Skip to main content

स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 08/11/2020 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो माझी आई , श्रीमती सुलेखा ना. मेहेंदळे,सध्या वय वर्षे ८१ , व्यवसाय स्मरणरंजन, फोनवर गप्पा मारणे,स्तोत्रे पोथ्या वगैरे वाचणे आणि काही प्रमाणात लिखाण करणे. तर बरेच दिवस ती लिहीत असलेल्या आठवणीमधील काही पाने मिपावर प्रकाशित करावीत असा माझा विचार चालू होता आणि तो मी तिला बोलूनही दाखविला होता. त्याप्रमाणे मी दर थोडे दिवसांनी तिला विचारत असे आणि झालेले लिखाण चाळून काही सूचना करत असे. सरतेशेवटी आजपर्यंत लिहून झालेल्या आठवणी थोड्या थोड्या प्रकाशित करूया असे ठरवून आज हा पहिला लेख लिहीत आहे. तसे म्हटले तर सामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य असे काय असणार?

पिक्चर!!

लेखक वेलांटी यांनी रविवार, 08/11/2020 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
मला लहाणपणी पिक्चर पहायला खूप आवडायचं! टिव्ही समोरून मी हलत नसे. खेडेगावातलं बालपण माझं! मी आजूबाजूला पहायची ती दुनिया अन् टिव्हीतली दुनिया यांत जमिनअस्मानाचा फरक. माझा इवला जीव त्यांत फार रमायचा. घरीदारी या वेडाची फार चेष्टा केली जाई. मला वाटे, आपल्या आयुष्यातपण काहितरी पिक्चरसारखं व्हावं! उन्हात पाऊस पडावा, आपल्याकडे बोलणारा पोपट असावा, पळत असताना आपले केस हिरोईनसारखे उडावे, विस्कटू नयेत, शाळेत वर्गात बसले असताना, वारा आला तरी नेमकी एकच बट गालावर यावी, सगळे केस पिंजारू नयेत, नंतर मोठी झाल्यावर ओढणी वार्याने उडून गेली तर वाटे, आता एखाद्या मुलाच्या तोंडावर जाऊन अडकते की काय?

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 08/11/2020 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं.

देवाचिये द्वारी

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 08/11/2020 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला ह्दयविकाराचा झटका आला व एंजिओप्लास्टी झाली त्या अनुभवाविषयी लिहिले आहे चार भागात. त्यापैकी दुसरा भाग : २ देवाचिये द्वारी. "त्याचे" घर हेच  शेवटचे विश्रांती स्थान असते सर्वांचे,असे म्हणतात. शेवटी तिथेच जायचे आहे. सर्वांनाच.अपवाद नाहीच.फक्त कोण ,कधी, कसा ,तिथे पोहचणार?हे मात्र इकडच्या कुणाला कधीच ठाऊक नसते. आणि तिथे जायला कुणीही कधीच तयार ही नसतो. भितीच वाटत असते जाण्याची.त्या कल्पनेचीही.आपण कायम इथेच राहणार आहोत हेच गृहीत धरून असतात सगळे .आपण या जगात येतो,तेव्हाच  श्वासांची संख्या ठरलेली असते म्हणे. ती संपली की सारेच संपले.आपले इथले अस्तित्व ही.

दोघे आपण...!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शनिवार, 07/11/2020 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
दोघे आपण...!! परिणय आपुला, हे नवजीवन, त्यास प्रीतीचे, अनुपम कोंदण, जगा वेगळा वाटे साजण, तरी, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. मनी बांधते मखमली तोरण, छोटे घरकुल, मोठे अंगण, अनुरागाचे त्या, मधुर शिंपण, पण, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. दोन मनांची नाजूक गुंफण, जना मनाचे सुरेख बंधन, विवेक करितो अभिनव कुंपण, कां, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. दोन जीवांचे एकच बंधन, सुगंधी नाते, जणु ते चंदन, आता उरले अबोल क्रंदन, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. कलहामधुनि सदैव घर्षण, संघर्षाचे चर्वित चर्वण, कुठे हरवले ते आकर्षण, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. संसारी या एक उणेपण, आनंदाची भासे चणचण, वादविवादाची ती तणतण, दोन ध्रुवा

