एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना
गज़ल (मराठीत गझल?) आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय ... जणू मर्मबंधातली ठेव ही .... पण एकदम कोणीच गज़ल ऐकायला जात नाही.
आपल्या संगीत जीवनाची (कानसेन म्हणून ... तानसेन नव्हे ) सुरवात होते ती सिनेसंगीताने. त्यावेळी प्रमुख दोन प्रकार असतात .. फिल्मी आणि गैरफिल्मी.
गाणी ऐकायची सुरुवात व्हायची ती रेडिओ पासूनच . माझीही सुरुवात तशीच झाली. पुढे कॅसेट, सीडी , एमपी३ , ऑनलाइन अशी साधन बदलली तरी दोन गोष्टी कायम राहिल्या - संगीताची आवड आणि रेडिओ. या प्रवासात रफी किशोर बरोबरच ओपी, एसजे, एसडी, आरडी ही नावेही जवळची वाटू लागली आणि मजरुह, साहिर, शकील यांच्याशीही परिचय झाला.
मिसळपाव