Skip to main content

सात वेळा मेलेला माणूस "The Dead Man"

लेखक rushikapse165 यांनी शनिवार, 28/11/2020 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ.खेळ म्हणजे खेळच.मग तो कुठलाही असो.आजकाल एक नवा ट्रेंड चाललाय,काय तर,90'Kids.तसा मी काही नव्वदच्या दशकातील नाही.आणि नसलो तरी मी काही दुर्देवीही नाही,कारण माझा जन्म तो २००० सालचा,त्यामुळे संगत होती ती नव्वदच्याच दशकाची. तो काळही तसाच होता.T.V.नावाचा प्रकार तितकासा सगळ्यांकडे नसायचा.त्यात त्यावेळच्या रामानंद सागरांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांनी अगदी दशक उलटल्यानंतरही आपलं वर्चस्व प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं होतं,आणि त्यामुळे ज्याघरी T.V.त्याघरी संध्याकाळी गर्दी हे ठरलेलं.आणि दुसरं काय तर?क्रिकेट,त्यावेळी क्रिकेट म्हणलं की सचिन अाणि सचिन म्हणलं की क्रिकेट,एवढंच गणित.आणि आमच

डोक्याला शॉट [ (पेट्रोल) पंचमी ]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 28/11/2020 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
हेल्लो फूल्स... आवाक झालात ना ? मी आज नमस्कार चमत्कार करायचा सोडून तुम्हाला डायरेक्ट हेल्लो फूल्स... म्हणतोय म्हणून... येस...आय न्यू धिस! मला हे आधीच माहित होतं की मी असं बोलल्यावर तुमच्या थोबाडावर असेच बावळट भाव येतील म्हणून... कसं ते विचारा... लाजतांय काय असे विचारायला?

बारमास - हायकू

लेखक मी-दिपाली यांनी शुक्रवार, 27/11/2020 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
लाॅकडाउनमध्ये लागलेल्या छंदाने आता थोडं बाळसं धरलंय म्हणायला हरकत नाही. काही लेख आणि थोड्याफार कविता एवढी मोजकीच शिदोरी गाठीशी असताना असं म्हणणं धाडसाचंच आहे, पण मूळ मुद्दा हा की नाविन्याची ओढ बऱ्याचदा स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे काव्याचे वेगवेगळे प्रकार करून पाहावेसे वाटले. (नाही, मी बाळबोध, बऱ्या, थोड्या अधिक बऱ्या कवितांबद्दल नाही सांगत, तशाही त्या आपसूकच झाल्या असतील.) अभंग, अष्टाक्षरी, षडाक्षरी, मुक्तछंदातील कविता, सवालजवाब, अगदी गझलेचंही तंत्र शिकून त्याही रचून झाल्या. निसर्ग, प्रेम, विरह, जीवनविषय, सामाजिक आशयही यासारखे विविध विषयही हाताळून झाले.

गोव्याचा इतिहास- शिवकाल

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 27/11/2020 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापुर्वी मिसळपाव.कॉमवर गोव्याचा इतिहासाची सविस्तर माहिती देणारी नितांत सुंदर मालिका टिम गोवा या आय.डी.ने लिहीली होती.त्याच्या सर्व भागांची एकत्रित लिंक खाली दिलेली आहे. आमचें गोंय - समारोप - आजचा गोवा या मालिकेत भाग ५ मध्ये शिवकाल आणि मराठेशाहीविषयी माहिती लिहीली आहे.त्याची लिंक खाली दिलेली आहे. आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही मात्र हि माहिती पुरेशी सविस्तर नसल्याने या कालखंडातील इतिहासावर

कोंढवी ( kondhavi )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 27/11/2020 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
जावळी परिसरातील किल्ले या मालिकेतील हा अखेरचा धागा. पोलदपूरहून खेड - चिपळूणकडे जातांना कशेडी हा प्राचिन घाटमार्ग लागतो. या घाटातून गोवा, रत्नागिरीकडे जाणार्‍या गाड्या रात्रंदिवस धावत असतात.पण या वर्दळीवर एक प्राचीन गड नजर रोखून बसला आहे, हे कोणाच्या गावीही नसते. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या पोलादपुर तालुक्यात कशेडी घाटमार्गात पुर्वबाजुला असलेल्या डोंगराच्या कुशीत कोंढवी हे प्राचिन गाव वसले आहे. गावात दिसणाऱ्या सतीशिळा,विरगळ,कोरीव मुर्त्या तसेच मंदिराचे कोरीव स्तंभ या गावाचे प्राचीनत्व अधोरेखीत करतात.

मी आणि माझा न्यूनगंड

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 26/11/2020 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
जन्माला आलो तेव्हा मी अज्ञानी होतो. काही जणांना वाटायचे मी तेव्हा अत्यंत सुखात होतो, पण प्रत्यक्षात मी माझा कंफोर्ट झोन सोडून, एका जगात प्रवेश केला होता जिथे ज्ञान केवळ ज्ञानेंद्रियांनीच होऊ शकत होते. कालांतराने मी सरावलो, आणि मी भिन्न ज्ञानेंद्रियांनीच ज्ञान मिळवण्याची क्रिया आत्मसात केली. जेव्हा मी हे आत्मसात केले, तेव्हा अन्य काही प्रश्न उभे राहिले. माझे आयुष्य नेमके किती असेल, मी आयुष्यात काय मिळवले पाहिजे हा पहिला प्रश्न.. आजूबाजूला बघता बघता हे लक्षात आले के आयुष्य फारच क्षणभंगुर आहे, कोणत्याही क्षणी तुमचा ग्रंथ आटोपु शकतो. हा माझ्या आयुष्यातील पहिला न्यूनगंड..

लेख

लेखक VRINDA MOGHE यांनी गुरुवार, 26/11/2020 12:00 या दिवशी प्रकाशित केले.

मजसी भेटवा...

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी गुरुवार, 26/11/2020 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
मजसी भेटवा.... कुणी असो सोवळा, कुणी तो बावळा, विठ्ठल सावळा, सर्वांना प्रिय.. कृपेची साऊली, उभी असे राऊळी, ती विठू माऊली, सर्वांना प्रिय.. क्षण जाई वाया, निरवी "तो" माया, ऐसा विठुराया, सर्वांना प्रिय.. वाजवू मृदुंग, गाउनी अभंग, मनी पांडुरंग, सर्वांना प्रिय.. मकरकुंडलांचा साज, डोळाभर पाहू आज, उभा केशीराज, सर्वांना प्रिय.. धरूनिया हात, करी जो सनाथ, असा पंढरीनाथ, सर्वांना प्रिय.. सोडवी आसक्ती, देई जो विरक्ती, तो रखुमापती, सर्वांना प्रिय... जिथे नामाचा गजर, तिथे जातीने हजर, सखा रखुमावर, मजसी भेटवा...!! जयगंधा.. २६-११-२०२०.

लेख

लेखक VRINDA MOGHE यांनी बुधवार, 25/11/2020 12:25 या दिवशी प्रकाशित केले.