितो ना मग का खोडलं मी? प्रिय तुझं भावना पत्र मिळालं. तुला माहितेय इतक्या वर्षांनी मला कोणीतरी संबोधून पत्र लिहिलंय. आज अनेक वर्षांनी मी पत्र वाचतोय. तेही केवळ मला आलेलं. आणि कोणी लिहिलेलं? तिने जिने मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी स्थान ग्रहण केलय. वर लिहीत होतो खोडत होतो आता धीर आलाय. हो केलं आहेस तू एक स्थान तयार माझ्या मनात. म्हणजे जे मला वाटतं होतं अगदी तस्संच तुलाही वाटतं होतं तर. थोड्याश्या भीतीने तू म्हणालीस चहा कॉफी?

अथ श्री पुरुषलीळा।

लेखक आजी यांनी गुरुवार, 25/06/2020 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणूस वेगळा असतो तसा प्रत्येक पुरुषही वेगळा असतो. पण तरीही सर्व पुरुषांच्यात मिळून काही गोष्टी सारख्या,समान असतात. मग तो नवरा, मुलगा, भाऊ, काका, मामा कुणीही असो. याला काही सन्माननीय अपवाद असतातही. पण अपवादाने नियमच सिद्ध होतो. ट्रेन किंवा बस सुटायची वेळ झाली तरी वेळेवर न येणे हा कॉमन पॉईंट. ट्रेनची शिटी होते. सिग्नल मिळतो. ती हलते. चालू लागते तरीही खाली उतरलेल्या पुरुषाचा डब्यामधे पत्ता नसतो. बायको कावरीबावरी होते. मुलं रडू लागतात, तेव्हा कुठे हे पुरुषमहाशय कंपार्टमेंटमधे येतात.

चहा वालं प्रेम

लेखक सहज सिम्प्लि यांनी गुरुवार, 25/06/2020 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेहून सुट्टीसाठी घरी आलेली ऋतु लॉकडाऊन मुळे भारतातच अडकली होती. आपलं तिकडचं सगळं काम अर्धवट सोडून आल्यामुळे घरी राहूनही तिचा अर्धा जीव सतत सातासमुद्रापलीकडे लागून राहिला होता. ऋतु ही पंचविशीच्या उंबरठ्यावरची एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मोहन काका आणि अरुणा काकूंची एकुलती एक लाडकी कन्या. काकूंची आई सुध्दा सोबतच राहायची. खूप वयस्क असूनही आजीबाई बोलण्यात अगदी ताठ होत्या. इन्जिनीअर झालेली ऋतु काही वर्षापूर्वी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. काका काकूंनी मोठ्या हिमतीने, आपल्या काळजावर दगड ठेऊन आपल्या लेकीला दूर पाठवलं खरं पण तेव्हापासून काकू मात्र हरवल्यागत वागायच्या.

पुस्तक परिचय The Great Game - अतिम भाग

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 25/06/2020 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
रशियाचा वाढता प्रभाव १८८० पर्यंत मध्य आशियात रशियाचा अंमल सर्वत्र पसरला होता. रशियाच्या या पराक्रमाचा सूत्रधार होता जनरल कॉफमॅन. त्याला साथ दिली ती जनरल चेरनैव्ह, स्कोबेलेव्ह, या रशियन जनरल्सनी. तसेच इग्नेटिव्ह या रशियन अधिकाऱ्याने मध्य आशियाचा दौरा करुन जी या भागाविषयी, तसेच खानांच्या सुरक्षाव्यवस्थेविशयी जी माहिती मिळविली होती त्याचा रशियाला खूप फायदा झाला. रशियाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे ताश्कंद शहर रशियाने आधी ताब्यात घेतले. हेच शहर पुढे जाऊन रशियाच्या मध्य आशियातील हालचालींचे केंद्र बनले.

निसटणं आणि टिकणं (लघुकथा)

लेखक लेखनवाला यांनी गुरुवार, 25/06/2020 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
तलावाच्या शहरातल्या तलावापैकी हा एक तलाव, अगदीच छोटेखानी, त्यांचे खोलवरचे सगळे पाण्याचे झरे विरत चालेले, हल्लीच तलावाच्यावरुन एका उडडाणपूलाचं बांधकाम झाल्यापासून तर तिथल्या पाण्यात सूर्यकिरणं यायला वावच राहिला नव्हता, या असल्या वातावरणात तिथं तंग धरु शकतील असे वनस्पतीजीव, जलचराचं मात्र यामुळे फारच हाल होतं होते.

सुशांत

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 25/06/2020 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नव्हते जेव्हा पाहत कुणिही ... रडलो होतो झगमगताना पायतळीच्या अंधारी... तगमगलो होतो बेमालुमसा प्रतिमेमागे... दडलो होतो उजेड नाकारून अंधारा... भिडलो होतो श्रेयस प्रेयस तुंबळात.. सापडलो होतो रुजताना उन्मळलो... का मी किडलो होतो?
काव्यरस

(सकाळी सकाळी)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 25/06/2020 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी घाण उग्र भपकारा लांबूनच आला क्वार्टर टाकून आला सकाळी सकाळी फेसाळत्या सोड्यात बर्फाचा मनोरा लिंबू जाउन बसले जरासे बुडाशी पाय जड झाले दृष्टी नाही डोळी अवस्था ही झाली सकाळी सकाळी किती पेग गेले घशातून भरारा म्हणे आठवांचा सुटण्या येरझारा घरचे निष्ठुर म्हणती पितो देशी विदेशी न मिळता सकाळी सकाळी रिकामी बाटली अन पुडी फरसाणाची जणू साक्ष देती नादान पणाची दिसे उभे घेउन कुणी हाती जोडे का भास व्हावा सकाळी सकाळी क्षणात डोळे खाडकन उघडावे कुणी तरी खाडकन थोबाडी हाणावे पैजारबुवा,

सकाळी सकाळी

लेखक मनोज यांनी गुरुवार, 25/06/2020 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
कभिन्न काळा मेघ भरून आला बरसून गेला सकाळी सकाळी चहाच्या कपावर वाफेचा मनोरा तरी थंड आहे जरासा बुडाशी किती गर्द वाटे धुके दाटलेले दिसते न काही सकाळी सकाळी जरी खोल जावे मनाच्या तळाशी तरी आठवांचा न सुटे येरझारा एकांत निष्ठुर अश्या दूरदेशी उभा खिडकीपाशी सकाळी सकाळी निष्पर्ण झाडे स्तब्ध गोठलेली जणू शोक करती ती पाने गळाली दिसले उभे दूर कुणी पाठमोरे का भास व्हावा सकाळी सकाळी क्षणात डोळे भरून यावे कुणी आठवावे पुन्हा ते नव्याने