पुलंचा एक सुरेख लेख !
हा लेख लोकांनी वाचला असण्याची शक्यता आहे म्हणून तो खफवर टाकणार होतो; पण लेखाचा कंटेंट इतका भारी आहे की तो सरकत्या पोस्टींबरोबर सहज हरवून गेला असता. त्यामुळे इथे पेस्ट करतोयं.
पुलंसारख्या हुशार, चतुरस्त्र आणि इतक्या निर्विवाद विचारसरणीच्या व्यक्तीचं कौतुक कलौघात फिटणारं नाही याची नोंद रहावी म्हणून हा लेख.
_______________________________________________
एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही.
मिसळपाव