दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !!
दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !!
खरं तर समाजात आजकाल हे नातं, अनेकवेळा वेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतयं. पूर्वीची चाकोरी सोडून, आपण नवे विचार(?) रुजवू पाहतोय.
लग्नानंतर काही काळाने, काही ठिकाणी नवरा बायकोचं पटेनासं होतं. मानसिक, शारीरिक, बौद्धिक, तात्विक गरजांची गणितं चुकत आहेत, असं वाटू लागतं. अनेक पातळ्यांवर आपल्या जोडीदाराचं, अपूर्णत्व जाणवू लागतं. मग आपलंच मन, सखा/सखी शोधू लागतं. अनेकांना अशी व्यक्ती सापडतेही... मन मोकळं होऊन, आपण सुखाचा श्वास घेतोयं, अशी गोड जाणीव होते. ती अनेक प्रसंगातून पक्की होत जाते. नकळत हे नवीन नातं, दृढ होत राहतं...
मिसळपाव