विजयादशमी..!!
विजयादशमी...!!
मस्त आरामात पेपर वाचत असतानाच, चिरंजीव वही घेऊन आले. बाबा मला विजयादशमीचा निबंध सांगा. "अरे..आईला विचार रे राजा.." मी प्रामाणिक प्रेमाने म्हटले. अहो, दुसरीतच आहे तो.. पी.एच.डी.चा निबंध सांगत नाहीये. तेवढं जमेल तुम्हाला... माझ्या अस्मितेला लागलेला धक्का सावरत, मी 'हो' म्हटलं.. जुजबी माहिती सांगत लेकाचा पानभर निबंध पूर्ण झाला..
पण पुन्हा मात्र पेपर वाचनात मन रमेना. अरे, हे माझं सुट्टीच्या दिवशीचं वाचनाचं सुख हिरावून कोण घेतंयं..? रामदास स्वामींची आठवण झाली. जगी सर्व सुखी, असा कोण आहे.. आणि त्यांची गंमत वाटली.
मिसळपाव
