Skip to main content

सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 07/12/2020 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा भाग ७ - उलट-पलट आदिकाळापासून चालत आलेली व्यवस्था. तिने घर सांभाळायचे आणि पुरुषाने उदरनिर्वाहाचे बघायचे. यात कधीतरी अहंकार आणि आपल्यावरच ती अवलंबून आहे हा गैरसमज शिरला. हळूहळू कुटुंबव्यवस्था नावाखाली तिचे पद्धतशीर शोषण सुरू झाले. तिचा घरच्या कामांसाठी वापर करणे, शिकून काय करायचेय, घराची कामे करायला शिक्षणाचे चोचले कशाला हवे, स्त्री म्हणजे अबला अशी मानसिकता पसरवून तिचा गैरफायदा घेणे.. जिथेजिथे शक्य होईल तसे शोषण जगभरात होऊ लागले.

कोमेजलेला सोनचाफा

लेखक लई भारी यांनी रविवार, 06/12/2020 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
सोनचाफा आवडतो मला; विशेषतः त्याचा सुगंध. सगळ्यांनाच आवडत असणार. बर्‍याच वर्षांपूर्वी दादर स्टेशन बाहेर पहिल्यांदा बघितला आणि घेण्याआधी वास घेऊन बघत होतो तर फुलवाल्या आजी म्हणाल्या, "बाळा, वास घेऊ नये. देवाला वाहतात फुलं!" आज थंडी वाढली आहे तशी, संध्याकाळी बाहेर जाताना अंधार पडल्यावर गाडीच्या काचा बंद करून हीटर मोड वर चालू होता एसी. एका सिग्नलला गाडी थांबली आणि बहुतांशी रस्त्यावर राहणारी माणसं काहीबाही विकायला घेऊन आली. कुठेतरी वाचलेले आठवते की अशा लोकांना पैसे देऊन उत्तेजन देऊ नका. पळवून नेलेली मुलं घेऊन भीक मागतात. किंवा विनाकारण काही वस्तू गळ्यात मारतात वगैरे.

लेख

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 06/12/2020 21:53 या दिवशी प्रकाशित केले.

शायरी..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 06/12/2020 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही! शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही! अर्थास प्राप्त होता,शब्दास जाग यावी ऐश्या प्रभावितेची,मी साक्ष मागत नाही! मी सहजतेचा प्रवासी,असतो तिच्याचपाशी रचनेत हाव रचितेची ,अशीही मनात नाही! जावे तिच्या कुशीशी,घेऊन ऊब यावे सहजता माऊली ही, असते मनात माझी! भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही! अतृप्त... ०====०====०====०====०====०====०====
काव्यरस

मटण दम बिर्याणी (व्हिडिओ सोबत)

लेखक मी_देव यांनी रविवार, 06/12/2020 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे जिन्नस:
  • मटण - १/२ किलो
  • बासमती तांदूळ - ४०० ग्रॅम
  • जिरे पावडर - १ टीस्पून
  • धणे पावडर - २ टीस्पून
  • लाल तिखट - २ टीस्पून
  • दालचिनीच्या काड्या - ४
  • काळी मिरी - १ टीस्पून
  • तमालपत्र - २
  • मसाला वेलची - १
  • चक्रफुल - १
  • दगडफूल - १ चिमूट
  • लवंग - ६ ते ८
  • वेलची - १० ते १२
  • कांदे - ४
  • तेल - ४ टेबलस्पून
  • आलं लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
  • दह

म सा वी

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 06/12/2020 04:10 या दिवशी प्रकाशित केले.
आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे? म्हणजे विलायती देशी पहिल्या धारेची (हातभट्टी) ह्या मधली कुठली निवडायची? कुणाला आईस जास्त लागतो कुणाला कमी कुणाचा चिअर्स तर कुणाचा चांगभलं कुणाचा चखना काजू तर कुणाचा चकली फारच घोळ आहे बुवा. कुणाचा एक पेग पुरतो तर कुणाचे दोन शिवाय मजा नाही .... .... .... कुणी तरी सुरापानासाठी बोलवा रे प्रेर्ना अर्थातच लघुत्तम साधारण विभाजकाची

ल सा वी

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 05/12/2020 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे? म्हणजे जर्मन रशियन ब्रिटिश(पुणे) ह्या मधली कुठली निवडायची? कुणाला आईस जास्त लागतो कुणाला कमी कुणाचा बापुस तुर्की तर कुणाचा हायब्रीड फारच घोळ आहे बुवा. कुणाचा एक पेग पुरतो कुणाचे दोन पेग पिल्याशिवाय चढत नाही. .... .... .... कुणी तरी मार्गदर्शन करा रे

ल सा वी

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 05/12/2020 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे? म्हणजे जर्मन रशियन ब्रिटिश(पुणे) ह्या मधली कुठली निवडायची? कुणाला आईस जास्त लागतो कुणाला कमी कुणाचा बापुस तुर्की तर कुणाचा हायब्रीड फारच घोळ आहे बुवा. कुणाचा एक पेग पुरतो कुणाचे दोन पेग पिल्याशिवाय चढत नाही. .... .... .... कुणी तरी मार्गदर्शन करा रे

गुर्हाळ

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 05/12/2020 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
गुर्हाळ...     पन्नास,पंचावन्न वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. गावी पिंपळाचा मळा नावाचे शेतआहे.तिथली जमीन कसदार. विहीरीला मुबलक पाणी असे.ते उपसण्यासाठी किर्लोस्कर इंजीन होते.पाण्यावर ऊस जोमाने वाढे. डिसेंबर मधे उस पूर्ण गोडीला येई.तेव्हा मराठवाड्यात एकही साखर कारखाना नव्हता.होते फक्त पश्चिम महाराष्ट्रात. त्यामूळे उस गाळून गुळ तयार करणे हा एकच पर्याय होता.एक छोटा उद्योगच. गुर्हाळ. तो दरवर्षीचाच असल्याने,मळ्यात एक चुलाण व धूर जाण्यासाठी धुराडे बांधून ठेवले होते.ते पाला पाचोळा घालून बंद केलेले असे.गुर्हाळ सुरू व्हायच्या आधी ते मोकळे करून,सारवून स्वच्छ केले जाई.

शिक्षणाचे मानस शास्त्र: SMART Objectives = सामोसा विका!

लेखक राजा वळसंगकर यांनी शुक्रवार, 04/12/2020 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझी गाडी SMART Objectives वर कशी आली? सध्या युकेत आहे आणि दुसऱ्या लाँकडाउनमधे उद्योग काय? हॉरर ऑफ होरर्स, blimey, of all the ... पब बंद???? इतका बोर झालो की वेळ घालवायला नवीन शैक्षणिक धोरण चक्क पूर्ण वाचले! त्यातल्या एका परिच्छेदाने लक्ष वेधले.
The purpose of the education system is to develop good human beings capable of rational thought and action, possessing compassion and empathy, courage and resilience, scientific temper and creative imagination, with sound ethical moorings and values.