Skip to main content

आज काय घडले... पौष व. ७ स्वामी विवेकानंद यांचा जन्म!

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष व. ७ स्वामी विवेकानंद यांचा जन्म! शके १७८४ च्या पौष व. ७ रोजी भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व जगभर प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. विवेकानंदांची पूर्वपरंपरा अध्यात्मिक वैभवाने नटलेली आहे. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या उक्तीप्रमाणे विवेकानंद या श्रेष्ठ व्यक्तीच्या कुलाचा इतिहासहि उज्ज्वल असाच आहे. विवेकानंदांचे आजे बाबू दुर्गाचरण दत्त यांनी ऐन वयांतच संन्यास घेऊन परामार्थवृत्ति स्वीकारली होती. दुर्गाचरणांचे चिरंजीव विश्वनाथ बाबू मोठे विद्वान् होते. त्यांची ज्ञानलालसा अतुलनीय अशीच होती. त्यांची पत्नी भुवनेश्वरी ही देखील आदर्श आर्य स्त्री होती.

आज काय घडले... पौष व.६ भरतपूरचा अजिंक्य किल्ला !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
bharatpur killa शके १७२६ च्या पौष व. ६ रोजी होळकर आणि जाट यांनी भरतपूर येथे इंग्रजांचा प्रचंड पराभव केला. बाजीराव, शिंदे, होळकर यांची सत्ता संपुष्टांत आणण्याचे अनेक प्रयत्न इंग्रजांनी या वेळी चालू केले होते. दीगच्या लढाईनंतर यशवंतराव होळकर भरतपूरच्या आश्रयास ससैन्य येऊन राहिले होते.

गोबी मुसल्लम Gobi Musallam Gobhi Musallam

लेखक काळे मांजर यांनी शनिवार, 06/02/2021 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारीचा वेळ: ३० मिनिटे प्रत्यक्षात लागणारा वेळ: १.५ तास लागणारे जिन्नस: अख्खा फ्लॉवर चटणी साठी कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण पंढरपुरी डाळ्याची मिक्सरमधून अगदी बारीक केलेली पूड ग्रेव्हीसाठी तेल / तूप / बटर यापैकी काहीही कितीही मोहरी जिरे बडीशेप आले किस लसूण किस बारीक कांदा चिरून दोन टोमॅटो बारीक चिरून 7,8 टोमॅटो किसून पल्प मेथी पाला अर्धी किंवा एक मूठ अर्धी वाटी काजू पाण्यात घालून ठेवावेत , मिक्सर मधून वाटून घ्यावेत दही अर्धी वाटी पाणी मीठ साखर मसाले गरम मसाला लवंग ---------------- 1.
Taxonomy upgrade extras

लोकसंख्या - शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 06/02/2021 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/48278 इथे लोकसंख्या वाढीबद्दल थोडे प्रतिसाद आहेत.त्या अनुषंगाने ही शास्त्रीय मुलाखत. ---------------------------------------------------- एप्रिल २००४ मधे पुणे आकाशवाणी केंद्रावर अ.पां.देशपांडे यांनी शास्त्रज्ञ श्री.वसंतराव गोवारीकर यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.त्या मुलाखतीतली लोकसंख्या या मुद्द्यावर गोवारीकर सरांनी मांडलेली मते. वसंतराव , 1991 साली वडोदरा येथील इंडियन सायन्स काँग्रेसचे आपण अध्यक्ष होतात .

काही अविस्मरणीय डायलाॅग ....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 06/02/2021 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी आणि मराठी, सिनेमे बघत असतांना, काही डायलाॅग, आयुष्यभर साथ देतात....तसे, हे डायलाॅग, असतात एक ते दोन वाक्यांचेच, पण, जबरदस्त परिणाम करतात .... लोहा, लोहे को काटता है. सिक्के और आदमी में, यहीं तो फर्क है. सोन्या, तुम जानती हो की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है, मैं जानता हूं के ये रिव्हाॅल्व्हर खाली है, लेकिन, पुलिस नहीं जानती हैं की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है .. डाॅन को पकडने की कोशीश तो, ग्यारह मुलकों की पुलीस कर रहीं है. डाॅन को पकडना मुश्किल ही नहीं तो, नामुनकीन काम हैं कुत्ते, कमीने, मैं तेरा

प्रवास भाग 6

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 05/02/2021 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 5 https://www.misalpav.com/node/48240 प्रवास भाग 6 नविनने हाक मारल्या बरोबर अनघा आत जायला वळली पण तिचा हात धरत मनाली म्हणाली;"नको ग अनघा. आत अजून काहीतरी असेल. मला आता याहून जास्त धक्के सहन होणार नाहीत ग. त्यांना तू बाहेर बोलावं बघू. जे काही आहे ते असुदे आतच. आता आपण इथून लगेच निघुया." तिच्या हातावर थोपटत अनघा म्हणाली;"मनाली वेडेपणा नको करुस. त्याने आत बोलावलं आहे तर आपण जायलाच हवं. जे काही आहे त्याची जवाबदारी आपल्या चौघांवर आहे. तू इतकी का घाबरते आहेस? जे काही आहे ते आपण सांभाळून घेऊ. तशीच वेळ आली न तर पोलिसांकडे जाऊया आपण. हे बघ!

सकरपंच : रिव्यू

लेखक साहना यांनी शुक्रवार, 05/02/2021 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक काळ असा होता जेंव्हा स्त्रियांची भूमिका चित्रपटांत फक्त रडकी माँ नाहीतर अबला स्त्री हीच होती. चुकून कधी चांगली स्त्रीभूमिका यायची. माझ्या मते हॉलिवूड मध्ये स्त्रीभूमिका जास्त मूर्खपणाच्या असायच्या. मग काळ बदलला आणि स्त्री ला मध्यभागी ठेवून चित्रपट बनू लागले. पण माझ्या मते ह्या चित्रपटांत सुद्धा एक महत्वाचा दोष होता. ह्या चित्रपटांत सुद्धा स्त्री तोटके कपडे घालून त्याच गोष्टी करायची ज्या एक पुरुष साधे कपडे घालून करायचा. म्हणजे वॉरियर प्रिन्सेस झीना प्रमाणे युद्ध, उड्या मारणे गोळ्या झाडणे आणि ते सुद्धा स्टिलेटो घालून इत्यादी.

खुसखुस उप्पीट

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 05/02/2021 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
पश्चिमेत मेडिटीरीयन सी म्हणजे भूमध्य समुद्र काठच्या देशांचा आहार सर्वोत्तम (मांस बेताने आणि भाज्या भरपूर) समजला जातो असे आंजा ज्ञानाने कळल्यानंतर त्यात असते तरी काय पहाण्यासाठी डिशेस तुनळीवर शोधण्याचा प्रयत्न एकदा फसून झाला होता, पण मागच्या आठवड्याभरात योगायोगाने कुसकुस couscous नावाच्या डिशपर्यंत पोहोचलो.