नको सत्ता

लेखक केदार पाटणकर यांनी शनिवार, 07/11/2020 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
(गैरमुरद्दफ गझल) नको सत्ता, नको दौलत हवी केवळ तुझी सोबत पुरे ती रोजची कामे चहा घेऊ, बसू बोलत कुणालाही नको सांगू तुझ्यामाझ्यातली गंमत कधी होणार तू माझी कळू दे ना तुझेही मत सभोती रंग मुबलक पण निराळी ही तुझी रंगत (समाप्त)
काव्यरस

बदल

लेखक केदार पाटणकर यांनी शनिवार, 07/11/2020 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
यशवंतच्या बाकावर तो एकटाच होता. समोरच्या बाकावर एक तरुणी होती. रेखीव चेहरा. बांधेसूद व्यक्तिमत्व. गळ्यात मंगळसूत्र. संपूर्ण रुममध्ये ते दोघेच होते. पार्टीशनच्या पलीकडे रिसेप्शनिस्ट मुलगी होती. त्या पलीकडे डॉक्टरांची खोली. तिघेही डॉक्टरांची वाट पाहात होते. डॉक्टर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला पेशंट झाल्यावर बोलावत असत. समोरच्या तरूणीला बोलावल्याशिवाय त्याला बोलावणे जाणार नव्हते म्हणून पुरेसा वेळ यशवंतकडे होता. यशवंत ब्रीफकेसमधून स्वतःची फाईल काढून चाळू लागला. आज डॉक्टरांना कोणती औषधे प्रेझेंट करायची आहेत, याचा एकदा आढावा घेऊ लागला.

आपुले मरण पाहिले म्या..

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 07/11/2020 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला व एंजिओप्लास्टी झाली. त्या अनुभवाविषयी लिहिले आहे. चार भागात पैकी हा पहिला . आपुले मरण. २२ऑगस्ट २०२०. सुरुवात नक्की कधी आणि कशी झाली,माहित नाही. १६\१७ ऑगस्ट २०२०ची रात्र असावी. छातीत उजव्या बाजूला अगदी वर ,गळ्याचे खाली भरून आल्यासारखे जाणवले. थोडे दाबल्यावर बरे वाटले. नंतर रोज रात्री कमी जास्त प्रमाणात तोच प्रकार. पाठ  दंड हात चोळून घेतले की ठीक व्हायचे .दिवसा मात्र काही नाही. ॲसिडिटी  होते अधूनमधून. अस्थमा ही आहे.गॅसेसचा त्रास आहे.त्यामूळे किंवा वातविकाराने होत असावे हा समज झाला.

गुंतागुंत

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 06/11/2020 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
"नमस्कार सर, गोखले बोलतोय." बोला गोखले साहेब "मला वाटले तुम्ही फोन कट करताय की काय" ते का बरे? "अहो माझ्या मुलाने तुमचा पाणउतारा केला होता म्हणून" अहो कसला पाणउतारा ? त्याला माझे म्हणणे नाही पटले, चालतंय की, त्यात चूक काय? आणि मला कोब्रा दंशाची सवय आहे. "त्याचे परिणाम भोगतो आहे की" का? काय झाले? "जेईई ला ११० मार्क" चांगले आहेत की "सर मस्करी करताय." नाही हो, अजिबात नाही. मी तुम्हाला एक नंबर देतो. त्या वर मुलाला फोन करायला सांगा. माझा एक विद्यार्थी आहे अभय शाह. अमेरिकेत मास्टर्स करतोय. त्याला पण १०५ मार्क होते j जेईई मध्ये २०१५ मध्ये. माझ्या संपर्कात आला.

मंगळगड उर्फ कांगोरी (Mangalgad/ Kangori )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 06/11/2020 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्या खोर्‍यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दर्‍यांनी नटलेला आहे. सावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत असे. महाडात उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांत जात असे. ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवर व घाटमाथ्यावर अनेक किल्ले बांधण्यात आले.