Skip to main content

शिवरायांची वंशावळ!

लेखक रम्या यांनी बुधवार, 06/02/2008 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
शिवरांयांच्या राज्याभिषेकाच्या काळात त्यांच्या दरबारातल्या काही लोकांनीच विरोध केला. आण्णाजी दत्तो हे त्यांपैकीच एक. सगळ्यांचा आक्षेप एकच होता की शिवराय हे क्षत्रिय नाहीत! अशावेळी भोसले धराण्याचं मूळ शोधण्याची आवश्यकता भासू लागली. ही जबाबदारी शिवरायांच्या दरबारातल्या बाळाजी आवजी चिटणीसांकडे देण्यात आली. संशोधनाअंती शिवरायांचं मूळ रजपुतांच्या सिसोदिया या क्षत्रिय घराण्याचं निघालं. या मूळ घराण्याला नंतर बरेच फाटे फुटले. घोरपडे घराणं हे या पैकीच एक. मूळ सिसोदिया घाराण्याच्या भोसाजी नावाच्या एका राजा नंतर "भोसले" हे आडनाव रुढ झालं. या वंशवॄक्षाची एक फांदी तंजावूर (तंजावर्)ला स्थयि़क झाली.

विचार

लेखक प्रशांतकवळे यांनी बुधवार, 06/02/2008 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
हे लिखाण माझे नाही, मुळ लेखक / विचारवंत पण माहीत नाही. १. ज्यांनी रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चाताप होतो, त्यांनी सरळ दुपारी उठावे. २. माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे, म्हणजे ऐकणार्‍याला स्पष्ट ऐकू जाते. ३. मूलभूत राजकीय पक्ष दोनच: सत्ताधारी, सत्ताकांक्षी ४. दोन जोडपी समोरासमोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या, दागिने बघतात, तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात. ५. मुलगा व नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे. ६. प्रेम आंधळे असतं, लग्न डोळे उघडतं. ७. देवा मला वाट पहाण्याची शक्ती दे..... आज, आत्ता, ताबडतोब! ८.

तूच आहेस तुझ्या र्‍हासाचा शिल्पकार

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 06/02/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कृपया ही बातमी वाचा. आपल्याला काय वाटते? इच्छुकांनी या संदर्भात कृपया येथे चर्चा करावी असा मानस आहे..

सर्जनशीलता, लायकी आणि मार्केटिंग......आमच्या नाटकातला एक संवाद

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 06/02/2008 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
सर्जनशीलता, लायकी आणि मार्केटिंग...... आम्ही कॊलेजला एका वसतिग्रुहात शिकलो तेव्हा आमचा एक कविमनाचा मित्र होता... लायक माणसांना कौतुक लाभायच्या ऐवजी नेहमीच कोणा भलत्यालाच (त्याच्या अंगभूत गुणांच्याऐवजी काही इतर कारणांमुळे..उदा. सत्ता , पैसा, उच्च वर्तुळात संपर्क इ.) कौतुक लाभते असे जेव्हा दिसत असे, त्यावेळी आमच्या या मित्रास भयंकर वैफ़ल्य येत असे...हे वैफ़ल्य कधी वाजवी आणि कधी अत्यंत अयोग्य असे, पण त्याच्याशी फ़ार वेळ वाद घालणे शक्य होत नसे.... " श्रीमंत माणसे लायकी नसताना पैशांच्या जोरावर काहीही मिळवू शकतात" असे तो म्हणे, आणि चिडचिड करे....

कोल्हे वाण्याला कोकणी सल्ला

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 05/02/2008 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूरचा कोल्हे वाणी पोलादपूरला सोले आणी! सल्ला सच्चा सोळा आणे सोलापूरला पोलाद नेणे
Taxonomy upgrade extras

तिचे अभंग, तिची गाथा

लेखक नंदन यांनी मंगळवार, 05/02/2008 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठावे | सुसाट सुटावे | ऑफिस गाठावे | कैसेतरी || इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या | वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या || चढावे बशीत | गर्दीत घुशीत | रोज या मुशीत | कुटताना || धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम | गाठण्या मुक्काम | सोस बये! || उशीर अटल | चुकता लोकल | जीवही विकल | संभ्रमित || लागते टोचणी | भिजते पापणी | जावे का याक्षणी | तान्ह्याकडे?
Taxonomy upgrade extras

धोंडोपंताना जाहिर आवाहन

लेखक कौटील्य यांनी मंगळवार, 05/02/2008 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम धोंडोपंत २१-१२-२०१२ व माया संस्क्रुती या विषयी आपण मराठीत माहिती द्यावी मला माहित असलेली लिंक http://www.greatdreams.com/2012.htm http://www.13moon.com/prophecy%20page.htm http://www.knowledge.co.uk/xxx/cat/mayan/ http://www.crystalinks.com/mayancalendar.html ग्रह तारे संबंध आलयामुळे तुम्हाला त्रास दिलआ धन्यवाद

आजही मला ते सर्व आठवतय

लेखक धमाल मुलगा यांनी मंगळवार, 05/02/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आजही मला ते सर्व आठवतयं जणू कालचं सारे घडल्यासारखं तीच आयुष्याची मजा घेत मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं अजुनही मला आठवतंय.... Lecture ला दांडी मारुन बाजुचा परिसर फिरत बसायचो फिरुन कंटाळा आला की परत college कडे वळायचो Canteen वाल्याला शिव्या घालत बाहेरच्या café मध्ये जायचो Café बंद असला की परत Canteen मधलंच येऊन गिळायचो Library card चा तसा कधी उपयोग झालाच नाही Canteen समोरच असल्याने Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत आमच्या group ला मात्र मुलींची तशी allergy होती कदाचीत college कडून ती आमच्या group ला झाली होती चालु तासाला मागच्या बाकावर Assignment copy करायचो ज्याची copy केली आहे त्याच्या